Login

धागे नात्यांचे भाग -१०

पारिवारिक नात्यांमधिल किलिष्टतेचे चित्रण


जयवंतरावांना आता मोठा मुलगा नितिनचाही विचार घ्यावा लागणार होता .जरा व्यव्हारात कच्चा असला तरी प्रामाणिक होता तो .सारंगच्या सर्व गोष्टी त्याच्यापर्यन्त पोहचल्या होत्या कि नव्हत्या हे कोणाला ठाऊक नव्हत पण नितिनवर आन्याय झालाय ह्याची खंत जयवंतरावांना वाटत होती .सारंगचा बदलता स्वभाव त्याची व्यसनाधिनता आता त्याला बदनामीला कारक ठरत होती .

*******

दुसर्या दिवशी सकाळीच कोणाला न सांगताच सारंग घराबाहेर गेला .जयाच व त्याच रात्रीच थोडस वाजल होत .इतके दिवस आपल समजलेली माहेरची माणस आता जया व सारंगला टाळू पहात होती .बहिण ,भाऊ ,मेहुणे जया व सारंगचा फोनही उचलत नव्हती ...त्यामुळे सारंगसोबत जयाही आता चिंतागस्त होत होती .घरच्यांना चोरूण ठेवलेल सारच माहेरच्या माणसांनीच बळकावल्याने तोंड दाबून बुक्याचा मार अशीच गत झाली होती तिची ...सासरी आज आप्पा काय? निर्णय घेतील ...ह्याचीही चिंता होतीच...जया घाबरलेली होती. तोच जयवंतरावांनी सारंगला आवाज दिला .

"सारंग ..उठला असशील तर ये बाहेर नितीन थांबला आहे,त्यालाही कळू दे तु काय दिवे लावलेत ते .."

आप्पांच्या आवाजाने नितिनही बाहेर आला.तस घरात काय घडल होत याची त्याला कल्पनाच नव्हती .रात्री मेघाने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला पण नितिनने मेघाच्या बोलण्याकडे लक्षच नाही दिल.आप्पांचा आवाज ऐकताच तो लगबगिने आप्पांजवळ येऊन उभा राहिला .

"काय ?झाल ..आप्पा ,काय केलं सारंगन ,तुम्ही चिडू नका .समजवतो हो मी "

नितिनच बोलण ऐकून ते अधिकच भडकले,

"काय ?समजवशील तु ,तुलाच समजवायला लागणार आहे मला ...कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीच नाही ठेवलं त्या नालायकाने बघ आजूनही निर्लजसारखा रूममध्ये लपुन बसला ..."

"आप्पा शांत व्हा व मला सांगा तरी काय?झाल ते .."

"कोणत्या तोंडाने सांगू रे पोरा ..."

आप्पांचा हातानपणा नितिनला जाणवथशत होता ..

"आप्पा बोला ना ?काय केल सारंगने "

"अरे दादा ,त्याने सार लयास मिळवलं रे सार बरबाद केल आपल्याला ...आपल्याला चोरून संपत्ती घेतली व सासरच्याची घर भरली ..आता तेच नाकबूल झाले तर तो दारूच्या नादी लागला रे ...तुला नाही का?रे कळलं हे सार... एकाच ठिकाणी असतात ना रे तुम्ही .."

"काय?"

आप्पांच बोलण ऐकून नितिन दचकलाच ..

"आप्पा थोडाफार मौजमस्ती अगोदरपासून करत होता पण हा घोळ कधी कळला नाही हो ..!..मेघा म्हणत होती पण मीच लक्ष दिल नाही बघा ...आप्पा तुमचा त्याच्यावरचा आंधळा विश्वास आपल्याला घेऊन मिळाला हो..!.तुम्ही सतत त्याला माझ्यापेक्षा जास्त सरस समजत होता ना ?बघा तुम्हीच .मी फक्त राबत बसलो हो ..घाण्याच्या बैलागत ...कधी कुटुंबाचा व बायकापोरांचा विचार नाही केला ...ह्याने मज्जा केली ..सासरवाडीला पोसल व सार गमावलही ...आता अंगावर आल तर दारूचा सहारा घेतला बघितल ना?.मला कळल होत काही दीवसांपुर्वी पण तुमचा लाडका पोरगा मी बोललो असतो तर विश्वास ठेवला असता का?तुम्ही माझ्यावर ...आणि खरतर मी काही त्याच्यावर नजर ठेवत नव्हतो आप्पा .तो काय मोठा माणुस मला बघूनही लाज वाटते त्याला .."

नितिन संतापला होता खरा पण तो सारंगवर नाही तर जयवंतरावांवर ...आप्पा सारंगचीच वाट बघत होते .तोच समोर जया आली ...

