Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 2

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 2

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

एक वास्तवादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कमेंट करा.


सासरे - "साधी कणिक मळता येत नाही का तुला? अवघड आहे."

इतक्यात सासूबाई तिथे आवाज ऐकून येतात.

सासूबाई - " काय झालं."

सासरे-"तुझं लक्ष नाही घरात. बघ तिकडे. कणके कडे बोट करतात. किती मोठया कणकेच नुकसान."

सासूबाई - "सगळे मीच पहायचे. लीला काय करतेस तू?"

लीला -" नाही.. होईल आई.. स्वानंदीची बाजू सावरत. मी करून घेईल. नाही जाणार वाया. माझेच मेलीचे लक्ष नाही गेले."

सासूबाई, सासरे आरडा ओरडा करत स्वयंपाक घरातून बाहेर येतात.

बाहेर सोफ्यावर बसून भांडण चालू आवाज येतो.

स्वयंपाक घरात स्वानंदीला रडूच कोसळते.

लीला-" अगं एवढं काय त्यात वेडाबाई रडण्यासारखं. शिकशील हळू हळू."


स्वानंदी - " वहिनी.. आईची आठवण झाली. या प्रसंगात घाबरून गेले. बरं झाले. तुम्हीच माझी बाजू घेतली. खूप धन्यवाद. मिठीच मारते. माझ्या आई सारखंच बोलल्या तुम्ही. शिक.. होईल.."


लीला - " हो अगं लहान बहिणी सारखीच तू मला. अगं अजून एक भाजी करावी लागणार. मेथीची पातळ करशील का? येते का तुला नक्की? भेंडी तुझ्या अहोंना आवडत नाही. सासऱ्याना मेथी आवडते. आता जेवणाची वेळ होईल. सासूबाई, सासऱ्याना इन्शुलीन घ्यायचे असते. शुगर आहे दोघांना. आता खूप उशीर आठ वाजता जेवायला लागत. लेकरं भुकेली होतात. खिचडी दोघीसाठी करावीच लागते."

स्वानंदी- " हो वहिनी मेथीची भाजी चांगली करते. खिचडी येते छान. नक्की येते. करते मी."


लीला-"आटप मग. आता येतील वाढा म्हणतील. मी पोळ्या करून घेते. हे सुधारते. तू भाजी, खिचडी करून घे."


दोघीं स्वयंपाक करायला लागतात, पोळ्या, भाजी, खिचडी भाजीचा सुवास दरवळताच. सगळ्याच्या भुका चाळवल्या.दुसरीकडे खिचडीचा कुकरच्या शिट्या होत आली. लिलाने भेंडीची भाजी, पोळ्या उरकून घेतल.

सगळे स्वयंपाक घरात यायला लागले. लीला, स्वानंदी ताट, पाणी घ्यायला लागल्या. सगळेच बसले. लीला आणि स्वानंदी बाकी राहिल्या.


राहुल ( स्वानंदीचा नवरा) - "लीला वहिनी मेथी एक नंबर झाली आज वा मस्तच."


लीला -" भावजी तुमच्या स्वानंदीने केली बरं. वाढ भावजींना स्वानंदी. दोन घास जास्तच जातील आज आपल्या माणसाच्या हातचे. "

स्वानंदी, राहुल नवीन जोडपे गालात हसतात.

सासूबाई- " तुम्ही दोघीं सुद्धा घेऊन टाका. अन्न मध्ये घ्या आपल्या जवळ. तुम्ही दोघीं आता बसा. "

नीता - "मला न भेंडी वाढा."

गणेश- ( नीताचा नवरा) "घे हाताने ठेवा हिच्या जवळ."

सासरे-" मला कांदा, लिंबू, लोणचं दे लीला."

स्वानंदी वाढते सासऱ्याना.

दत्ता - (लीलाचा नवरा) स्वरा, गार्गी खिचडी खाऊन घ्या. मोबाईल बघत बसू नका. आवरा चला. दत्ताच्या दमदार एका आवाजाने पोरी जेवायला लागल्या."


स्वरा- ( लीलाची मुलगी) - "हो बाबा."

गार्गी-( नीताची मुलगी)- "हम्म "


उत्कर्ष ( लिलाचा मुलगा ) - "मला भेंडी द्या."



क्रमशः
©® सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
14/12/2025



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"