Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 10

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 10

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

वास्तववादी कथा मालिका.विंनती वाचून नक्की कंमेंट करा.

सासूबाई(मालती)-कोण आले पाहतात तो लाडकी एकुलती एक मुलगी सुनीता, जावई आलेले.


सासूबाई, सासरे- एकाचवेळी.. या या या... अल्भय लाभ..अल्भय लाभ या या.

सासूबाई (मालती)- थांब थांब.. तुकडा पाणी. ओवाळते.. थांबा.. एक मिनिट..

सासूबाई(मालती)- ए स्वानंदी कुठे तुकडा पाणी आण ग लवकर.. ये लवकर चल.. कुठे ग.. स्वानंदी.... अगं नणंद, जावई बुआ आले..


स्वानंदीला नीता ची आई सांगते स्वानंदी जाते पळत तुकडा, पाणी घेऊन आली.


स्वानंदी- "सुनीता वेलकम वेलकम."


सुनीता, जावई आत येतात. सुनीता आई, बाबा ची गळेभेट घेते. जावई पाया पडू लागतो.


सासूबाई-(मालती)-"स्वानंदी माझ्या सुनीचे सामान वरच्या रूम मध्ये हालव."


स्वानंदी-"हो.. "


स्वानंदी-कशी आहेस सुनीता? "


सासूबाई-(मालती) - स्वानंदी नणंद आहे तुझी आहो जावो च करायचे कळले का? ती काय मोलकरीण आहे का तुझी?"


स्वानंदी-"सुनीता वयाने, मानाने लहान आहे ती माझ्या पेक्षा."


सासूबाई-(मालती)- काहीही असो.. या उपर एक शब्द बोलायचा नाही. आहो, जावो करायच म्हणजे करायचं.. तुझ्या आईने काहीच शिकवलं नाही का तुला? बस्स काही कारण सांगू नको. नणंद आहे तिला आहो, जावो च कर. कळले का? जा पाणी, दुध,कॉफी आण."

स्वानंदी-(नाराजीने) -"हो. "


मनात पटल नाही.आहो जावो ने दुरावा राहतो. अरे तुरे जवळीक मैत्रीण झालो असतो असं वाटत..

सुनीता--"दुध, कॉफी काहीच नको. "

आई (मालती )-"सकाळची वेळ आहे. जावई बापू कॉफी घेतील."

सुनीता-"का ओ कॉफी घ्यायची का?


जावई-"होकारार्थी मान डोलावतात."


सुनीता-"घरच्या ताकाची कढी आणि लापशी खायची मला तुझ्या हातची नाहीतर लीला वहिनी च्या हातची. "


आई(मालती)- "तुझ्या फर्माईशी सूरू झाल्या का? लीला दवाखान्यात आहे. मला होत नाही आता."

सुनीता-"आई.. दवाखान्यात का ग ”


आई (मालती) -"करते बाई करते मी. लीला दवाखान्यात आहे कारण नीताला रक्त दिले. लीलाला चक्कर आली. बेशुद्ध झाली. दोन दिवस डॉक्टर च्या निगराणीत राहू द्या म्हणे. इकडे नीताचे सीझर, साडे सात महिन्याची बाळतीण, त्यात कावीळ बाळाला, तिला. बाळ काचेच्या पेटीत. हिचे टाके उकलले परत टाकले. नीताचे आई, वडील, भाऊ आज आले. "


सुनीता-"बापरे.. मला गणेश दादाचा फोन आला दवाखान्यात आहे. बाळतीण झाली. मुलगी झाली. म्हणून आले मी."


आई (मालती)- " नीताला दुसरी मुलगीच झाली. मुलगा पाहिजे बाई.. मुलगाच. "


कामवाली बाई-"येते. कामं आहे इथे.. "

सासूबाई (मालती ) -" हि कामवाली आली बघ. स्वानंदी... कोणी पाठवलं ग तुला."


स्वानंदी-"आले. "


कामवाली-"शेजारच्या पाटिल ताईंनी पाठवलं. "


परत दारावार कडी वाजते..


सासूबाई (मालती) -"आता कोण आले. कामवाली दारातच उभी बाजूला हो."




क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
26/12/2025


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"