Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 8

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 8

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

वास्तववादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कमेंट करा.



डॉक्टर-"नीताचे टाके उकळले काही. सिस्टर सांगत आल्या डॉक्टर म्हणे परत टाके घालावे लागतील."


नीताला ऑपेरेशन थिएटर मध्ये नेतात. गणेश तिथेच भिंतीला टेकून उभा असतो. दत्ता त्याला धीर देतो.

दुसरे डॉक्टर-"इथे गर्दी करू नका. एक -दोन जण थांबा बाकी जा. "


गणेश एकटाच थांबतो बाहेर. बाकी घरी जातात.


स्वानंदीवर एकटीवर पूर्ण जवाबदारी पडली. तिला
काय करू. काय नाही झाले. इतक्या लोकांचा स्वयंपाक, धुणी, भांडी. पोळ्या काही जमल्या नाही.भाजी यांच्या वेळेत आठ वाजता रात्री तयार केलं. दिवसभर कष्ट केले.


सासरे -"स्वयंपाक घरात आले जेवायला."

सासूबाई - "यांना वाढ."

स्वानंदी-"घाई घाई वाढायला घेते. "
.
सासूबाई-" ते काय गडी आहे का? पोळीचे तुकडे कर चतकोर. आख्खी वाढतात का आपल्यात? "

स्वानंदी ताट वाढून आणते. सासऱ्याना

सासरे-"काय आहे कालवण? मेथी अरे वा. अरे चांगल्या मेथीचे काय केले तू.? भाजी येत नाही तुला? काय भंगार भाजी. किती वर्षाची झाली तू? भाज्या येत नाही तुला. आईने शिकवलं नाही का तुला? "


सासूबाई-" यांना हिरवी मिर्ची, लसूण वाटून घाटून भाजी लागते. लाल तिखट चालत नाही. शेंगदाणे जास्त नाही घालायचे. पाणी टाकायचं पातळ पाहिजे भाजी. एवढी घट नाही. "


राहुल-"काय शेगदाण्याचे पिठले नाही करायचे. भंगार केली भाजी."


स्वानंदीचे भीती, मानसिक त्रास, चिडचिड अश्या बोलण्याने हात कापू लागले.वाढताना.

सासूबाई -" वाढता येतं नाही. भाज्या कुठे? लोणचं कोशिंबीर कुठे असतं?"

स्वानंदी-" गार्गी, स्वरा तुम्हाला खिचडी केली आहे दोघीं बसा वाढते. उत्कर्ष तू पण बस भेंडी पण केली आहे. "


दत्ता-"स्वानंदी तू पण बस जेवायला. जवळ घेऊन बस. "

स्वानंदी-"हो भाऊ. "

स्वानंदीचा दिवस अवघडच गेला होता. दिवसभर कष्ट झाले. वर बोलणी, नाव ठेवणं झाले. दमून गेली होती. दवाखान्यात पाठवायचा डबा पण भरला होता. दत्ता दादांना जाणीव आहे. असं तिला वाटलं.


दत्ता-"उद्या धुणी, भांडी, फरशी साठी बाई लावून घे स्वानंदी. "

स्वानंदी-" हो. "


स्वानंदी-" लीला वहिनी ना कसे आहे आता. बरं आहे ना"


दत्ता-" रक्त दिले. अशक्तपणा, अंधारी आली. बीपी हाय झाला होता. त्यात बेशुद्ध झाली होती . डॉक्टर म्हणे दोन दिवस अंडर ऑबझरवेशन राहू द्या. सलाईन दिले गोळया दिल्या. उद्या देतील डिस्चार्ज तिला बहुतेक. "


स्वानंदी- नीता वहिनी कशा आहे. घरी कामात होते. दवाखान्यात जाणे झालेच नाही. "

दत्ता-" नीता अजून सिरीयस आहे.डॉक्टर म्हणतात परत टाके टाकले होईल बरं."



क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
24/12/2025


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"