राज्यस्तरिय करंडक कथामालिका
सामाजिक कथा -धागे नात्यांचे
टिम ईरा -नाशिक
जयवंतरावांच्या घरचे आनंदी व प्रसन्न वातावरण आणि त्यांच्या वाढदिवसाची सगळीकडे जोरात चर्चा सुरू झाली होती .नाण्याला दोन बाजू असतात तशिच काही लोक कौतुकाचा वर्षाव करत होती तर काहींना ह्या सर्व परिस्थितीचा तिरस्कार वाटत होता .जवळचीच माणस व नातलग ह्या सगळ्या आनंदावर जळत होती .नितिन तसा जयवंतरावांच्या शब्दाबाहेर नव्हता पण सारंग जरा वेगळ्या विचारसरणीचा होता .पटकन कोणावरही विश्वास ठेवणं त्याचा स्वभाव होता .नितिनला घर घरातील माणसांची जपणुक छान जमत होती .पण व्यव्हारज्ञान सारंगच चांगल होत ..मग काय मुलांची गुण ओळखुन जयवंतरावांनी तशीच कामाची वाटणी केली होती .सारे व्यव्हार व पैशांची बरिचशी काम हा सारंगच करत होता त्यामुळे जयवंतरावांची जमापुंजी व सार काही त्याला माहित होत ...नितिन ह्या गोष्टिपासून दुरच होता ..आपल काम भल व तो भला अशीच त्याची परिस्थिती होती ..
आता आपण साठी गाठली ..जरा काम व संसारातून सुटका करून घ्यावी अशी इच्छा जयवंतरावांनी तारामतीला बोलून दाखवली ..
"ऐका ना सरकार मी काय ?म्हणतो घर संसार व सारे व्यव्हार मुलांच्या हातात देतो व मी मोकळा होतो आता किती वाढवायचं व काय करायचं त्यांनाही समजू दे की "
तारामतीला हे सार जड जात होत
"अहो ..तुमच्यामुळे मुल जोडले आहेत हो ..!,जर त्यांच्या हातात दिल तर घर विस्कटेल ...जोवर आपण आहोत तोवर तरी एकत्र नांदू देत ना मुलांना ..नका करू घाई ...पैसा वाईट असतो हो एकदा का ?हातात पडला ना ?माणुस नातीगोती व सारच विसरतो बघा ..जे चालल तेच चालू द्या ऐका माझं.."
जयवंतरावांनाही हे पटल होत..पण कोणताही व्यवहार झाला कि मुलांना जयवंतरावांकडूनच पैसे घ्यावे लागत व दरमहिण्याला हिशोबही द्यावा लागे ..जयवंतराव तसे कडक होते कुठेही कमीजास्त चालत नसे त्यामुळे सारंग व नितिन हिशोबात कुठेच गफलत करत नसतं...याचा अभिमान होता त्यांना ..
नितिनचा तसा गोतावळा कमी होता पण सारंग चुलबुला त्याचे मित्रमंडळी भरपुर होते ...व आता वयाची चाळिशी आल्याने त्यातील बरेचसे मित्र विभक्त झाली होती .चौकोणी कुटुंबात राहत होती..जयवंतरावांच्या घरचही वातावरण तस फ्रीच होत..नितिन नाही पण सारंग व त्याची बायको बाहेर फिरण व मित्रांबरोबर येण जाण आसायचं त्याच ...नितिन व मेघा तशा ह्या झगमगाटापासून दुरच होते ...पण जयाच्या जाण्याला मेघाचा कधीच विरोध नसे ...
नवे विचार व नविन पिढीचे जगणं जरा स्वच्छंदी ,आता सारंग व जयालाही त्या जगण्याची मज्जा वाटु लागली होती ...तस तेही जगतच होते पण काही गोष्टिंवर सासू सासर्यांमुळे जयाला बंधण पाळावी लागत होती ...जयवंतरावांच काही म्हणणं नसायच उलट तारामती जयाला सतत म्हणायच्या
"जया अगं तु व सारंग सार्या मित्रांकडे जातात व जेवण करतात कधीतरी तुम्ही पण बोलवत जा कि आपल्या घरी .."
तेव्हा जया म्हणत असे ,"नको आई आपल्या घरच वातावरण व त्यांच्या घरच वातावरण जरा वेगळ पडत ते वेगळे रहातात त्यामुळे धकून जात बघा .."
मेघाही म्हणत असे ,"जया अगं मीही करेलच ना ?तुला मदत अगं आम्हालाही बर वाटेल .."
पण सारंग व मेघाला ते मान्य नव्हतचं..तसे तेही कमी नव्हतेच सारा व्यवहार सारंगकडे मग काय पार्टा व मज्जामस्तीसाठी सारंग हिशोबात जराशी गडबड करू लागला ...घरी मित्रांना बोलवण नसल तरी आपणही कमी नाही हे दाखवण्यासाठी मग जया व सारंगची पार्टी हाँटेलमध्ये होऊ लागली ...मित्र मैत्रिणींच्या जगण्याकडे बघून सहाजिकच सारंग व जयाच्याही वागण्यात आता फरक जाणवू लागला ..
सारंग तसा मोकळा होता .पार्टि असली कि मग सारंगचा परिवारासोबत म्हणजे मुलांसोबत दिप व निल सोबत जात होती पण यश व दिशालाही काका काकूंनी कधीच सोडल नाही ..तस मुलांमध्ये दोघ भावांचा व त्यांचा बायकांचा भरपुर जीव तुझ माझ कधी होतच नव्हत ...दोघांपैकी कोणीही बाहेर गेल कि चौघ मुल सोबत असणार म्हणजे असणार हे गणितच होत...
