Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 12

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 12

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

वास्तववादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कमेंट द्या.



कामवाली बाई-" बोला पटकन मला दुसरीकडे कामाला जायचे हाय."


सासूबाई- " बघ रोज धुणी, भांडी आणि फरशी एकदिवसा आड कर, गॅस, ओटा स्वच्छ पुसून घ्यायचे. बोल किती घेणार."


कामवाली - " सांगितलं नव्ह. पाच हजार महिना. मला बी कष्ट लागतात. त्याचेच पैसे. मला नग जास्त कुणाचे. तुमच्या घरात एवढाली माणसं, घर मोठं, खटल्याच हाय. कामं बी ज्यादा असणार. माझ्या दोन सुट्या व्होणार. आधीच सांगून ठेवते."


सासूबाई-" अगं बाई. पाच हजार... काय हे....वर सुट्टी. कामवालीच आहेस न. धुण्या, भांड्यासाठी एवढे."


कामवाली-" फगस्त दोन जण अन एक बारक पोरग दोन हजार घेते मी. इथेच ते नवीन फ्लॅट झालं ना तिथ. तुमच्या कडे एवढी माणसं. कमीच सांगितले हाय. नंतर किर किर माझी नगो तुमची बी."


सासूबाई-"शाबास.. म्हणजे एकत्र कुटुंब नकोच असं म्हणायचं का तुला? अतीच झालं."


दत्ता-"आई थांब. मला बोलू दे. हे बघा पाच खूप होत आहे ताई. थोडं कमी करा."


कामवाली-"रेटच हाय भाऊ. फारतर पाचशे कमी द्या."

दत्ता- "ठीक आहे.आज पासून सूरू करा."


सासूबाई-(मालती )''मनात कामवाली मिळणं अवघडच झालं. टिकते की नाही काय माहिती. अडवून पाहतात ह्या बायका. घरच्या बायकांनीच केले पाहिजे सगळे. "

दत्ता-"तुमच नाव काय? नंबर देऊन ठेवा. "


कामवाली -"मी सखुबाई ह्या मोबाईल वर तुमचा नंबर टाका. तुम्हाला माझा नंबर येईल."


दत्ता-"हो.. नंबर घेऊन सेव करतो."

स्वानंदी रात्रीच्या पोळ्याचा कुस्करा करते.


सासूबाई- "कुस्करा वाटत., पोळ्या जास्त केल्याचं कशाला? मी, हे अजिबात शीळ खात नाही. आम्हाला लगेच त्रास होतॊ. शुगर वाढते, पोट बिघडत, उलटी होते. आम्हाला नको देऊ."


तेवढ्यात तिथे सुनीता येते. लीला ला रूम मध्ये सोडून.


सासूबाई- " सुनीताला नको देऊ शिळ्या पोळ्याचा कुस्करा. माहेरी आली पोर. तिच्या साठी कढी, लापशी करणार आहे मी आता. स्वानंदी तू घे कुस्करा, नीताच्या आईला, भावाला दे. लीला, दत्ताला दे संपवून टाका. अन्न वाया घालू नका. अन्न हे पूर्णब्रम्ह. स्वानंदी कॉफी दिली का जावई बापुना."


स्वानंदी-"आताच दिली कॉफी."


स्वानंदी मनात शिळ्याचा आग्रह सुनाना, सुनाच्या आई, बापाला, आपण, आपला नवरा, पोरीला, जावई ला स्पेशल मेनू. वा.. जाऊदे आज थोडं फार सासूबाईच्या हातचा स्पेशल मेनू खायला मिळणार कधी नव्हे ते. स्वानंदी मनात हरळ्या सोबत नरळ्याची पण यात्रा. स्वानंदी मनात हसते.


जावई बाहेरून हाक मारतात - " सुनीता.."




क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
29/12/2025


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"