Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 14

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 14

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

वास्तववादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कमेंट करा.

आई -(मालती) "अतिशय वाईट बाईच आयुष्य असचं असतं. अजिबात सोपं नाही. नवरा, सासर, कष्ट, अपेक्षा पूर्ण करा, सासुरवास, रांधा, वाढा, उष्टी काढा, एवढंच बंधन, धुणं,भांडी, स्वयंपाक, पाणी, पै पाहुणा, घर आणि घरातील कामं, खरं एकपण घर हक्काचं नाही, माहेरचे म्हणतील परक्याचं धन, सासरी तुम्ही परक्या घरातून आलेल्याच आयुष्यभर नांदून, धोबी का कुत्ता.... सणवार राबायचं तुम्ही, मुलांना जन्म द्यायचा, वाढवायचं. नाव तुमचं नाही. करा कष्ट व्हा नष्ट.... त्यात पाळी, बाळंतपण, आई होणं सोपं नाही.. शरीराने, कष्टाने.. मुलगाच पाहिजेच.. आपलं एवढं करून काय?शून्य. डॉक्टर आहे डेंटलची प्रॅक्टिस कर. काही करिअर कर. नाव कमव, घरचे सांभाळ दारचे सांभाळून. कितीही करा बोलणी, टोमणे, असतात. काही जणींना मार असतो येता जाता. तुला मारले का कधी? पण काही असो शिक्षण घेतले करिअर करच."


सुनीता-"हो आई.. खरंय. सासू, सासरे परवानगी देतं नाही. नवरा नोकरी करू देतं नाही. मी कमवतो. तुला काय गरज आहे? बस घरी चार भिंतीतच रहा चूल आणि मूल करत. एवढं शिक्षण घेऊन काय उपयोग सांग?"



आई (मालती) - " दिवस असेच उडून जातात. आपण आपलं करिअर करायचंच. आपण आपल्या पायावर उभे राहायचे. तू मोठी होऊन दाखव स्वबळावर. "


सुनीता-" घरी नाहीच राहावं वाटत.. खूप पश्चाताप होतो. एवढं शिक्षण घेतले. काय घरी बसून धुणं, भांडी, स्वयंपाक, पाणी करते. नोकरी, करिअर, स्वतःची प्रॅक्टिस केली पाहिजे असं वाटत."


आई- (मालती)-" असो खाऊन घे गरम गरम कढी, लापशी. "


सुनीता-"तुझ्या हातची खूप आवडते आई. तुझी खूपच आठवण येते पदोपदी सासरी. काय मुलगी असल्यामुळे आई-वडील भेटत नाही.तिन्ही दादांना रोज भेटतात आई-वडील. माहेरी यायला मिळत नाही. सोडत नाही नवरा. आता फक्त बरं म्हणाला. तुला काय वाटलं झाले बघ नंतर काही मोठे करेलच. कशाला राहिली असं तस. डोक्याला ताप नुसता. "


आई (मालती)-" कधी कधी दुर्लक्ष करायच. सोडून द्यायला शिक. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही. मग त्रास होईल तुला. "


सुनीता-"नेहमीसारखी खूप छान झाली तुझी कढी, लापशी आई वा.. वा.. मस्तच स्वर्गसूख च ओहोहो. धन्यवाद राम. देवाचे आभार मानते. आई आहे. माहेरी यायला मिळाले. आई करून खाऊ घालू शकते. गरम गरम खाण्याचा तूझ्या हातच खाण्याचा योग आला. "


इतक्यात वासाने स्वानंदी तिथे आली.

सासूबाई-" तीक्ष्ण आवाजात स्वानंदी."





क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
3/1/2026


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"