Login

धागे नात्यांचे भाग-४

पारिवारिक नात्यांमधील किलिष्टतेचे चित्रण


आप्पा काय बोलणार ह्या विचारात सारंग होता .त्याने पटकन आवरलं .आप्पा घराबाहेरील पडवीत खाटेवर बसलेले होते ...घरातील बायका कामात होत्या मजूरही आप आपली काम करत होती .मुलही शाळेत गेली होती .व नितिन आता थोड्यावेळात कामावर निघणारच होता .

थोड्यावेळातच नितिनचा आवाज सारंगला आला .

"आई..मी येतो गं ..!"

सारंगला कळल होत कि दादाही गेला .म्हणजे आप्पा फक्त माझ्याशीच बोलणार आहेत.
जयवंतरावही बाहेर सारंगचीच वाट बघत बसले होते ...गोष्ट तशी छोटी होती पण कानावर पडलेल्या गैरसमजाला दुर करणही तितकच आवश्यक होत...

सारंगने आवरलं व तो आप्पांशेजारी जाउन बसला ...जयाच्या मनात तशी धाकधुकच होती .सारंग तिच्या मनासारखंच वागत होता .एकदा कि आप्पांनी त्याला समजवलं तर आपलं ध्येय संपेल...किती दिवस ह्या घरात व कुटुबांतील बंधणात गुंतायचं...सारंग तसा हुशार आहे अर्धा घरचा कारभार तर त्याच्या हातात आहे मग का?आपले कष्ट वाया घालायचे ...स्वतःच कमवलं तर ते एकट्याचच राहाणार येथे ..सगळ्या गोष्टिंनाच वाटेकरी व सतत मोठा मान देत बसायचा ..आप्पा बोलायला लागलेत तर आपणही सारंगला साथ द्यायची व सोक्षमोक्ष लावून टाकायचा ह्या उद्देशाने तिची नजर सतत बाहेरच होती ...

सारंग आप्पांकडे गेला तसे आप्पा हलकेच हसले .सारंग जरा गोधळलाच ...पण तोही हसला ..उभ्या असलेल्या सारंगकडे बघत आप्पा

म्हणाले ," अरे बस खाली बापाशेजारी बसायला लाज वाटते का?.."

सारंगने खाली मान घातली व मानेनेच नकार देत तो आप्पांशेजारी बसला ...

"बोल काय ?म्हणतोस .."

"काही नाही आप्पा तुम्ही म्हणालात ना ?तुम्हाला बोलायचं माझ्याशी ..म्हणुन आलो मी .."

"हो ...मला बोलायचंच आहे .पण आधी तु बोल बाबा काय ?म्हणणं आहे तुझं ...सध्या तु व सूनबाई जया बरेच नाराज आहात आमच्यावर.."

सारंगला जी भिती होती तोच विषय निघाला ...

" आप्पा नाही हो ..!,कोण बोलल तुम्हाला ...तस काही नाही .."

"काय आहे सारंग कोण बोललं ह्यापेक्षा आपल्या परिवाराची आता गावात चर्चा रंगू लागली हेही नवलच आहे ना ?...काय आहे बाबा तु व तुझ्या बायकोला आम्ही सर्व काही सूट दिली ...नितीन तर वेगळाच आहे ...मेघा व नितीनला घरच भल्लच दिसत ना मित्र मैत्रिणी ना घराबाहेर जाणं...मग काय ?बाहेर जाणारे तुम्ही दोघं...घरातल्या बारिकसारिक गोष्टी आता चौकात येऊ लागल्यात त्यामुळे चिंता वाटू लागली बघ.."


सारंग शांत बसला होता..आप्पा बोलत होते...जयाची नजर बाहेर घिरट्या घालत होती ...

