सारंगचे बदलते रूप व व्यसनाधिनता जयाच डोक सुन्न करत होत...काहि वर्षांपुर्वी जया म्हणेल ती पुर्वदिशा समजणारा सारंग आज जया काय ?पण आई वडिल व भाऊ यांच्याही मनाचा विचार करत नसतो.मित्र ,नातलग व त्याच्यासोबत फिरणारे हेच त्याच जग झाल होत ...काळाने आता पलटी मारली होती .
रात्री उशिरापर्यन्त जागत जया सारंगची वाट बघत होती .आज तीला सारंगला समजवायचच होत.येवढ्या मेहनतीने म्हणा किंवा कपटाने कमवलेल्या संपत्तीला खिंडार पडण्याआधीच ते जपावं लागणार होत...
बघता बघता एक वाजला होता.सारा परिसर शांत होता.पण सारंगचा घरी पत्ताच नव्हता ..जयाच्या मनात असंख्य प्रश्नांनी घर केल होत..खरतर सारंगच पिण आजच नव्हत पण जेव्हा तो पित होता तेव्हा तीने कधी आडवलच नव्हतं...व त्या कमी व्यसनाच आता मोठ्या प्रमाणात घेण सुरू झालं होतं...जयाचे डोळे सारंगच्या येण्याकडे खिळले होते मनाची धागधुग व बेचैनीने आंगाला घाम फुटला होता तोच गाडीचा आवाज आला...जयाने खिडकीतुन डोकावून बघितल तर सारंगला चालताही येत नव्हतं...बरोबर दोन जण सोबतीला होते ..तीने पटकन दरवाजा उघडला ..सारंग व माणसांच्या आवाजाने घरचे जागे झालेत तर नको तो तमाशा होणार होता म्हणुन...जया झपझप करत गाडीजवळ गेली सारंगचा हात खांद्यावर टाकत ती त्याला रूममध्ये घेऊन आली ..सोबतीच्या मित्रांचा तिला खुपच राग आलेला होता ...सारंग तर नशेत धुत होता ...
"वहिणी आम्ही नेतो ना?आत "
एकाने म्हणताच ..जया चिडलीच ,"इतकी का?पाजावी कि समोरचा चालूही शकणार नाही "
दोघांनाही जयाचा रोष कळला होता .पण तेही पिलेले तेच बडबडू लागले ..जयाने हातानेच त्याना जाण्याचा इशारा केला ..
दोघांनाही जयाचा रोष कळला होता .पण तेही पिलेले तेच बडबडू लागले ..जयाने हातानेच त्याना जाण्याचा इशारा केला ..
कसतरी रूममध्ये आणत तीने सारंगला झोपवल .आता तर कहरच झाला होता स्वतः घरी येणारा सारंगला आता दुसर्याच्या आधाराची गरज पडु लागली होती ...आता नशेत बेधुंद सारंगशी काय?बोलणार होती जया .मन घट्ट करुन ती शांत पडली ..तशी आर्धी रात्र सरली होती दोन/तीन तासात तांबड फुटणार होत.
चिंता व मनाच्या बेचैनीने जया रात्रभर झोपली नव्हती.सकाळ झाली तशी ती शांततेने कामाला लागली.
चिंता व मनाच्या बेचैनीने जया रात्रभर झोपली नव्हती.सकाळ झाली तशी ती शांततेने कामाला लागली.
कोणतही काम सांगितल्याशिवाय न करणारी जया आज सारेच काम चोख करत होती .सासू सासरे जावु ,जेठ सार्यांचा नाश्तापाणी सारच करून झाल होत पण चेहेर्यावर चिंतेची एक काळी छाया पडलेली होती ...सारंगशी स्वतः बोलावं कि घरच्यांना कल्पना द्यावी ..ह्या द्वदांत ती आडकली होती ..तसे नऊ वाचत आले होते ती बेडरुमच्या दिशेने चालू लागली.मेघाला जयाचा चेहेरा बघून काहीतरी झाल्याचा लगेचच भास झाला ..तीच मन राहवलच नाही ती जयाला म्हणाली,
"जया काय गं बर्याच दिवसांपासून बघते .तु शांत असतेस ,काही प्रोब्लेम आहे का?गं,भावजीही शंात शांत असतात...कधीचे तर नजरेसही पडत नाहित गं...स्वयंपाकही तसाच पडून रहातो ..जेवत नाही का?गं..कि तुमचे भांडण झाले म्हणून नाराज आहेत ...मी बोलू का त्यांच्याशी.."
