Login

धागे नात्यांचे भाग -१५

पारिवारिक नात्यांमधील किलिष्टतेचे चित्रण
परिवाराची साथ लाभल्याने आनंदलेली जया आता पुर्ण प्रामाणिकपणे कुटुंबात रमु लागली होती .नात्यांचे धागे घट्ट असलेत तर कोणतेही संकट असो किंवा कोणतीही सवय असो त्यातुन मार्ग मिळतो हे सारंग व जयाच्या लक्ष्यात आले होते.भावासोबत सारंग आता रोज सल्लामसलत करत पुन्हा नव्या उभारीने कामाला लागला .कामात अटकल्याने व आपल्यांच्या मायेच्या व काळजीच्या शब्दांमुळे सारंगच व्यसन सुटण्यास मदत होत होती .

बघता बघता सारंग निर्व्यसनी झाला .जया व मेघाची पुन्हा पहिल्यासारखी जोडगोळी जमली होती.तारामतीला सुनांची ऐकी बघून  आकाश ठेगणं झाल होत.रोज एकत्र गप्पा गोष्टी, सल्ला मसलत करत..परिवाराचा वेळ जाऊ लागला होता .एकमेकांच्या साथीने, ऐकिने प्रगतीला वेग आला होता .वर्षभरात गमावलेले वैभव नितिनदादाच्या मदतीने सारंगने पुन्हा मिळवल होत.

रात्री जेवतांना सारंग नितिनदादा व आप्पांना म्हणाला ,"आता सार सुरळीत झाल आहे व दिशाच शिक्षणही ह्यावर्षी संपत आहे ,तर तीच्या लग्नाचा विचार आपण करुयात का?"

सारंगने विषय काढल्याने मेघा व नितिनला आनंदच झाला होता .जयाच्या मैत्रीणीच्या मुलाच तोडीसतोड अस स्थळ दिशासाठी सारंगने पसंत केल होत.माणस विश्वासातली व बघण्यातली असल्याने सार्यांनीच स्थळाला होकार दिला होता .

दिशाची परिक्षा संपली तशी जयाने दिशासाठी खरेदी करायला सुरवात केली होती .मेघापेक्षाही जास्त लाड करणारी छोटी आई दिशाला लाभली होती .काही दिवसातच आपली मुलगी सासरी जाईल व घर सुन होईल ह्याने मेघाचेच नाही तर जयाचेही डोळे पाणावत होते .

दिशा होस्टेलमधून घरी आली तशी दोघ आयांच्या प्रेमात ती भरभरून जगत होती .

दिशा आजीला म्हणाली,"आजी मला खुप श्रीमंत सासर भेटावं हि अपेक्षा नाही गं..!पण माझ्या माहेरसारखे नात्यांचे धागे घट्ट असणारा परिवार भेटावा बस ..जेथे तुमच आमचं नसावं .आपल आहे हिच भावना सर्वांच्या मनात असावी बस.."

जया म्हणाली,"दिशु तु ह्या घरात वाढलीस बाळा ,पण सासर कसही असल तरी त्याला धरून रहा .सासरची माणस असतात गं जरा कठोर ,पण धागे मात्र पक्के असतात त्यांचे .आपण कोलमंडायला लागलो ना ?तेच आधार देतात हं बाळा ..!माहेर कितीही सदन व सुखाच असलं तरी दुःखात साथीला सासर व सासरची माणसेच कामी पडतात हे तुझ्या छोटया आईच वाक्य कायम लक्ष्यात ठेवं.."

दिशूला छोट्या आईच म्हणणं पटलं होत.मेघाला आता दिशाचीही चिंता नव्हती .नितीन ऐकदा बोलला होता .दिशाच लग्न तीचा काकाच करेल तसच झालं होत...

बघता बघता दिशाच लग्न झाल .दिप ,यश,निल तिघही मुलं शिकून चांगल्या नोकरीला लागली होती.सख्ख व चुलत हे नातच नव्हत त्यांच्यात. चौघ मुलांच प्रेम व लगाव खुपच छान होता .परिवार दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती करत होता .

जयवंतरावांच आता वय झाल होत, ते शांतच बसत होते तारामती पुर्णपणे थकल्या होत्या .मुलगी नव्हती पण दोघी सुनांनी सासू सासर्यांच्या सेवेत कोणतीही कसर ठेवली नव्हती.दोघ भावांची ऐकी बघून कधीकाळी परिवाराला संपवायला निघालेले कारस्थानी लोक जळू लागले होते .जयाच्या माहेरची मंडळीही पुन्हा संबंध वाढवू बघत होती पण एकदा ठेच लागल्याने माणुस सावध होतो तशी जयाने मनाला समज घातली होती ..मेघामाईकडून तीला बहिणीपेक्षाही जास्त माया व नितिनदादा तीला भावाहूनही जास्त जपत असल्याने माहेरची वाट ती तशी विसरलीच होती .

ऐन उमेदीच्या काळात सारंग नको त्या चुकिच्या वाटेवर चालू पडला होता. तेव्हा पुर्ण परिवाराने त्याला नात्यांच्या धाग्यात बांधुन ठेवल्याने चुकलेली वाट बदलायला परिवार पुढे आला. परिवाराची वाताहत होता होता वाचली होती.

म्हणतात ना ,

"ऐकीचे बळ मिळते फळ".

तसाच हा परिवार... एका धाग्यात गुंफलेला ..विस्कटलेल्या धाग्याला तुटू न देता अलगद ,सफाईने,शिताफीने धाग्यांच्या गाठी उलगडत पुन्हा नव्या उभारीने चालू लागणारा...समाज्यात "आदर्श परिवार "म्हणून लोकांच्या मनात आजही घर करून होता.

(परिवारात नात्यांचे धागे घट्ट असले कि कोणतेही संकट आपण सहज पळवून लावू शकतो .एकमेकांची साथ असली तर ऐकटेपणाची सल मनाला बोचत नाही. .बरेचदा सुखी परिवार बघितला तर काडया करणारे व त्या घरातील सुखाला तडे पाडणारे अनेक दृष्ट व्यक्ती समाजात वावरत असतात .एखादा त्यांच्या बोलण्याला फसतो व परिवाराची वाताहत करून घेतो .पण परिवार साथ देणारा असला व नात्यांचे धागे घट्ट असले कि त्यानी चालवलेला खेळ संपतो .कधीतरी नातेच आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतात पण काही नाते सावरायलाही मदत करतात .खचलेल मन सावरायला मायेची जीवाभावाची माणसं असलीत तर मग व्यक्ती सावरतो काहीवेळा प्रेमाची माणसं नसली तर व्यसनाधीनता व नको त्या वाईट मार्गात मनुष्य अटकतो ..त्यासाठी आपले तत्व पक्की व कान कायमच उघडी असावीत .नातं दोघी बाजून जपलं तर ते जपलं जात.कोणीतरी सावरायला असल कि मोडता आलेला डावही सावरला जातो ..हिच तर नात्यांच्या धाग्यांची गंमत असते .कुठे मतभेद नसतात हो ..!,सगळीकडेच असतात .पण थोड दुसर्याला समजून घेत मोठेपणा दाखवला कि सारच निट होत नाही का?...सारंग व जया फसलीत नको त्या मोहाला भुललीत ..भरपुर पैसा,मायाही कमवली ,पण वाईट मार्गाने कमवलेल ते वाईटातच गेल .सारंग खचला व्यसनाधीन झाला पण भावाच्या व वडिलांच्या साथीने पुन्हा सावरला .जर त्यांनीही साथ सोडली असती तर तो कधीच संपला असता .पण आपलाच धागा आपणच जपावा ही परिवाराची शिकवण असयाने सारच छान झालं.ह्या कथेतून इतकच सांगण आहे कि परिस्थिती ,मनस्थिती कधीही बिथरते.चांगला परिवार व चागल लोकांना बघवलं जात नाही समाज हा चांगल ही शिकवतो व वाईटही ..समाजात चागल्या व्यक्ती व चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत नाहीत उलट वाईट गोष्टींच्या पटकन प्रेमात पडतो .लोक चांगल बोलून घर फोडतात एखाद्या चांगल्या व्यक्तीची प्रगती बघून त्याला खाली खेचण्यासाठी वाईट मार्गाला लावतात ..येथेच आपण चुकतो ..आपल्यांवर अविश्वास दाखवत परक्यांना आपलस करू पहातो नाते येथे हारतात .नात्यांचे धागे मग कमकुवत होतात ...त्यासाठी नात्यांना जपा .कमकुवत करू नका समाजविघातक व्यक्तींपासून जरा लांबच रहा .आपला परिवार जपतांना बहिर व्हा ..नाती जपतांना त्यात जीव ओता ..बघा "धागे नात्यांचे " कधीच तुटणार नाही व तुम्हाला कधीच कुठेच वाकू देणार नाहीत ..)

माझी कथामालिका लिहिण्याची हि पहिलीच वेळ कशी वाटली कथामालिका नक्कीच कळवा.

©®वैशाली देवरे

राज्यस्तरिय करंडक कथामालिका
सामाजिक कथा
कथेचे शिर्षक -धागे नात्यांचे
जिल्हा - नाशिक

🎭 Series Post

View all