Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 16

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 16

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.


लीलाच्या रूम मध्ये दत्ता आणि स्वरा, गार्गी येतात.स्वरा, गार्गीला दिसलें लीला घरी आली दोघीं लिलाला चिकटल्या. सासूबाई, सुनीता पण आल्या.


लीला-"तुम्ही दोघीं स्कूल मध्ये गेल्या नाही? खेळत बसल्या घरी"


स्वानंदी -" आज सुट्टी आहे त्यांना. उद्या पेरेंट्स मिटिंग आहे. ज्यांनी फीस भरली त्यांनाच ते परीक्षेचे पेपर यांनी कसे सोडवले पेपर्स ते दाखवणार आहे. किती मार्क पडले ते कळेल."


दत्ता -"आमच्या मराठी शाळाचं चांगल्या होत्या. काहीच फीस जास्त नाही."


लीला-"यावेळी खर्च जास्त झाला आहे. माझा दवाखाना. नीता दवाखान्यात. पोरीच्या फीस."


सासूबाई-"माझे, यांचे दोघांचे औषधं, गोळया, शुगर, बीपी, गुडघे दुखतात, खांदे दुखतात, चालूच राहत दोघांना दवाखाना, गोळया पैसे लागतात खूप खर्च आहे आमचा."


दत्ता-"एवढं करून दोघीना स्वरा, गार्गीला मराठी, इंग्लिश वाचता येतं नाही. एक सेकंड मध्ये आहे. एक फर्स्ट मध्ये आहे. परत ट्युशन लावली. आमच्या वेळी डायरेक्ट दहावीला ट्युशन असायची. कधीच पेरेंट्स मिटिंग नाही. काय आमच्या मराठी शाळेतील सोनेरी दिवस होते ते. बालपण, मित्र, शाळा सगळेच भारी.... वा आता आठवणी राहिल्या नुसत्या. मराठी शाळा पोरं घडवून चांगला माणूस बनवायच्या. संस्कार, शिस्त, असायची. खूप चांगल शिकवायचे. "


सासूबाई-" या दोघीना मराठी शाळेतच टाक. बदलून टाक शाळा. इंग्लिश शाळाच काय फॅड आलं आहे. काय माहिती. एवढी पुस्तक, एवढ्या वह्या येतं काहीच नाही. एवढ्याशा पोरांना विषय सगळे कॉम्प्युटर, इंग्लिश, विज्ञान सगळे विषय आहे त्यांना. रोज हे आणा ते आणा. हा डे तो डे तुमच्यावेळी कुठे होत असं."


लीला-"मराठी शाळा कोॅलिटीच्या होत्या.नवीन ट्रेंड सूरू झाला इंग्लिश शाळा. एक तर फीस जास्त. आज काल थोडं मारले की पालक भांडायला येतात. आमच्या वेळी खूप मारायचे त्यामुळे धाक असायचा, शिक्षकांविषयीं आदर असायचा. पालकांना आमच्या कळले की शाळेत मार खाल्ला तर आमचे पालक परत मारायचे तूच काही केलं असशील."

सुनीता-"खरंय वहिनी. शाळा काय सुंदर दिवस शाळेतील शिक्षक, वर्ग मित्र मैत्रीणी, शाळेतील झाड, शाळेतील मैदान, खेळाचा तास, पिटी, लेझीम, सहवीस जानेवारी, पंधरा ऑगस्ट, गाणं, शाळेसमोर चिंचा, बोर, पेरू, लबदू, गोळया, पोंगे, बोरकूट, बर्फाचा गोळा. लाल जेली साखर लावलेली क्रिमची बिस्कीट, चॉकलेट, पेप्सी प्लास्टिक पिशवीतली चोखायची, शाळेची सहल, परीक्षा, स्नेह समेलन, दहावीचा निरोप समारंभ."


स्वानंदी- "मराठी शाळा म्हणजे समृद्ध बालपण.... संस्कार, शिस्त माणूस उत्तम घडवला जाणारच. इंग्लिश शाळेत धड मराठी येतं नाही. धड इंग्लिश नाही. धड हिंदी नाही."


सासूबाई-"टाक मराठी शाळेत दोन्ही पोरींना."




क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
7/1/2025


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"