जयाला भरून येत पण ती सावरते ,"माई तस नाही हो काम वाढल ना?तिकडे लेबर सोबतच जेवतात ते ..मी बोलते त्यांच्याशी तुम्ही समजता तस काही नाही हं..मी बोलवून आणते थांबा आज सोबतच जेवायला बसू.."
मेघाला नवलच वाटत .सारंगला अगोदरच जेवायला घालून पटकन कामावर काढुन देणारी जया चक्क बदलली ..तसा तीला आनंदच होतो.
जया खोलीत जाते तरीही सारंग झोपलेला असतो रात्रीच्या दारूचा वास रूमभर पसरलेला असतो ..डोळ्यांवरची तार अजूनही गेलेली नसते...जया सारंगला हलवते तसे त्याचे डोळे उघडतात
जया खोलीत जाते तरीही सारंग झोपलेला असतो रात्रीच्या दारूचा वास रूमभर पसरलेला असतो ..डोळ्यांवरची तार अजूनही गेलेली नसते...जया सारंगला हलवते तसे त्याचे डोळे उघडतात
"ऐ झोपु दे ग डोकं जड पडलं माझं.."
जया संतापते ,"डोकं जड पडेस्तोवर का?प्यावी ..चालता येत नाही ,बोलता येत नाही ,घरापर्यन्त लोक सोडायला येतात ...आता थोडीफार लाजही नाही वाटत का?..घरच्यांना कळलं तर?... रात्री कोणी बघितल नाही जर आप्पांनी बघितल तर घरातून हाकलून लावतील ते ...जरा आपलया आईवडिलांच्या ईज्जतीचा विचार करा..?"
संतापलेली जया भडाभडा बोलत असते पण सारंगही शांततेने ऐकत नसतो,"तु माझ्या घरच्यांचा विचार करतेस?.. अगं मी मज्जा मस्ती व पैसे लुटत होतो तेव्हा तुला गोड लागत होत...तु बदमाश व नालायक बाई आहेस व तु मला शहाणपणा शिकवतेस?"
दोघांचा वाद नको तितक्या टोकाला जाऊ लागतो.
जया म्हणते,
जया म्हणते,
"तुम्हाला अस नाही कळणार थांबा आप्पांनाच सांगते ?तेच काय तो सोक्षमोक्ष लावतील.."
सारंग आता चिडतोच ,तो म्हणतो,"जा सांग आप्पांना मिही तुझे कारणामे सांगतो...माझ्यासारख्या सरळ माणसाकडून तु खुप पाप करून घेतलीत त्याचीच शिक्षा म्हणुन मी या मार्गाला लागलो बघ... अग देवासमान नात्यांशी गद्दारी केली मी तुला नाही समजायचं...जा हिम्मत असेल तर सांग मी ..दारू पितो व उशिरा येतो ते .."
जया शांत बसते ती पुरती अडकलेली असते.कधीतरी अतीलोभाने केलेल्या चुकिचेच हे फळ असेल का?हा विचार तीच्या डोक्यात घोळू लागतो ..ती स्वतःचे डोळे पुसत रूममधून बाहेर पडते ..
इकडे मेघा आप्पा व आई त्या दोघांची जेवणासाठी वाट बघत असतात जयाला एकट बघून तारामती म्हणते
इकडे मेघा आप्पा व आई त्या दोघांची जेवणासाठी वाट बघत असतात जयाला एकट बघून तारामती म्हणते
"जया काय गं..सारंग नाही आला तुझे आप्पा थांबलेत जेवायला .."
जया मानेनेच नकार देते ,"जरा तब्बेत बरी नाही त्यांची तिकडेच आण बोललेत ते .."
जयाच्या ह्या बोलण्याने तारामती सारंगकडे जायला निघते पण आप्पा थांबवतात..
