नितिनचा परिवारावरचा आतुट विश्वास व मेघाचा संयमपणा ...दोघेही परिवारात वेगळीच होती .माहेरची मोठी ,लाडात वाढलेली ,कुटुंबातील मोठी मुलगी ...माहेरी भल्ल मोठ कुटुंब ...त्यामुळे तीच्या पाठच्या बहिणभावांची तिलाच काळजी ...जरा जरी मेघाचा पाय वाकडा पडला व परिवारात तिच्यामुळे कलह झाला तर लग्नाला आलेल्या बहिणींचे लग्न कसे होतील हिच चिंता तिच्या मनी असायची ...मग काय काही झाल तरी शांत बसायच असच होत तीच त्यात नवरोबाही त्याच्याच विश्वात मग मेघाला विचारत कोण?..
आता तर तीने सारा विचार करणच सोडलं होत जे होईल ते बघू तेव्हाच्या तेव्हा असच मनाला समजवल होतं..पण दोन दिवसापुर्वी माहेरच्या एका कार्यक्रमात तिची काकू मेघाला बोलली,
"माई...अगं तुझ त्या घरात काही चालत नाही गं.!.तुझी जाऊ किती चलाख ..मागच्या महिन्यात तिच्या मावशीकडे भेटली अग काय सांगू नुसता छोटा कार्यक्रम होता तरी कपडे लत्ते घेऊन आली होती व तु अस हात हालवत येतेस ..उद्या जाव ई यायचा तुला ...तु जे पेरशील ते उगेल ना ?मझा राग येईल तुला पण आपल्या घरात असा दुधाभाव नसतो हं..!,तुझी सासुसासरे कधी कोणाकडे येत जात नाहित व करणीला पण नाहीत त्यांनीच हे लक्ष्यात ठेवायला हवं.."
काकू बोलल्यापासून मेघाही घरात शांत शांतच वावरत होती ..तारामतीला काही सुचत नव्हतं ...ईतके दिवस दोघी सुना
"आई आई "
करत थकत नसत पण आता दोघीही त्यांच्याच विश्वात असत ..काम आवरलीत का ?त्यांच्या रूममध्ये बसत...आता घर फक्त एक गरज म्हणूनच उरल होत.हे जयवंतरावांच्याही लक्ष्यात आल होत ..पुर्वी एखादी गोष्ट करतांना दहावेळा विचारणारी दोघी मुल आता एका शब्दाने विचारत नव्हती .
."आप्पा"शब्द आता कधीतरी एकायला येउ लागला होता ..घरातली नातवंडेही आईवडिलांनी त्यांच्या सोईने घराबाहेर शिकायला पाठवली होती ...नितिन व सारंगचा मैत्रपरिवार वाढु लागला होता ..जसा व्यवसाय वाढत होता तसा दोघांचाही आत्मविश्वास वाढत होता ..स्वतःचे निर्णय आता स्वतःच घेऊ लागली होती .
आज आप्पा तारामतीवर चिडले होते,"सरकार हे सार विश्व मी उभं केल ..पण तुमचे दोघे सुपुत्र मला काडीचीही किंमत देत नाहित हो..!,आजवर दोघेही हिशोब होऊन आणुन देत पण गेली वर्षभर मला दोघांनीही हिशोब दिला नाही ...आपण दोघे आपल्या खोलीत व दोघ सूना त्यांच्या खोलीत ..मुले घराबाहेर...कोण केव्हा येत केव्हा जात कळत नाही ..सण सोडला तर कोणी कोणाला विचारत नाही हो..!"
तारामती म्हणाली,"अहो पोर मोठी झालीत त्यांच्या पोरांची जबाबदारी पडली त्याच्यावर नातवंड होती घर गजबजलेल असायचं ..आता पोरच नाहीत मग काय करतील सारे ..दोघांचा येण्याचा टाईम वेगळा असतो त्यामुळे जो तो आप आपल जेवून घेतो ...काहिही विचार करतात तुम्ही ...नाही हिशोब देत ना ?..मग देवून टाका सारे कारभार त्यांच्याकडे.."
"काय ?..अग ऐडी झालीस का?सार देवून बसलो ना ?आपल्याला काडीचीही किंम्मत देणार नाहित हे ..मी माझ्या जीवात जीव असेपर्यन्त दोघांना काहीच देणार नाही ..माझ्याच नावावर राहिल सार.."
"बघा तुम्ही असे व ते तसे ..तुम्हाला जे योग्य वाटत ते करा ..पण कटकट करत बसू नका बर.."
आप्पा शांत बसले पण ही धोक्याचीच घंटा होती .वयापरत्वे नात्यांमध्ये आता स्वार्थ भिनू लागला होता ...आता वयाच्या पंन्नाशित मुलांनाही गावातले व समाजातले चमचे कान भरू लागली होती ...सारंग तसा खुपच चुलबुला मग काय ?सतराशे साठ मित्र व मौजमस्ती हा त्याच्या आवडता छंद झाला होता...
नितीन तसा भोळा होता पण चार पैसे जमवण जमत नसे त्याला , नको त्या गोष्टी करतांना जयवंतरावांचे कष्ट व त्यानी केलेल्या त्या़गाचा सतत विचार करत असे...कधी कोणत्याही व्यसन तो गुंतला नाही ..पण सारंग मात्र आता दारू व लवकर श्रीमंत होण्याच्या मार्गावर लागला होता .
बरेचदा अस होत सुखी कुटुंब लोकांची नजर वेधून घेतात पण कोणाच्या घरात जर सुख नांदत असेल तर त्या घरात काड्या लावण्यासाठी शकडो लोक पुढे येतात त्याचाच प्रत्यय आता देशमुखांकडे येऊ लागला होता...सारंगच आता बाहेर राहाण वाढलं होत प्रसंगी दोन दोन दिवस तो घरीही येत नव्हता...
इतके दिवस नवर्याला साथ देणारी जया पुरती गोंधळली होती ..तीच्या माहितीच्या लोकांकडून सारंग नको त्या चुकिच्या वाटेवर जातोय हे तीला समजलं होत...पण नवर्यालाच विश्वासात घेऊन आपण हे कोड सोडवायच व जर जास्तच झाल तर घरात बोलू अस तीने ठरवल..सारंगचा स्वभाव ती चांगलाच ओळखुन होते...खरतर छानछौकी व स्वतःच खर करणारा असा होता सारंग...
नियतीचे चक्र आता उलटे फिरू लागले होते.जया व सारंगने डोक्याचा वापर करत नको तितकी संपत्ती जमवली होती खरी ..पण ती सगळ्यांपासून लपवून व जयाच्या माहेरच्यांच्या नावावर ...त्यामुळे जवळ होत पण तोंड दाबून मुक्यासारख जगणं होत दोघांच ...आता सारंगला शोक जडल्याने नको त्या संकटाची सुरवात होते आहे याची जयाला जाणिव होऊ लागली होती ...आज काहि झाल तरी सारंगशी बोलायचं व सार समजून सांगायचं तीने ठरवलं होत...
क्रमःशा
©®वैशाली देवरे
राज्यस्तरिय करंडक कथामालिका
विषय - सामाजिक कथा
कथेच शिर्षक - धागे नात्यांचे
जिल्हा -नाशिक
विषय - सामाजिक कथा
कथेच शिर्षक - धागे नात्यांचे
जिल्हा -नाशिक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा