Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 1

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 1

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

एक वास्तवादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कमेंट करा.


स्वानंदी - (एकत्र कुटुंबातील तिसरी धाकटी सून नवीन आताच लग्न करून आलेली) संध्याकाळी देवघरात दिवा लावत होती, तुळशीच्या वृंदावनात दिवा लावून आली. स्वानंदीला दोन लहान पुतण्या चिकटल्या. काकू काकू म्हणत होत्या.


स्वानंदी - "हात जोडा शुभंगकरोती म्हणा स्वरा, गार्गी. दोघीं म्हणाल्या रामरक्षा, पसायदान झाले."


इतक्यात एक नंबर मोठी सून लीलाने हाक मारली.- "स्वानंदी...."


तशी स्वानंदी उठून - " आले वहिनी. स्वयंपाक घरात जाऊन उभी राहिली. काय वहिनी."


लीला - "स्वानंदी कणिक मळ बरं. "


स्वानंदी-"हो म्हणत परात काढते. पीठ घेते. किती घ्यायचं लीला वहिनी अंदाज विचारते."


लीला - त्यातला तो डाव आहे त्याचे नऊ - दहा मापं घे अंदाजे.. मला दाखव मी सांगते. दहा जण तरी पोळ्याच खातील. फक्त या दोन तुझ्या पुतण्या स्वरा, गार्गीच खिचडी खातील.

स्वानंदी - " नवीन असल्यामुळे अंदाज नाही येत वहिनी. त्यात आमच्याकडे इन मिन मी धरून तीन माणसं. स्वानंदी ने माहेरी कधीच हे कामं न केल्यानं टेन्शनच आले."

लीला- "'अगं होईल हळू हळू सवय."

नीता - ( दोन नंबरची सून प्रेग्नन्ट आहे दुसऱ्या वेळेस) - मला त्या कणकेच्या, भाजीच्या वासाने फारच मळमळ होते. लीला ताई मी बाहेरच्या खोलीत बसून मेथी निवडू का लीला वहिनी.

लीला -" बरं" म्हणते.

नीता- "पडत्या फळाची आज्ञा मिळताच मेथीच्या गड्या, ताट घेऊन लगेच बाहेर जाते. स्वयंपाक घरातून बाहेर आल्यामुळे. कामं चुकल्या मुळे खुश असते" इतक्यात नीता शेजारी सासूबाई मालती बाई बसायला आल्या.

सासूबाई - "गडी निवडते. बरी आहे का तब्येत का ग विचारतात."

स्वानंदी - " आपण आईला कधीच मदत केली नाही. आता कस करावं लागत आपल्याला. आईने कसं आपल्याला फुलात वाढवले. माहेरच्या आठवणीने स्वानंदी रडूच यायला लागले.आताच माहेरी जाऊन आली. आता कुठे लगेच मिळणार आई. मनाच्या अस्वस्थेत पाणी जास्त पडलं. त्यात स्वानंदी ला अंदाज आला नाही. "

लीला - " पाठमोरी उभी होती. भेंडया चिरत होती."

स्वानंदी - " रडत रडत कळले पाणी जास्त पडलं. आता काय? छातीत धस्स झाले हार्ट बिट्स वाढले.आता काय करायच प्रश्न पडला. त्यातल्या त्यात लीला वहिनीच जवळची झाली होती. तिला सांगावे लागेलच. ती संभाळून घेईल वाटले. तिला सांगणार."


इतक्यात तिथे सासरे पाणी पिण्यासाठी येतात. हसतात. सासरे - "काय आहे हे सुनबाई?"


क्रमशः
©® सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
14/12/2025



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all