Login

धागे नात्यांचे भाग-५

पारिवारीक नात्यांमधिल किलीष्टतेचे चित्रण

राज्यस्तरिय करंडक कथामालिका

टिम ईरा नाशिक

सारंगला आता जरा धाकधुकच वाटत होती .सारे चुकिचे व्यवहार आप्पांसमोर यायच्या आत काहीतरी करायला हवं ,ह्याच चक्र डोक्यात डोळू लागल होत .जयवंतरावांनीही आता सारंगने काय?काय?व्यवहार केले आहेत ह्याची कुंडली काढायच ठरवल होत...

"आप्पा आता मी पुन्हा अशी चुक करणार नाही .जे करेल ते घराचा व दादाचा विचार करूनच करेल ...आप्पा अस करतो ना ?यशही आता नववीत आहे दादालाही एक प्लाँट बुक करतो ..पुढेमागे तो यशला कामी पडेल  ...माझी चुक झाली ती मान्य करतो पण विस्कळलेल मीच सावरेल आप्पा फक्त एक संधी द्या बस.."

आप्पांचा तसा सारंगवर विश्वास नव्हता पण संधी देण्यात काय? अडचण नव्हती .नितीनवर आन्याय होणार नाही हेच फक्त बघायचं होत ..

\""सारंग खरतर माझा विश्वासघात केलास तु पण एक संधी देतो बाबा तुला ...कोणतीही गोष्ट चोरून केलीली मला चालणार नाही व नितीनवर आन्याय झालेलाही ...राहिला त्याच्या घराचा प्रश्न तर हे घर तो मोठा आहे तर त्याचच राहिल ...नंतर त्याला काय?करायचं ते तो करेन...आता मला हिशोबही चोख हवा बर ...हि वार्निग समज ...जर मला काही काळबेर आढळल तर मी एक फुटी कवडी न देता तुला घराबाहेर काढु शकतो हं..!,मग जग व कमव तुझ्या हिम्मतीवर..."

सारंगने शांतपणे ऐकून घेतल .मानेनेच होकार देत तो निघून गेला ..जयाला काय?झाल हे जाणुन घ्यायचं होत पण उगाच वादविवाद नको म्हणुन सारंग सरळ कामावर निघून गेला ..रात्री घरी आल्यावर त्याने जयालाही समज दिली ..

"जया अग घरच्यांना डावलून आपण जमिन ,घर व बरीच संपत्ती जमवून ठेवली गं..खरतर किती साधेसुधे आहेत हे घरचे ..आपण त्यांना फसवतो आहोत आप्पांना घराच कळल गं ते शांत होते ह्रावेळेस पण सार कळलं तर बवाल होईल गं..आता तुही नमत घे बाई ...आस चोरीच पचवण महागात पडेल आपल्या तुझा हाताताईपणा जरा कमी कर घरात आई व वहिणीशी जमवून घे ..मुलांशी जरा प्रेमाणे वाग वहिणीला बघ जरा .."

जया चिडलीच "काय ?तुम्हीही ह्या जगात कोणी वेड नाही हं..!वहिणीच्या गळ्यात चार तोळ्याची नविन माळ आली ती माहेरहून आली का?..दादांच्या पैशातून तो विचार करा ......ऐवढे श्रींमंत  आहेत जसे ते चार तोळे सोन घालतील बहिणीवर .."

"अगं दिल आसेल आपण चोरी केली म्हणजे तीनेही केली अस नाही होत ..आता माझ्याकडून चुकिच्या गोष्टीची अपेक्षा करू नकोस बाई ..आधीच जे गोळा केल त्याचा सोक्षमोक्ष लावायचा मला ..आप्पांच्या नजरेत येण्याच्या आत...बघतो काहीतरी डोकं चालवावं लागेल.."

जया तशी चलाखच होती .

"अहो मी काय ?म्हणते माझी बहिण राणी आहे ना ?दाजीच घरचे पुढारी व एकुलते एक मग आपली जमिन त्यांच्या नावावर करू व नंतर बघू काय?करायचं ते ह्या कानाची खबर त्या कानाला होणार नाही व जमिन बळकावण्याचा प्रश्नही उरणार नाही त्यांचीही शेती आहे आपल त्यासोबत उत्पन्नही सुरू राहिल बघा पटत का?"

सारंगला जयाच म्हणणं बरोबर वाटत होत.मित्रांवर भरवसा टाकण्यापेक्षा सालीवरच टाकायचा ठरवलं व सार काही निस्तरायचं ठरवलं...

दुसर्या दिवशी सारंगने त्याच्या व जयाच्या नावावरची सारी संपत्ती सासरच्या लोकांच्या नावावर करायचं ठरवलं...त्या दिशेने जयाच आजारपणाच ढोग करत तीला माहेरी पाठवण्याचा प्लाँन करण्यात आला ..

****

दुसर्या दिवशी सारंगने व जयाने जयाच्या आजारपणाच नाटक चालू केलं...तारामती व मेघा जयाची काळजी घेत होत्या .पण जया म्हणाली ,"आई व माई तुम्ही माझी काळजी घेतात ना ?मला जरा आवघडल्यासारखं होत बघा ..अस करते आई मी थोडे दिवस माहेरी जाते म्हणजे कसं...तुम्हालाही चिंता रहाणार नाही व मलाही आराम मिळेल बर वाटलं कि लगेचच येऊन जाईन मी .."

सारंगनेही जयाच्या मताला दुजोरा दिला ,"आई बरोबर म्हणते ती असही वहिणीला किती काम असतात व तुही थकलीय जाऊ दे तीला ...वाटलंस मी सोडून येतो माहेरी ..".

तारामतीला काय बोलाव कळत नव्हतं .ती म्हणाली,"तुमचा निर्णय बाबा ,तसही आम्ही दोघी करतो आहोतच तुम्हाला नको असेल तर ये बाबा सोडून माहेरी ...पण तब्बेतीच कळवत रहा गं बाई आणि काळजी घे .."

"हो आई .फोन करत राहिण मी ..".

सारंग व जया आवरून सासरवाडीला गेलेत.

म्हणतात ना ?नाते हि भक्कम असतात जया व सारंगचा डाव कोणाच्याही लक्ष्यात आला नाही .मेघाने तर सारंगच्या मुलांनाही येथेच ठेवून घेतलं.जवळपास आठ दिवसात सारंग व जयाने सारी संपत्तीची व्यवस्थित विल्हेवाट लावली होती व जया बरी होऊन पुन्हा घरी आली होती ..

क्रमःशा

बघू आता काय?खेळ रंगतो ह्या नांत्यांमधे त्यासाठी वाचत रहा धागे नात्यांचे...

©®वैशाली देवरे...

जिल्हा नाशिक..

🎭 Series Post

View all