"सारंग खर सांगू सारे मुख्य व्यवहार तुझ्याकडे आहेत बाबा ..त्यामुळे सुनबाईचा घरातला रोष वाढला आहे बर का?...आरे कधी मोठा आवाज येत नव्हता ह्या घरात आता ..स्वयंपाक काय व मुलांमध्ये काय तुझ माझ येऊ लागल बाळा ..मी मोठ्या जिद्धीने हे सार उभं केल रे...काल गावात गेलो तर गंगा आण्णा म्हणाला ,"जया तुझा सारंग हिशोब देतो का?रे ,निर्णय तो घेतो कि तु .....मी ऐकलं सार सारंगच्याच जीवावर चाललयं हे घर ...सारंग हुशार आहे व कमवता तो एकटाच नितिनला काय?जमतं ..म्हणून तर घरचा...मुख्य व्यवहार सारंगच्या हातात आहे...मी तर शांतच झालो बाबा ..नितिनदादा थोडा भोळा आहे व कामसू ..त्याने कधी व्यवहारांबद्दल मला बोलला नाही माझा शब्द त्याच्यासाठी एक पक्की रेघ ..तो भला व किम भल ..कधी कमी पडलं याची तक्रार नाही ..मेघाही तशीच शांत मोठी सून शोभावी अशी ...त्यांच्या मुलिंचाही विचार ते करत नाहीत रे ...मग ह्या सार्या गोष्टी घराबाहेर जातात कशा .."

"काय ?आप्पा म्हणजे मी बोललो अस म्हणायचं का?तुम्हाला .."

"तसं नाही ..तु चुकिच समजतो आहेस ..मला फक्त ऐकच सांगायचं...सारे व्यवहार जरी तुझ्याकडे असलेत तरी नितीनचे कष्ट कमी नाहीत रे ...तुझ्यावर नाही तर नितिन व मेघावर घर एकत्र आहे ...तुमची दोघा नवराबायकोची सुट बघता तुम्ही दोघे जसे वागता ना?तस वागणं त्यांच हवं बघं...तुम्ही चौघ मुलांमध्ये फरक करायला लागलीत हेच अगोदर मला खटकलं...तु ह्यावर्षी मुलांच्या शाळा बदलल्या ...अरे एकत्र वाढणारी भावंड वेगळी झाली ...तुझ्याकडे पैशांचे व्यवहार त्यामुळे तू निर्णय घेऊन मोकळा झाला ..नितीनला मुलांची शाळा बदलायची तर मला विचाराव लागल असत नंतर तुझ्याकडून पैसे घ्यावे लागले असते मग सार झाल असत ..समजत ना काय ?म्हणायचं ते ...व्यवहार तुझ्या हातात आहेत तर तु मालक समजायला लागलास असं मला वाटल बघं.."

सारगंला जरा लाजच वाटली ..तो म्हणाला ,"आप्पा जयाची इच्छा होती मुल दुसर्या शाळेत टाकायची ...तिकडे तिच्या बहिणीची मुलं आहेत..मुलांनाही तिकडेच जायच होत म्हणून घेतला तो निर्णय ..व मला वाटलं तुम्ही काही बोलणार नाही .."

"नाही रे ..मी काही बोललो नसतोच जर चौघही नातवंड माझी त्याच शाळेत गेली असती ..पण तुझ्या मुलांचे मावसभाऊ तिकडे आहेत म्हणुन तु ह्या भावंडाची ताटातुट केली याच काय?...बरोबर वाढतांना तुझमाझ नव्हतं रे त्यांच्यात..आज बघ मुल त्यांच्या त्यांच्या रूममध्ये बसतात...जरा विचार करत जा ...काय करतो त्याचा.."

सारंग म्हणाला ,"चुकलं आप्पा ..जरा घाईच झाली मी दादालाही विचारायला हवं होत...जाऊ द्या पुढच्या वर्षी टाकू त्याच शाळेत दिशा व यशला .."

"नको आता त्यांना कस शिकवायचं ते मी बघेल .."

आप्पांचा संतापलेला चेहेरा बघून सारंग जरा घाबरला होता ..

\"सारंग ह्या तर छोट्या गोष्टी आहेत रे ...पण महत्वाचा मुद्दा बोलतो आता .."

सारंग जरा थरकला ,"कोणता मुद्दा आप्पा.."

"मी मुळ मुद्यावरच येतो...तु म्हणे तालुक्यात घर बुक केल ...व पुढच्या वर्षी तुला तिकडे जायचं आहे राहायला पझेशन भेटल्यावर.."

आप्पा बोलताच सारंग जागेवरच उभा राहिला ..

"काय रे काय विचारतो मी ..खर आहे का?हे .."

सारंगला काही सुचतच नव्हत काय बोलावं ते ..कारण व्यवहारात थोडासा डल्ला मारून आप्पांपासून लपवत ..मित्रांसोबत त्याने घराचा व्यवहार केलेला होता..घर घेतल्याने जयालाही जरा हिम्मत आली होती ...जरी भांडण झाल तर आपल्या हक्काच्या घरात जायचं व मुल तर आधीच दुसर्या शाळेत घातलीत त्यामुळे काही टेन्शन नव्हतंच...

सारंगच्या आंगाला घामच फुटला होता ..चार वर्षापासून घर व आपली आवड जपणारे आप्पा फकात महिन्याला हिशोब बघत मग हा व्यवहार त्यांना कळला तरी कसा...व आता खोट बोलण सोप  नव्हत व खर बोलण्याने तो आटकेल हि भिती..

बर्याच वेळ शांत बसलेल्या सारंगला बघूध आप्पांची खात्री पटली होती कि याच घर खरच झालयं...आप्पा जोरात ओरडले...

"काय विचारतो मी जे बोललो ते खर आहे का?.."

सारंगने मानेनेच होकार दिला ...

जयवंतरावांचा चेहेरा रागाने लालेलाल झाला होता ...

"अरे सारंग मला वाटल नव्हत रे ..तु जिवाभावाच्या भावाशी असा दुय्यम वागशिल..अरे तुझे लाड केलेत व तु अस चोरून तुझी संपत्ती वाढवतोस..आरे नितिनचाही संसार आहे रे...त्याची तर मुलगी आहे..मी आजवर कोणावर आन्याय नको म्हणून तिच्या..नावावर एक रूपयाही टाकला नाही..बाप म्हणून जरा आपराधी वाटु लागल रे मला....एका शब्दाने मला सांगावस वाटल नाही तुला ...आणि चल केल सार हे सर्व कांड पण भिती नाही का?रे वाटली आईवडिलांना समजलं तर त्याच काय?होईल म्हणून...माझा विश्वासघात केला सारंग तु .....आता कसा रे विश्वास ठेवू तुझ्यावर ....".

आप्पांचा संताप होत होता व सारंगला आपण केलेल्या गोष्टींची लाज वाटत होती ...

"आप्पा चुकलं माझ ...मी तुम्हाला सांगायला हवं होत ...मी तुमच्या संस्काराचा मान नाही ठेवला ...दादाचाही गुन्हेगार आहे मी ...आप्पा दादाला कळल तर मोठ बवाल होईल हो ..!,सांभाळून घ्या तुम्हीच ..आता पुन्हा असे चोरिचे व्यवहार नाही करणार मी ,तुम्ही म्हणाल तसच वागेल हवतर सारे व्यवहार मी परत देतो तुमच्याकडे ...चुकलं माझं आप्पा.."

सारंगने त्याची चुक मान्य केली होती .खरतर तोही तितका स्वार्थी नव्हताच ...पण जयाच्या कारस्थानाचा व मित्रांच्या बोलण्याला भुलला होता ...कुटुंबात असे एकांकी व्यवहार म्हणजे स्वार्थीवृर्ती त्यात वाढु लागली होती ...व ते त्याच्याही लक्ष्यात आल होत...


क्रमःशा...

पुढच्या भागात बघु आप्पा काय निर्णय घेतात ...


राज्यस्तरिय करंडक कथामालिका

कथेचे नाव -धागे नात्यांचे भाग-४