"आप्पा हे घरात नाहित हो ..!कधी बाहेर निघून गेलेत कळलच नाही बघा मला ..रात्रीपासून खुपच घाबरलेले होते हो."

आप्पांचा आता तोराच फिरला होता सार्या गोष्टीला कारणीभूत जयाच होती .मार्ग दाखवणारी जया व जयवंतरावांच्या घरात खेळ करणारे नातलग सारेच ओळखून होते जयवंतराव पण आपला मुलगा ईतका लोकांच ऐक्या होईल अस कल्पनाच नव्हती त्यांना .जयाला बघताच ते अजुनच चिडले.

"झाल ना?तुझ समाधान हसत खेळत घर बरबाद केलस गं पोरी .बघ तुच बघ आता किय आवस्था झाली नवर्याची ..अगं भेदरला ग तो आता सावरला तर सावरेल नाहीतर हातचा घालवू गं..कस सावरायचं आता त्याला ...पैशांच नुकसान भरून निघेल गं पण पोरगं सुधरेल का?आपल्याच लोकांनी दगा दिला त्याला नात्यांवरचा विश्वास उडाला बघ ..नाही सोडणार ग सहजा सहजी दारू .."

आप्पा संताप करत होती .तारामती फक्त रडत होती .दृष्ट लागण्यासारख घर होत खरच दृष्ट लागली होती .सारा परिवार विस्कटला होता.नितिनही आता थोडाका असेना वेगळाच वागणार होता ..

वेळ सावरत नितिन बोलला ,

"आप्पा आई तुम्ही शांत व्हा मी शोधतो सारंगला व सापडला कि आणतो घरी मग बघू काय करायचं ते .."

नितिन तसाच घराबाहेर पडला .त्याच्याही डोक्यात हजाल प्रश्न होते.

"खरच ह्याच्या सासरवाडीच्या लोकांनी दगा दिला का?हा आजही सोंग करतो .पिऊ लागलो तर वाटणी होईल मग आनंदात राहु असतर कारस्थान नसेल ना?आजवर इतक हुशारीने वागला आताही दोघ नवरा बायको हुशारी दाखवत नसतील ना?...असंख्य प्रश्न मनात घर करत होते ..पण ह्या क्षणाला सारंग सापडण जास्त महत्वाच होत.

नितिने सार शहर पालथ घातल तरी सारंग सापडत नव्हता सारंगच्या मित्रांनाही तो कुठे आहे हे ठाऊक नव्हतं...पण भावाच्या काळजीत नितिन सारंगला  सैरावैरा शोधत फिरत होता .अखेरीस सायंकाळी एका बारमध्ये चिंगलेल्या आवस्थेत एकटाच एका कोपर्यात पडलेला सारगं नितिनला सापडला .

नितिनने सारंगला गाडीत टाकल व घराच्या दिशेने निघाला मनात असंख्य विचार गर्दी करत होती.काय रूबाब होता सारंगचा दहा बारा जण मागेपुढे करत असत सारंगच्या व आज बेवारस सारखा एका कोपर्यात पडलेला भावाला बघून त्याला गहिवरून आलं.कुठे चुकलं असेल त्याच का?बायकोच्या आहारी गेला असेल हा ..नाना प्रश्न होते पण त्याच उत्तर फक्त आणि फक्त सारंगकडेच होत .व ते तो त्याची दारू उतरल्यावरच देणार होता.नितिनने सारंगला घरी आपलेल बघताच आईला भरून आलं

"भाऊ तो भाऊच हो...भावाच दुःख तोच जाणु पाहे ...परके काय लक्ष देणार .वाट लावली हो हुशार पोराची .."

तारामती रडत रडत बोलू लागली पण जयवंतराव म्हणाले,"तुझा पोरगाही नालायकच ना?त्याने परक्यांच ऐकल तोच खरा त्याच्या परिस्थितीला जबाबदार बघ ...लोकांना बोलून काय फायदा .."

आप्पांच्या बोलण्याला नितीननेही दुजोरा दिला .जयाला सारंगची आवस्था बघून स्वतःचीच लाज वाटत होती .थोडासा हव्यास होता पण आपलेच पलटतील अस स्वप्नातही वाटत नव्हत तीला आज माहेरच्या माणसांनी तील दगा दिला होता व सासरीही सगगळ्यांच्या नजरेत ती उतरली होती.


क्रमःशा

(सारंगच पुढे काय? होईल.नितिन काय निर्णय घेईल.कसा सावरेल परिवार त्यासाठी वाचत रहा धागे नात्यांचे ..)

©®वैशाली देवरे
राज्यस्तरिय करंडक कथामालिका
सामाजिक कथा
जिल्हा -नाशिक