Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 13

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 13

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

वास्तववादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कमेंट करा.

जावई-"अगं सुनीता मला फोन आला. एक अर्जेन्ट केस आली. उद्याच ऑपेरेशन आहे. मला जायलाच पाहिजे. मी डॉक्टर आहे. माझं कामं आहे ते चल दवाखान्यात तूझ्या वहिनीला बाळाला पाहून घे, या सगळ्यांना भेटून घे निघू आपण. लांबचा प्रवास आहे. चल आटप.. चल चल लवकर काय ते. उरकून घे. "


सासूबाई-"काय हे. आले तसे थांबा ना. जावई बापू.."


सासरे-" आले काय.. निघाले काय. "


जावई-"डॉक्टर आहे त्यामुळे माझं कामंच असे आहे. बाबा, आई. येऊ परत."


सासूबाई-" सुनीला तरी राहू द्या आली तशी दोन दिवस.. दत्ता आणून सोडेल घरी दोन - तीन दिवसात नक्की. "


जावई- "बरं.."

सुनीता-" नाही नाही.. मी येते आई.. "


सासूबाई-"जावई बरं म्हणले तर दोन दिवस रहा ग सुने दत्ता दादा सोडेल दोन दिवसांनी."


जावई-"मी येतो."

सासूबाई-"तुम्हाला भाजी, पोळी डबा देते बांधून."

जावई-"लवकर द्या."

सासूबाई-"स्वानंदी दे डबा, लिंबाचे लोणचे दे त्यांना आवडत. चार - पाच पोळ्या दे. भाजी काय केली ती दे."


स्वानंदी-" डबा पॅक करून देते."

जावई- नमस्कार करतो. " येतो आई, बाबा,, सुनीता."

अच्छा अच्छा, बाय बाय

सुनीता, आई (मालती)स्वयंपाक घरात येतात.


सासूबाई(मालती)- ताक, लोणी, तूप करतात, दलियाची लापशी करतात. दुसरीकडे सुनीता सोबत गप्पा मारायच्या. एकांतात म्हणून.


सासूबाई-"नीताच्या आई तुम्ही जा बाळ बाळतीणीला भेटा. दिवसभर तिलाही आईला पाहून बळ येईल. दत्ता कडून पत्ता घ्या दवाखान्याचा. जा. नाहीतर तो कामाने बाहेर जाईल."

नीता चे आई, वडील, भाऊ त्यांचा डबा घेतात जातात..


सासूबाई-"स्वानंदी जा धुणं बीण बघ."


स्वानंदी- मनात ओळखून घेते. निघते तिकडन आणि लीला ताई कडे जाते.मनात म्हणते धुणं बाई धुते ना.


सासूबाई-" सुने काय म्हणते बोल. कसं चालू आहे सासरी तुझं? लापशी मध्ये जायफळ घालू का? काही त्रास नाही ना चिमणीला."


सुनीता-"कसं सांगू तुला?"


आई -(मालती)" सांग मला सगळे खरे बिनधास्त बाळा."


सुनीता-"रोज लागतो नवऱ्याला संबंध ठेवायला. अतीच येता जाता, रात्रं दिवस.. घरी आले दवाखान्यातून की.. लगेच. जेवायला नरम गरमच पाहिजे. हे असेच पाहिजे ते तसेच पाहिजे. हीच भाजी पाहिजे. ड्रेस प्रेस, घर स्वच्छ, सारखं माझ्या मागे कसं बस ते चार दिवसच शांत. इन मिन दोघेच असून कामं चालूच राहत. सगळे कामं घरीच. तुला कुठे बोलायला वेळ मिळतो. माझ्या डेंटलची प्रॅक्टिस करायला नाही म्हणतो. सासूबाई, सासरे सारखे पैसे मागतात हे, ते कारण सांगतात. हा देतच राहतो पैसे सारखे. सारखं फोन पे करतो काही म्हणलं तर जीव घेईल आई बापात फारच जीव आहे. बरं च्या बरं सासूबाई, सासरे गावीच लांब राहतात. ती एक मोठी नणंद आहेच डोक्याला ताण ती अधे मध्ये येते, लावून सांगते यांना. तिच्यामुळे आमच्यात भांडण. चुगलखोर. "



क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
31/12/2025


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"