Login

ती आणि तिचं कुटुंब -भाग 5

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 5

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026


वास्तववादी कथा. विनंती वाचून कमेंट नक्की करा.




लीला - "आहो राहुल भावजी हा घ्या तुमचा ग्रीन टी."


राहुल- "वा. . मस्त.. थॅंक यू वहिनी."


लीला -" भावजी सतत कामं, लॅपटॉप, मोबाईल जरा स्वानंदीला वेळ द्या. वेळ काढा, सुट्टी काढा. बर नाही. सांगा कंपनीत . चार दिवस फिरून या."


राहुल -"हो वहिनी कुठे गेलोच नाही. कामाच्या व्यापात वेळ देणं च होत नाही."


लीला- "जा जा.. जाऊन या.. हेच वय आहे. नक्की जा. कारण सांगू नका.वेळ काढावाच लागतो. हेच वय आहे."


राहुल- दोन फोन केले. काही बोलणं केलं.


राहुल- "वहिनी तुमच्या सांगण्या वरून सुट्टी घेतली. मिळाली सुट्टी."


लीला-(गंमत करत लहान दिराची)"वहिनीच हे पटकन ऐकलं. आजपर्यंत इतकं फास्ट काहीच ऐकलं नाही अ.. "


राहुल-"हसून.. वहिनी.... "


राहुल-(हाक मारतो )"स्वानंदी.... "


राहुल- (स्वयंपाक घरात स्वानंदी येते) "ए बॅग भर लगेच निघायचं आपल्या गावाला.... फिरायला.. सरप्राईझ....चल."

लीला-"घरात सांगा सगळ्यांना.. चार दिवसांनी या.. "

राहुल, स्वानंदी ( एकाच वेळी) -"थँक यू लीला वहिनी. "

स्वानंदी-"तुम्हाला काय हवं? काही गिफ्ट आणेन तुम्हाला. नक्की."

स्वानंदी-बॅग हौशीने पॅक करते.

राहुल- "आई, बाबा आम्ही म्हणजे मी, स्वानंदी चार दिवस फिरून येतो. सुट्टी घेतली मी."

आई-"बरं. फोन करत जा. काळजी घ्या., लवकर या."


स्वरा, गार्गी-" काकू आम्हाला पण यायचे. मागे लागतात. रडतात. काकू काकू.. तुझ्या सोबत यायचे.. "


लीला-"अगं त्या स्वानंदीला डॉक्टर कडे नेणार आहे. तिला इंजेकशन देणार आहे. डॉक्टर तुम्हाला पण देतील बरं इंजेकशन. तुमच्या एक्साम आहे ना आता. "


मग स्वरा आणि गार्गी थांबल्या.

स्वरा-"काकू लवकर ये इंजेकशन मुळे रडू नको. लवकर ये घाबरू नको."

स्वानंदी-"हो ग माझी चिमणी ती."

सगळ्यांना हळू हळू कळले. सगळे सोडवायला अंगणात आले.

स्वानंदी आनंदी, राहुल उत्साही दिसते सगळ्यांना नमस्कार करतात. पाया पडतात. निघतात.


सासूबाई शुगर, बीपी, खांदे, गुडघे दुखतात. काही होत नाही. नीता प्रेग्नन्ट असल्यामुळे थोडं फार कामं करते.स्वानंदी बाहेर गेल्यामुळे, सगळे एकट्या लीला वर पडत स्वयंपाक, पाणी, वाढणं.


दत्ता-" आई तुझ्या कडून होत नाही, नीता प्रेग्नन्ट, स्वानंदी नाही. एकट्या लीला वर पडत. कामवाली बाई ठेवा.. भांड्याला, फरशी साठी बाई लावा. धुण्यासाठी मशीन घेऊ.घर पुसायला मॉपर घेऊ. घरात माणसे खूप आहेत. कामं खूप पडत. बाई लावू या. बाई कामासाठी पाहायला लागा. आई, लीला, नीता बाई पहा कामाला. ठरवा एखाद बाई. धुणं, भांडी, फरशी ला बाई लावू या"


सासूबाई ( मालती ) -" आता आले हे बाई लावा, मशीन आणा. आम्ही केलं खटल्याच्या घरात, काट्याच सरपण, चुलीवर स्वयंपाक, धुणं, भांडी, पाणी कुठून आणायचं. स्त्री आहे. तिचं कामच आहे. कर्तव्यच आहे. "

दत्ता-"आई.. अगं.. "

सासूबाई -" लाव बाई लाव. चालू द्या तुमचं. "



क्रमशः
©® सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
18/12/2025



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"