"अहो सरकार देवू द्या तिकडेच ..बर नाही ना ?त्याला तुम्ही गेलात तर बेचैन होईल जेवण झाल कि दोघ सोबत जाऊ तिकडे.."
जया "हो ..तुम्ही जेवून घ्या व जा "म्हणुन बोलते.
सारंगच वागणं व त्याच पिणं सारचं आप्पांना माहित असत पण जयाने येऊन बोलावं हिच अपेक्षा असते.तीने केलेल्या सार्या चुका आप्पांना माहिती असतात..सारंगच रात्री येण बरेचदा त्यांनी बघितलेल असतं...पण कारण नसतांना फटकारणही त्यांना योग्य वाटत नाही आज वेळ आली अस समजून ते पटकन जेवण करतात व सारंगच्या रूममध्ये जातात...
आप्पांना बघताच सारंग दचकतो,वडिलांचा मान व दबाब त्यांचा मान आजही दोघे भाऊ करत असतात..तो पटकन उभा राहातो .त्याच्या चेहेर्याकडे बघताच आप्पांचे डोळे मोठे होतात..
तोच आई म्हणते
तोच आई म्हणते
"सारंग..काय रे बाळा तुला बर नाही काय होत रे ...नितिनदादाला बोलवू का?तो नेईल तुला दवाखाण्यात.."
तो शांतच असतो तोच आप्पा म्हणतात,"सरकार काही घाबरू नका उतारा दिला का?बर वाटेल बघा त्याला .."
तारामतीला काही कळत नाही ..आप्पांच्या त्या शब्दांनी सारंगचे धाबेच दणाणतात... आजवर आपण आप्पांसमोर आलो नाहीत तरीही आप्पांनी कस ओळखल असेल हाच प्रश्न त्याला पडतो ..
"काय ?सारंग उतारा देऊ का?"आप्पा म्हणतात.
सारंग मान खाली घालून उभा असतो.
तारामती म्हणते,"अहो मला कळेल अस बोलाल का?..काय झाल ते सांगा ना ?तु तरी बोल ना?सारंग.."
"अगं तुझा मुलगा दारूच्या ओव्हरडोसने आजारी पडला बघ ...रात्री दारू पीला कि बर वाटेल त्याला .."
तारामतीच्या पायाखालची जमिनच ढासळते,सुपारीच व्यसन नसलेले संस्कारी दोघी मुलं व हे अस ...
आप्पा संतापतात.. अग गेली वर्षभर बघतो मी ह्याचा हिशोब नाही रात्री उशिरा घरी येतो जस कोणी बघत नाही ...चार दिवसापुर्वी मी शहरात गेलो तेव्हा कळल कि तुमचे चिरंजीव कामधंदा सोडून मित्रांबरोबर पार्टा करतात ..दिवसाधवळ्या पित बसतात म्हणे,सुनबाईला माहित असूनही त्याही लपवत होत्या ..जशी अभिमानाची बाब आहे ही ...माझ्या संस्कारांचा बोजबारा वाजवला याने ..अगं चार वर्षापुर्वी धंद्यात आफरातफर केली होती तेव्हा माफ केल होत गं आता काय?करू सांग तुच.."
तारामती डोक्याला हात लावून बसते..
"सारंग्या आरे माझी मान खाली घातलीस रे ..काय कमी पडल होत तु ह्या थराला गेलास रे...का?दारुच्या आहारी गेलास तु .."
सारंगला आपलीच लाज वाटते तो आईवडिलांची काळजी बघुन रडु लागतो...
(सारंगला दारुच्या आहारी का?जातो त्या परिस्थिती परिवारातील सदश्य कसे लागतात ..आप्पा काय?निर्णय घेतात त्यासाठी वाचत रहा ..धागे नात्यांचे )
क्रमःशा
©®वैशाली देवरे..
राज्यस्तरिय करंडक कथामालिका,
सामाजिक कथा
कथेचे नाव -धागे नात्यांचे
जिल्हा -नाशिक
सामाजिक कथा
कथेचे नाव -धागे नात्यांचे
जिल्हा -नाशिक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा