ती आणि तिचं कुटुंब - भाग 7
दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026
डिसेंबर जानेवारी 2025-2026
वास्तववादी कथा मालिका. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
राहुल-"हॅलो. बोल गणेश दादा.. काय म्हणतो."
गणेश-" अरे राहुल नीताला दुसरी मुलगीच झाली. रक्ताची गरज पडली. लीला वाहिनीचा ब्लड ग्रुप ओ पॉसिटीव्ह असल्यामुळे सगळ्यांना चालते त्यांनी दिले रक्त."
राहुल-" बापरे.. बऱ्या आहेत का दोघीं. बाळ कसे आहे?"
गणेश - " अरे.. प्री मच्युअर झाली. साडे सात महिन्याची. बाळाला काचेच्यापेटीत ठेवले. नीता सिरीयस आहे तशी. सीझर झाले. बाळाला, नीताला कावीळ झाला आहे.. "
राहुल-"बरं मी निघतो, येतो लवकरच."
गणेश-"तुला कळवाव वाटलं. तुला डिस्टर्ब करणार नव्हतो. पण दुसरं मन तुला मनमोकळे बोलावे वाटत होते. बघ तू."
राहुल-"बरं केलं कळवलं. येतो आम्ही. काळजी घे दादा. आलोच. बरं ठेवतो."
राहुल- सगळे स्वानंदीला सांगतो. आपल्याला जावं लागेल सॉरी स्वानंदी."
स्वानंदी-"त्यात काय एवढं. सॉरी कशाला. चला आपण गेले पाहिजे."
दोघे परत येऊ सगळे ओके झाले की असं म्हणून बॅग भरायला घेतात.
राहुल -" गणेश दादांनी मला सायकल, सगळ्या गाड्या शिकवल्या आहे. कायम फार प्रोत्साहन द्यायचा.मी इंजिनीरिंग केले. इंजिनीअर झालो डिस्टिंकशन मध्ये याने पेढे वाटले. काल पहिल्यांदा फोन वर त्याचा आवाज खूपच लो आला. आपण जाण खूप गरजेचे आहे. बरं झाले तू मॅटच्युअर पणे हो म्हणाली. तुला घरी जावं वाटलं चांगल वाटलं."
राहुल -" स्वानंदी तू नीता वाहिनीची, बाळाची काळजी घे. लीला वहिनीने रक्त दिले तिलाही जपावं लागेल."
स्वानंदी-"हो तुम्ही काळजी करू नका. होईल सगळं ठीक. घेईल. मी काळजी घेईल."
दोघे घरी पोहचतात.
राहुलला पाहून गणेश गळ्यात पडून अश्रू गाळू लागतो. भावाचा एकमेकात अति जीव पाहून आईला (मालती) ना, वडिलांना ( प्रभाकर)त्यांना भरून येत.
बाबा (प्रभाकर)-" असे माझे वाघ कसे. मिळून राहतात. शाबास रे माझ्या वाघरू. एकत्र कुटुंब, ऐकी फार महत्वाची आहे.
मालती ताई डोळे टिपतात. सगळे दवाखान्यात निघतात.
नीताची तब्येत थोडी सुधारते आहे. बाळ काचेच्या पेटीत आहे. छोटाशा जीव सगळे मिळून प्रार्थना करतात. लीला जरा गळून गेलेली असते. दत्ता रात्रभर तिथे दवाखान्यात असतो.
आई - (मालती )" दत्ता जा घरी. आराम कर. फ्रेश हो. जा बाळा. तुझ्या तब्येतीची काळजी घे बाबा."
दत्ता-"कामवाली बाई लावणे गरजेचे आहे. शोधली का? "
आई - "हो बाबा दोन चार ओळखीच्या बायकांना सांगितलं."
दोन डॉक्टर धावत येतात. " काय झाले? काय झाले डॉक्टर. " - दत्ता विचारतो
क्रमशः
©® सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
20/12/2025
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
