Login

ती आणि तिचं कुटुंब भाग 15

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 15

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

वास्तववादी कथा मालिका. विनंती वाचून नक्की कमेंट करा.


सासूबाई-"स्वानंदी आधी यांना, मला, दत्ता सगळ्यांना वाढून दे. सुनीताला बघ काय हवं काय नको. नंतर मग तू, लीला घ्या.'


स्वानंदीला खूप भूक लागली. लापशीच्या, कढीच्या घमंघमाटात भूक अजून कडकडून लागली.


सासूबाई -" ऐकू आलं का? आधी पुरुष मंडळी, पोरं-बाळ, सासू, सासरे यांना वाढले पाहिजे. काही वळण, संस्कार आहे का नाही? आयत्या वर कोयता मारायला आली. सासू, सासऱ्याना शुगर आधी त्यांचं पहाणे कर्तव्यच आहे तुझं. स्त्री आहेस तू. कळलं का? "

स्वानंदी- "हो. नाईलाजाने."


स्वानंदी- सगळ्यांना बोलवले, ताट पाणी घेतले. वाढायला सूरूवात कुठे काय वाढायचं, पोळी तोडून वाढायची शिकली.


सासूबाई-"यांना कढी अजिबात आवडत नाही. तू माहीत करून घे. कोणाला काय आवडत काय नाही."


या सगळ्यांना वाढून यांचे जेवण होत आले शेवटी सासूबाई म्हणे-" तुझं लीलाच ताट वाढून घे. लीलाच्या रूम मध्ये जा. "


लीला वहिनी, स्वानंदीने स्वतः च ताट पाणी घेतलं. स्वानंदीच्या मनात आलं. लीला, स्वानंदीला काय आवडत काय नाही हे कुणालाच माहिती नाही. सगळे घेतले निघाली. लीला वहिनीच्या रूम मध्ये दोघीं जेवायला बसल्या.


स्वानंदी-" लीला ताई सासू कधीच आई होऊ शकतच नाही का? मग सून कशी मुलगी होणार? "


लीला-"खरंय."


स्वानंदी-"सुनीता ताई साठी त्यांच्या फर्माईश मुळे सासूबाई नी कढी, लापशी काय भारी केली बघा. आधी त्यांना दिले गरम गरम. सून आणि मुलगी यांच्यात किती फरक केला जातो. फेव्हरेटिझम, ग्रुपईझम आहे. हेवे दावे आहेत. राजकारण आहे. आपला तो बाप्या, लोकांची ती कार्टी असं आहे. सुनेला नियम,बंधन, कर्तव्य आणि मुलीला काहीच नियम नाही..असं आज फारच जाणवले. आपली जशी मुलगी आहे तशी सून पण कोणाची मुलगी आहे. जी आपल्या घरात राबते, वंश वाढवते ती काही मशीन नाही तिला ही भूक लागते. हे काहीच नाही. माझी आई असते मला आधी वाढले असते. या सासूबाई ना आई म्हणा आहो, जावो करा. त्या आई होतच नाही."


लीला-"जेवून घे.. जाऊदे शांत हो.. सोडून दे.. नाहीतर तुलाच त्रास होईल अगं.. जेवताना जेवून घ्यावं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे.... म्हण.. बरं बस्स जेवायला. उगाच बरोबरी होणार नाही. मुलगी मुलगीच राहणार.. सून सून आहे. अपेक्षा नको त्रास होत नाही. कामं केल्याने जेवण चांगल पचत झोप चांगली लागते.. "


दोघीं जेवतात. पोटभर.

स्वानंदी-"लापशी, चांगली झाली. मी वेगवेगळे खाते. एकत्र नाही आवडत."

.
लीला-"स्वानंदी आवडलं ना? सासूबाईच्या हातच त्यांचं कौतुक कर खूप त्यांचं सुगरण आहे त्या. "


लीलाच्या रूमच्या दारावर थाप पडते



क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
7/1/2025


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"