ती आणि तिचं कुटुंब - भाग 4
दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026
डिसेंबर जानेवारी 2025-2026
एक वास्तवादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कंमेंट करा.
स्वानंदी सकाळी उठल्या पासून जरा शांत, कसल्या विचारात, नाराज वाटत होती. कामं करत होती पण लक्ष नव्हत. लीला बघत होती.
लीला - (दुपारी) दोघीच जेवण झाल्यावर. "स्वानंदी आज जेवणात लक्ष नव्हतं तुझं काय झालं तुला?"
स्वानंदी- " काही नाही वहिनी."
लीला -"अगं. मला नाही सांगणार का? "
स्वानंदी-"तसं नाही... कस सांगू? "
लीला-"सांग बिनधास्त. "
स्वानंदी-" आपण बायका इतकं आई, वडील, माहेर सोडून एका व्यक्ती सोबत लग्न करून त्यांच्या घरी येतो. ती व्यक्ती नवरा त्याला सर्वस्व देतो. अनोळखी घरात ऍडजस्ट करतो. रांधा, वाढा, उष्टी काढा, धुणं, भांडी, स्वयंपाक, पाणी, झाडणं, पुसणं वाटेल ते करतो. पण तो नवरा साधा वेळ देतं नाही.. "
लीला-"हात तिच्या इतकंच ना. अगं तुलाच आय टी कॉम्प्युटर इंजिनीअर पाहिजे होता. मोठा पगार वाला पाहिजे होता. मग त्याला तितके कामं करायला पाहिजे ना."
स्वानंदी-"घरी आले की टीव्ही समोर, मोबाईल मध्ये सारखं, घरी आले तरी लॅपटॉप वर कामं, नाहीतर झोप काढणं, मी इकडे कामातच असते. काही मला क्वालिटी टाइम देतंच नाही. साधी विचारपूस जेवली का? काय केल आज? माझा असा दिवस गेला.. काही फार मोठया अपेक्षा नाही. आधीच घरात खूप माणसं आहे. प्रायव्हसी मिळत नाही. तक्रार नाही पण ती गरज आहे."
लीला-"चांगल तयार हो. भावजीनी बघतच राहिले पाहिजे."
स्वानंदी-"कुठे फिरायला गेलोच नाही लग्नानंतर, मूवी नाही. नाटकं नाही. हॉटेल मध्ये जाण सासऱ्याना आवडत नाही. हे आपलं कुलदेवता दर्शन झाले, गावातले देव देव केले झाले. "
लीला-"मी बोलते भावजी सोबत. नक्की."
स्वानंदी-"तुम्ही, भावजी दोघे एकमेकांना अजिबात वेळ देतं नाही. तुम्ही कामातच राहतात. ते त्यांच्या कामात."
लीला -"लग्नाला खूप वर्ष झाले. पोर मोठी झाली. "
स्वानंदी-"तरी नात्यात वेळ द्यायलाच हवा. संवाद हवा, मन मोकळे करता आले पाहिजे. हक्क, प्रेम तेव्हाच वाटतील. "
लीला-"काळ पुढे सरकतो, दिवस असे जातात. नंतर काही वाटेनास होत. लग्नाला खूप वर्ष झाले की खूप गोष्टी बदलून जातात. प्राथमिकता बदलतात. पोर, त्यांच शिक्षण महत्वाचं होत."
स्वानंदी-" मोकळे बोलू का? "
लीला-"बोल की."
स्वानंदी-"नवरा बायकोच्या नात्यात जवळ येणं बंद. मग का? शंका.. प्रेम आहे असं बोलून दाखवणं महत्वाचं आहे. "
लीला-" नाही प्रेम आहे.. लव यू.. लव यु.. बोलून नाही ते कृतीत दिसणं महत्वाचं आहे. असं मला वाटत. समोरच्या कितपत काळजी आहे. काय तो आपल्यासाठी करू शकतो. हे महत्वाचं आहे. शरीर आकर्षण एका वयानंतर, मुलं मोठी झाली संपत. तोंडाने म्हणतो प्रेम आहे पण कृतीत काही नाही. शून्य. काय उपयोग? तूच सांग."
स्वानंदी -" हो वहिनी बरोबर."
क्रमशः
©® सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
16/12/2025
©® सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
16/12/2025
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
