ती आणि तिचं कुटुंब - भाग 11
दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026
डिसेंबर जानेवारी 2025-2026
वास्तववादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कमेंट द्या.
लीलाला डिस्चार्ज मिळतो, दत्ता लीला ला घेऊन घरी येतो.
दत्ता-"लीलाला चार दिवस आराम करायला सांगितला आहे डॉक्टरनी. तिला अशक्तपणा खूप आला आहे."
सुनीता- "लीला वहिनी काय तब्येत झाली काळजी घे."
लीला-"ताई, जावई बापू आले तुम्ही..वा छान वाटलं. "
सासूबाई (मालती)- "लीलाला माहेरचं कुत्र नाही ग. अरेरे वनवासी आहे. आई नाही, बाप नाही दोघे गेले देवाघरी लीलाच्या लग्नानंतर एकापाठोपाठ. भाऊ नाही. काही नाही.माहेरी पाठवलं असतं जा कर आराम तिकडे ते ही नाही."
लीलाला वाईट वाटत. उगाच जखमेवर मीठ चोळ्यासारखं वाटत. वनवासी शब्द ऐकून तळपायाची आग मस्तकात जाते पण शांत असते. सोफ्यावर बसते. पार गळून गेलेली असते. जाऊदे माझा श्रीराम च आहे मनात बोलते.
दत्ता-"आपणच कुटुंब आपणच घ्यायची काळजी तिची."
लिलाला नवऱ्याचे ऐकून बरं वाटलं
सासूबाई-(मालती )-"मला इतका गणगोत आहे. इतके माझ्या डोक्याला केस नाही. सगळे नातेवाईक माझे धरून आहे. जाण येणं, फोनफोनी, कार्याला आमंत्रण, सोन्या-चांदीचे आहेर, येऊन भेटणं. मस्त जेवायला आमंत्रण अधेमध्ये चालूच. धावून येतात काही असो कष्टाने, पैसाने."
दत्ता-"आई. "
सासूबाई(मालती)- " हिचे नातेवाईक म्हणजे.. सगळा गाव मामाचा एक नाही कामाचा.. गर्भश्रीमंत नातेवाईक, कोणी आमदार, कोणी सुपर क्लास वन, कोणी अमेरिकेत, कोणी लंडनला, कोणी मुंबईत, कोणी पुण्यात.. एकाचा मेला साधा फोन नाही. ब्लॉक करतात फोन वर उगाच.... नुसते पैशाचे नातेवाईक.. ज्याच्याकडे पैसा त्यांची...... धुवून देतील. त्यांच्या पुढे पुढे.. गरीब वाटले तर थोबाड पाहत नाही.. श्रीमंत यांना काय पैसे काढून देतो का? काहीच कामाचे नाही. शून्य.. कार्यक्रमाला ना आमंत्रण, ना येणं.. सख्खे म्हणवणारे मामे, आत्ये, मावस सगळेच तसले. एका माळेचे मणी.. हे.. एक ना धड भारभर चिंध्या. छे. मालती ताई जोरात हात झटकतात. कलयुग हेच.. स्वार्थी, माणसं नको, उगाच फार बिझी दाखवतात असतील बिझी.. एक फोन नाही बहिणीला कधीच."
दत्ता- "आई सगळं खरं आहे पण आता लीलाची तब्येत बरी नाही. तिला कशाला बोलतेस? "
सासूबाई-"खरं बोललं तर असं. हिचे नातेवाईक म्हणजे वाईट अनुभवाच्या खाणीच."
(स्वयंपाक घरात ) कामवाली बाई - "बाप्पा.. एवढी माणसे घरात.. कामं पण भरपूर बापरे. धुणी, भांडी एवढं मोठं घर पुसायचं? पाच हजार घेईल. महिन्यात दोन सुट्या होतीलच. बघा पटल तर सांगा."
स्वानंदी-"बापरे.. थांबा.. माझ्या हातात काही नाही. कुणाला बोलवते. "
( बाहेर बैठकीत हॉल मध्ये येते ) स्वानंदी -" लीला वहिनी आल्या तुम्ही स्वानंदीला खूप आनंद होतो. पाया पडते सगळ्यांना. "
स्वानंदी-"दत्ता भाऊ, सासूबाई आत ती कामवाली पैशाचं बोलते चला ना ठरवायला आत स्वयंपाक घरात आहे ती. "
सासूबाई, स्वानंदी, दत्ता तिघे आत स्वयंपाक घरात जातात.
सुनीता लीला वहिनीला घेऊन लिलाच्या रूम मध्ये जातात.
जावई ( सुनीताचे यजमान ) त्यांचा फोन वाजतो.
क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
28/12/2025
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
