कालची रात्र तशी जयासाठी भारीच होती ..डोळ्याला डोळा लागत नव्हता.सारंगचा दारुतील आवतार बघून नितिनदादा काय?विचार करत असतील याचीच तिला लाज वाटत होती ...भावासाठी दिवसभर वनवन फिरणार्या नितिनदादांबद्दल तीच्या मनात वेगळीच जागा निर्माण झाली होती.माहेरच्या आपल्याच माणसांनी वार्यावर सोडलं पण हे सासरचे नातेच कठिण प्रसंगात तीला व सारंगला समजून घेत होती .दोषी तर सासरच्या लोकांचे होते पण त्यानीच तर समजून घेतल होत त्यांना आकांडतांडव न करता सार धीराने घेत होती.
उद्या काय संकट वाढुन ठेवल असेल ह्याच चिंतेत होती ती .आता कोणताही निर्णय घेतला तरी धीरान सामोर जायचं व हरवलेल आपलेपण पुन्हा ह्या देवमाणसाना जपायच असाच तीने निश्चय केला.सारंगला तर कोणत्याच गोष्टीची शुध्दही नव्हती .
****
सकाळ झाली तशी सारंगच्या चिंतेत तारामती रूममध्ये आली .कालच्या प्रकरणाने घरातील सगळेच नाराज झाले होते ..सकाळी सकाळी नितीनही आप्पांच्या खोलीकडे जातांना जयाने पाहिल होतं...
खरतर घराला आता आपल्यांनीच सावरण्याची गरज होती .सारंगची दोघही मुलच होती .पण नितीनची मुलगी लग्नाला आला होती .सारंगच्या ह्या वागण्याचे पडसाद मुल दुर असल्याने होत नव्हते खरे ...पण जर वाटणीचा विषय घेतला तर मुलांच्या मनावर आघात होण्याची शक्यता होतीच.सारंगने तसही सारच गमवून ठेवल होत वाचल होत ते सार नितिनच्याच वाट्याच होत.
लग्नानंतर इतक्या दिवसात नितिन मेघाशी घरासंदर्भात चर्चा करत होता ..
नितिनला मुलीची चिंता होती.सारंगला ह्या परिस्थितीत वाटा दिला तर तो अजूनच वाया जाईल व खानदानाची बदनामी होईल.भावाला वार्यावर सोडल म्हणतं समाज नितिनलाच दोषी ठरवेल .दिशाच्या लग्नाला विध्न येईल .चागली स्थळे मिळणार नाहीत .ह्याच गोष्टींवर दोघेही नवराबायको बोलत होती .
मेघा म्हणाली,"अहो भावजी चुकलेत मान्य आहे मला पण आता जयालाही कोण आहे हो तीला तर माहेरच्यांनीही तोडल ना ?.तीला वाटल असेल का?आपल्या माहेरच्या लोकांकडून असा दगा बसेल ते ...तसही त्यांची दोघ पोर आपल्यावर जीव ओवाळतात हो ..! आईबापाची शिक्षा पोरांना का?द्यावी .जर वेगळ काढल तर शिक्षण थाबेल हो पोरांच ...सावरतील भावजी व ह्या प्रकरणानंतर जयाही सुधारेल बघा ..आता आपण फक्त आप्पांना विश्वासात घ्यायला हवं हो ..! नका वार्यावर सोडू सारंग भावजींना .."
नितिनला मेघाच म्हणणं पटत होत .मोठ्या कुटुंबातली होती ती नात्यांची जाण होती तिला ..घरातले प्रकरण घरातच मिटवण्याचे धडे तीला बालपणापासूनच मिळालेले होते..
सकाळ होताच नितिनने आई व आप्पांशी बोलायच ठरवलं..
आप्पा तसे शांत व हाताश बसलेले होते .नितिनला बघताच ते म्हणाले,
"नितिन मला अस वाटत आता तुम्ही दोघांनी तुमचे तुमचे मार्ग निवडावेत बघा .तुझाही संसार आहे .सारंग बघेल काय करायचं ते .मी वकिलाला बोलावल आहे आजच वाटणी करून टाकू ..असही उरलेली संपत्ती तुझ्याच वाट्याची आहे ..माझ्या वाट्यातून थोडफार देतो मी सांरग्याला ..बाप आहे ना ? मी ..तुला काय ?वाटत ह्या निर्णयाबद्दल बोल बाबा .."