आईवडिल जरी नसले तरी बाहेरच्या त्या झगमगाटाची यश व दिशालाही मज्जा वाटत होती ..सारंग व जयाला दिप व निलसोबत यश व दिशाचीही तेवढीच साथ मिळत होती ...केलेल्या मज्जामस्तीच घरी बोलायचं नाही किंवा आपण काय करतो ते घरी सांगायचं नाही हे जया मुलांना सांगून ठेवत असे
जयवंतरावांचा तसा घरावर पगडा होता .नातवंड असो कि मुलगा ते म्हणतील ती पुर्वदशा असच होत...नातवंडात तसा तारामती व जयवंतरावांचा आफाट जीव ..कोणतीही गोष्ट मुलांना कमी पडत नव्हती ..सहाजिकच मुल हि हट्टिच होती .
चौघेही मुल आईवडिलांच एकत नव्हती ...आजोबा आजीची लाडकी तर होतीच पण हट्टी व खुपच त्रास देणारी ...मुलांना सुनांनी रागवल तर जयवंतराव व तारामतीला आवडत नसे व ते सुनांना सतत सुनवत असत.मेघाला त्याच काही वाटत नसे पण जयाला ते जरा खटकत असे ...आपल्या मित्रकंपणीत असणारी मुलं आईवडिलांच्या शब्दाबाहेर नसतात व येथे आपली मुल आपल काहीच ऐकत नाही ..जयाला आता घरात वावरतांना विभक्त मैत्रिणींचा हेवा वाटु लागला होता ...
ती मेघाला म्हणतं असे ,"माई अहो आपली पोर आपला मानच ठेवत नाही बघा ...अहो ती मिरा व सविताची पोर आईला उलटुन बोलण सोडा हो त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत नुसता नजरेचा इशारा केला तरी घाबरतात बघा व आपली मुल जरा ई किंमत देत नाहित आपल्याला .."
मेघा म्हणत असे ,"अगं छोटी आहेत ती एकदा कि मोठी झालीत ना समजेल सार व आजी आजोबाच नाही लाड करणार तर कोण करेल बर जाऊ दे दुर्लक्ष कर .."
पण जयाला आता छोट्या छोट्या गोष्टितही एकत्र कुटुंबात दोष दिसू लागले होते .लोकांच मोकळ जगणं नवनविन वस्तुंची खरेदी स्वतःची मत असणं ...ह्या गोष्टीकडे ती आकर्षित होऊ लागली होती ...ती बाहेर गेली कि घरात दोन तीन दिवस तीचा बदललेला व्यवहार मेघा व तारामतीला जाणवू लागला होता ...सतत हातातल काम हिसकावून घेणारी जया आता मेघाला आँर्डर सोडू लागली होती ..
"माई तुम्ही करून घ्या हो ..एकढी काम ,किंवा मला निट नाही जमत तुमच तुम्ही बघून घ्या .."
असे वाक्य तिच्या तोंडात येऊ लागली होती ...खरतर आधी कधीच जया अस वागत नव्हती पण बाहेरचा झगमगाट तिला वेगळ्या दुनियेत जाण्यासाठी खुणावत होता ...त्यामुळे मोकळेपणाचेच विचार सतत तीच्या मनात असल्याने वागण्यात ते जाणवू लागले होते..
गुण्यागोविंदाने नांदणणार्या जावांमध्ये तु तु मै मै होऊ लागली होती ..जया सासूबाईंनाही उलटून बोलु लागली होती ..तारामतीला आता घराच्या विभागणीची भितीच वाटु लागली होती ..
आज तारामतीने हि चिंता जयवंतरावांना बोलून दाखवली ,"अहो मला काय वाटत ना ?सारंग व जयाच बाहेर जाण बंद कराव बघा ..घरात आता तारतम्य राहिल नाही हो मेघा घरची मोठी सुन पण जया तीला काहीच समजत नाही आज तर हद्दच झाली बघा ...जया भांडलीच हो मेघाशी .."
,"हो का?मेघा काय म्हणाली मग काय कारण होत.."
"मेघा मला बघून गप्प बसली हो ..किरण काही कळल नाही बघा ..पण जयाला आज बाहेर जायचं होत अस वाटल मला ...मेघाला कसकस होती आंगात झाल असेल कामावरून ..सार काम ती मेघावर सोडून देते हो ..जरा सारंगशी बोलता का तुम्ही "
"काय म्हणता सरकार बायकांची भांडण ती मी कसा बोलू तुम्हीच निस्तरा कि .."
तारामती शांतच झाली तेही बरोबरच होत..आता पुढच्या वेळेस आपणच जयाला बोलायच तिने ठरवलं ..
पण जया तशी चालाख होती रात्रीच घडलेला सारा प्रकार रोज नवर्याच्या कानी टाकण्याची तिच्यात कला होती ...सारंग तसा बिनधास्त होता जया म्हणेल तसा वागणारा ...ती सागेल त्यावर विश्वास टाकणारा ..फण जया मात्र बदमाश त्याच्यासमोर छान छान वागणारी व तो गेल्यावर तीचे रंग दाखवणारी ...
क्रमःशा....
©®वैशाली देवरे
नाशिक जिल्हा ...
पुढे काय घडणार त्यासाठी वाचत रहा कथा धागे नात्यांचे...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा