Login

धागे नात्यांचे भाग -१

परिवाराचे वाढत जाणारे प्रेम व कालांतराने त्यात येणारी किल्लिष्टता ह्याचे चित्रण...


राज्यस्तरिय कथामालिका स्पर्धा
(सामाजिक कथा)

टिम ईरा -नाशिक

(हि कथामालिका आहे जयवंतराव सावंत ह्यांच्या परिवाराची ..
कथेतीलपात्र..जयवंतराव त्यांची पत्नी तारामती , मोठा मुलगा नितिन त्याची पत्नी मेघा ..मुलगा यश व मुलगी दिशा ,दुसरा मुलगा सारंग त्याची पत्नी जया व दोघे मुल दिप आणि निल  )

............................................................


आज सावंताच्या घरी आनंदाच वातावरण होत ..स्वयंपाकघरात गोडाधोडाच जेवण बनत होत ...पुरणपोळ्यांचा सुंगंध घरभर दरवळत होता ...जय ,दिप,यश व दिशा ...पडवीत त्यांच्या पध्दतीने आजोबांच्या  वाढदिवसासाठी सजावट करत होती ...तारामती नातावांचे काम नवलाईने बघत होती ...चारही भावंडे खेळिमेळीने व उत्साहात सार करत होती ...तोच जयवंतराव यशला  पडवीकडे येतांना दिसले ..

"आजी ऐ आजी जा गं तिकडे ...बाबांना सरप्राईस द्यायच आहे ना ? बाबांनी बघितल तर काय ?मज्जा राहिल .."
दिशा आजीला समजवत होती .तीच्या जोडीला जय ,दिप,यशही विनवणी करत होते ..

तारामती हसत जयवंतरावांच्या दिशेने निघाली .पोर त्यांच्या कामाला लागली ...तारामतीला बघून जयवंतराव म्हणाले ,"सरकार आज काय?सण आहे का?हो ..किचनमध्ये गोडाचा बेत रंगला व पोरांचाही गोंधळ नाही घरात..घर शांत वाटल म्हणून म्हटलं पडवीत खेळत असतील तिकडे बघावं..तिकडेच निघालो बघा ..तर तुम्हीच इकडे आलात ..नाहित का?पोर पडवीत .."

तारामतीने होकिरार्थी मान हालवली व लगेचच नकारार्थी ...

"अहो काय? हे नंदिबैलासारखी मान हलवतात ..पोर कुठे आहेत विचारतो मी ."

"नाही माहित ...गावात गेली असतील ..मीही नाही पाहिलीत बघा ..चला तुम्हाला चहा देते येतील थोड्यावेळात .."
म्हणत तारामती जयवंतरावांना पुन्हा घरात घेऊन गेल्यात...

आज जयवंतरावांचा साठावा वाढदिवस ..मुल,सुना व नातवंडांना धुमधडाक्यात साजरा करायचा होता.जयवंतरावांनी आजवर भरपुर कष्ट उपसले होते व हे वैभव उभ केल होत...भारदार शरिर ,भारदस्त आवाज व सत्याचा वसा घेतलेले जयवंतराव पंचक्रोशीत नावाजलेली आसामी .मुल व संसार जसा गोकुळावाणी सांभाळला होता .आजुनही सारा कारभार त्यांच्या हाती होता ..तारामतींची साथ तर लाखमोलाची होती ..नितिन व सारंग जयवंतरावांच्या शब्दाबाहेर नव्हते...दोघांनाही वेगवेगळ्या व्यवसायात जयवंतरावांनी गुंतवून ठेवले होते ...सुनाही खाणदानी व चांगल्या घरच्या संस्कारी भेटल्या होत्या ...दृष्ट लागावी असा परिवार होता.कमी होती ती एका मुलीची पण सुना आल्यावर ती कमी भरून निघाली होती व नात दिशाच्या जन्माने तीही पोकळी भरून निघाली होती .

सार छान चालल होत...नातवंडानी अप्रतिम सजावट केली होती .सुनांनीही त्याच्या परिने ५०/६० लोकांचा पंच्चपक्वांनाचा साग्रसंगीत स्वयंपाक केला होता ...दिवस हळुहळु मावळू लागला तसा सगळ्यांचाच उत्साह वाढु लागला होता... दोघेही मुल आज काम संपवून जरा लवकरच आली होती...नितीनने वडिलांसाठी छान पांढरा झब्बा व त्यावर खादीच जाँकिट आणलं होत व लगबगिने जयवंतरावांच्या दिशेने गेला ..त्याच्या हातातली पिशवी बघून जयवंतराव म्हणाले ,"काय रे नितिन काय आणलसं..?"

"आप्पा अहो तुमच्यासाठी ड्रेस आहे ,घालुन दाखवता का?"

"काय रे पोरा अरे कपाट भरलयं ना ?आजुन किती कपडे आणता रे तुम्ही राहु दे घालेल उद्या"

तोच सारंग म्हणाला ,"अहो आप्पा आत्ताच घाला कि पाहुणे येतिल मग घालाल का?...अहो तुमचा वाढदिवस ना आज, मग तुमची मित्रमंडळी बोलवलीत आम्ही घरी व तेच सरप्राईज होत..आता येतीलच व तयारीही झाली सारी ,आता काय लपवायचं नाही का?रे दादा "

नितिन जरा रागातच सारंगकडे बघत होता ..जयवंतराव हसले व म्हणाले ,"अरे माझा वाढदिवस मला कसा माहित नसणार मिही मज्जाच बघत होतो हं..! तुम्हा सगळ्यांची
मज्जा आली पण सरकार ...तुम्हीला वाटल तुम्ही मला दिवसभर  फिरवत होता ...पण मीच तुम्हाला फिरवत होतो हं..!"

तोवर सारे नातवंडही घरात आलित   चर्चा रंगत होती सार संभाष्ण मुलांना जरा रागच आला ..आजोबांना सार कळल म्हणुन...पण नितिन म्हणाला ,"अरे डेकोरेशन नाही बघितल ना आजोबांनी ते सरप्राईजच राहिल चला तयारी करा पटकन..पाहुणे येतिलच इतक्यात.."

सारे छान तयार होतात..नितिनने आणलेल्या ड्रेसमध्ये जयवंतराव उठुन दिसतात ..सारंगनेही त्या ड्रेसला साजेशी आईसाठी साडी आणलेली असते ..दोघांचा जोडा जसा लक्ष्मीनारायणासारखा वाटत होता ...

हळुहळू पाहुण्यांची वर्दळ चालु झाली .दोघ मुलांनी वडिलांच्या जवळच्या सर्वांनाच आमंत्रण दिल होत ..मुलाचा व परिवाराचा उत्साह बघून पाहुणे मंडळी खुश होती ..सर्वांच्या तोंडी एकच वाक्य होत..

"जयवंतराव खुपच भाग्यवान त्यांना इतकी चांगली संतती लाभली ...दिष्ट ना लागो ह्या परिवाराला .."

बघता बघता आठ वाजलेत .नातवंडांचा उत्साह ओसंडून वाहत होता .भला मोठा केक व खारिकांच्या दिव्यांच ताट घेऊन दोघी सुना बाहेर आल्यात ..दोघींच्याही चेहेर्यावर आनंदाच तेज चमकत होत ना हेवादावा ,न लहानमोठेपणाचा तोरा दोघी जशा बहिणी बहिणीच एकाच रंगात एकाच ठंगात रंगलेल्या जयवंतरावांच्या घरच्या गृहलक्ष्म्या दोघी...दोघींना बघताच तारामतीबाई पुढे सरसावल्या आपल्या दोघे हात दोघींवर फिरवत कानाजवळ नेत कडाकडा वाजवलीत दोघींचेही चेहेरे त्या ताटातील दिव्यांच्या प्रकाशात आधिकच प्रसंन्न वाटु लागले...

आता कार्यक्रमाला रंगत येऊ लागली .निल,दिप यश,दिशाने आजोबांसाठी चार चार ओळी लिहिल्या होत्या त्या वाचुन दाखवल्यात ...आजोबांनी नातवंडाना कावेत घेतलं...आधी सुनांनी औक्षण केल ..केक कापला ...सोबत जयवंतरावांच्या आठवणीत सारे पाहुणेमंडळी रंगलीत ....सारंग व नितिनने वडिलांचे कष्ट व त्यांच्या संस्कारांचे गुणगान केलं...सारे दृश्य जसे नयन दिपवणारेच व स्वप्नवतच होते ....पण तारामती व जयवंतराव त्या गोकुळात हे सार स्वप्नवत सुख अनुभवत होते...

सार पार पडल्यावर मेघा व जयाने सर्व पाहुणे मंडळींना पोटभर जेवू घातलं आणि सगळ्यां सुवाषीनींच्या ओट्या भरल्यात ...सारे संस्कार व आनंद परिवारात सूखाने नांदत होता ...सारी मंडळी व नातलग बघून जयवंतराव भारावून गेले ...आपल्या वाढदिवसाचा सोहळा बघून मनोमन तेही खुशच होते....

शेवटी जयवंतरावांनी नितिन ,सारंग,जया व मेघा ह्या चौघांचे आभार मानलेत..

"मित्रांनों मी सार कमवल मान्य आहे मला ...संपत्ती,मानसन्मान सारेच कमवतात तसाच मी ही कमवला ...सरकारने मला साथ दिली त्यांच्या संस्कारांनी माझे दोघे चिरंजीव घडलेत ...त्याचींच देण आज गोकुळ फुललं व ह्या गोकुळात आनंदाचा झरा तेवत ठेवणार्या माझ्या दोघी सुनां खरा माझा अभिमान ...माहेरून माझ्या  घरात दोघींनीही त्यांच सर्वस्व देत सुख समाधान पेरल ,दोघींनीही एकमेकिंना समजून घेत घराला स्वर्ग केल ...पोरींनों हा स्वर्ग असाच ठेवा व असेच गुण्यागोविंदाने रहा ...हिच माझी शेवटची इच्छा बघा ...बाकी माझ जे सार आहे ते सर्व तुमचच आहे ...अशीच साथ द्या व असेच आनोदी रहा ..".

जयवंतरावाच्या ह्या बोलण्याने सारेच भावूक झाले...कार्यक्रम संपला .सगळ्याच्या तोंडी फक्त परिवाराच कौतुक व कौतुकच होत...
जयवंतरावांच्या भाग्याचा सगळ्यांनाच हेवा वाटत होता .मानसन्मान,सुखी परिवार,मनाजोगती जोडिदार ,नातवंडांनी भरलेल घर सार कस देवाने भरभरून झोळित घातल होत...


क्रमःशा..?


कथेत पुढे बघू धागे नात्यांचेे विस्कटतात कि अधिकच घट्ट होतात ...सुखी परिवाराला दृष्ट लागते कि आदर्शपणाचा किताब मिळतो ...वाचत रहा कथामालिका ...धागे नात्यांचे..)


©®वैशाली देवरे

कथामालिका -धागे नात्यांचे भाग -१

जिल्हा -नाशिक

🎭 Series Post

View all