Login

ती आणि तिचं कुटुंब -भाग 6

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 6

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026


वास्तववादी कथा मालिका. विनंती वाचून कमेंट नक्की करा.


स्वानंदी आणि राहुल फिरायला गेले सगळीकडे लांब वर पसरलेला समुद्र.. थंडीचे दिवस. लाटाचा खळखळाट. दोघांना ओले करून पायाखालची मऊ माती परत निघाली.


स्वानंदी-" गाणं गुणगुणायला लागली. आ गये हम कहाँ ए मेरे साथियाँ.... "


राहुल- "स्वानंदी खूप गोड दिसते. तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढतो. कपाळावर किस घेतो. स्वानंदी लाजून जाते."

समुद्र किनाऱ्यावर एवढी काहीच गर्दी नव्हती.


स्वानंदीला साखरपुडा झाल्या नंतर राहुल ने गिफ्ट दिलेले जीन्स, टॉप तिने घातले. होते. सासूबाई, सासऱ्यांना, सगळ्यांना लपवून ठेवलेला आज घातला. सासरी सुनेनी साडीच घालणे कंम्पलसरी होते. अरेंज मॅरेज असल्यामुळे बघण्याच्या कार्यक्रमात अपेक्षा सांगताना सासूबाईने सांगितलं साडीच घालायची. फार तर फार पंजाबी कधी तरी चालेल. जीन्स टॉप घालायला सक्त मनाई होती. स्वानंदी ने सून म्हणून त्याच्या समोर त्यांचे नियम पाळले. आता स्वातंत्र्य उपभोगत होती.

आज दोघे एकमेकांना वेळ देतं होते. दोघांना प्रायव्हसी मिळाली होती. अचानक स्वानंदीला लक्षात आले घरी फोन करून कळवायला हवं
.
स्वानंदी- "आहो घरी कळवा पोहचलो सुखरूप लीला ताई ना फोन करा."

राहुल-"हो लीला वहिनी चा फोन लागत नाही. आईं ला करतो."

राहुल-" हॅलो.. आई...आई पोहचलो आम्ही. हो सगळे व्यवास्थित. काळजी करू नको. लीला वहिनी सगळ्यांना सांग. हो येतो 4-5 दिवसात."

स्वानंदी-"आहो चला त्या वाळूत बसू जरा."

दोघे बसतात वाळूवर नाव लिही, घर बांधतात. लाट आली की एकमेकांना भिजवतात. सनसेट बघतात. दोघे एक छान हॉटेल ची रूम बुक केलेली असते. तिथून समुद्र दिसतो. रूम वर जातात.दोघे डोळ्यातून च बोलतात, हसतात, लाजतात.


रूम वर जेवण मागवतात. जेवतात. एकमेकांना भरवतात.

हॉटेल वाल्यानी हनिमून कपल रूम मस्त गुलाबांनी, निशिगंधा च्या फुलांनी सजवलेली असते. निशिगंधाच्या फुलाचा वास दरवळत असतो.


दोघेही अवघडलेले असतात.

राहुल पुढाकार घेत. स्वानंदीच्या ओठांच्या गुलाबाला किसिंग घेतो लाईट घालवतो. किसिंग करता करता दोघे दिवाणावर दोघे झोपतात. हळू हळू करत. दोघे एकच होऊन जातात.


दोघांना सकाळी जाग येते. दोघे हसतात. दोघे सोबत शॉवर खाली अंघोळ करतात. दोघे एकमेकांना चोळतात. राहुल स्वानंदीला बिलगून जातो. मिठीत घेतो. स्वानंदी थंडीत काकडून जाते.


इतक्यात राहुल चा फोन वाजतो. स्वानंदी सावरते.

राहुल म्हणतो. -"जाऊ दे मी बिझी आहे."दोघ हसतात

स्वानंदीला थंडी वाजून येते. ती टॉवेल गुंडाळते.. राहुल स्वानंदी ला उचलतो बाहेर आणतो.


इतक्यात परत राहुलचा फोन वाजतो.



क्रमशः
©® सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
20/12/2025



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"