तारामती डोक्याला हात लावून शांत बसली होती .
नितिनला काय बोलावं कळत नव्हतं पण आज बोलावच लागणार होत.मनात हिम्मत बांधुन तो आप्पांना म्हणाला,
"आप्पा सारंग चुकला हो .नुकसानही केल मान्य आहे .फसला आप्पा तो , पण आता त्याला आधाराची गरज असतांना वार्यावर सोडण योग्य आहे का?..सासरवाडीनेच दगा दिला तर लागला असेल व्यसनाला आपणच सावरायला हवं हो..आपणही तोडल त्याला तर हताश होईल हो ..काय सांगता येत नैराश्याने जीवाच बरवाईटही करेल..दोन मुलांचा बाप आहे हो तो ..नका तोडू आप्पा त्याला आपल्यापासून आपणच सावरू त्याला .."
नितिनच भावाबद्दलच प्रेम ,समजदारी व परिवाराला सावरण्याचा विश्वास बघून तारामतीचे डोळे भरून आले होते..वडिलांचा उर भरून आला होता इतके दिवस ज्या नितिनला कमजोर समजत होते तोच परिवाराचा भक्कम कणा असल्यासारखी समाजदारी दाखवत होता ..
आप्पांना नितिनच म्हणणं पटत होत ..नितिनजवळ येत त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ..
"नितिनदादा वाटल नव्हत रे तु माझी चिंता दुर करशील ..सारंगही मुलगाच आहे माझा पण तुझ्यावर आन्याय होईल अस वागायचं नाही रे मला तु मोठा होतास तरी महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार मी सारंगला दिला ..सारंगने तुला दगा देउन संपत्ती जमवली ..त्याचीच लाज वाटते रे मला "
"अहो आप्पा त्यात तुमचा काय ?दोष हो ..!सारंग चुकला ना ?तुम्ही चार लोकांमध्ये वावरलेले तुम्हाला कळत होत कोण काय करू शकतो म्हणुनच तर तुम्ही मला महत्वाचे निर्णय घेऊ देत नव्हता ..आता सोडा मागचा विषय ..आपण सार डोक्यातून काढुन टाकू ..सारंगला ह्या व्यसनातून बाहेर काढू ...संपत्ती काय हो वर्ष दोनवर्षात कमवून घेऊ हो..जगाला हसू करण्यापेक्षा ..जगासाठी ,समाजासाठी आदर्श बनू हो आप्पा .."
आप्पांनी नितिनला कडकडून मिठी मारली .भरल्या डोळ्यांनी त्याच्या मोठेपणाच कौतुक केल.
"नितिनदादा तु आज माझा मान,लाज व परिवाराची इज्जत राखलीस बघ ...आता मी सारंगबाबत निर्णय घ्यायला मोकळा झालो रे ...कोणताही दबाब किंवा मनात कोणताही किंतु आता असणार नाही सारंग व जयाला सायंकाळी बोलवून मी माझा निर्णय सांगतो ..आता आपण एकजुटीने पुन्हा लढु बघ..पुर्वीचा सारंगही परतेल .ठेच लागलेला माणुस कोणतही काम इनामदारीने करतो सारंगही करेल.."
तारामतीच्या चेहेर्यावरही आनंद फुलला होता .आज मोठ्या मुलाने सारीच विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याच वचन दिल होत...नितिनच कौतुक होतांना बघता मेघाही आनंदी होती .पुन्हा घराच घरपण येणार होत फक्त् सारंगवर थोडीशी मेहनत घ्यावी लागणार होती ...
क्रमःशा.....
©®वैशाली देवरे
राज्यस्तरिय करंडक कथामालिका
सामाजिक कथा
कथेचे नाव -धागे नात्यांचे भाग ११
जिल्हा -नाशिक
सामाजिक कथा
कथेचे नाव -धागे नात्यांचे भाग ११
जिल्हा -नाशिक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा