ती आणि तिचं कुटुंब - भाग 18
दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026
डिसेंबर जानेवारी 2025-2026
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती आहे वाचून नक्की कमेंट करा.
तब्ब्ल दोन महिन्यांनी नीताला ( दोन नंबरची सून ) डिस्चार्ज मिळाला. लीलाची तब्येत सुधारली दोन चार दिवसातच घरच्या कामाला लागली. सुनीता(नणंद) दोन दिवसात तिच्या सासरी दत्ता दादा सोडून आला. स्वानंदी लीला वहिनीला घर कामात मदत करत होती.
दवाखान्यात नीताचे आई वडील खुर्चीवर बसले होते. नीताच्या आईला रडूच कोसळले.
नीताची आई (शालिनी ) - "मुलीला दुसरी मुलगी झाली. सासरी खुश नाही. परत मुलगा पाहिजे त्यांना. नीताला दोन महिन्यांनी डिस्चार्ज मिळाला आज. आता घरी जायचे. नीताचे टेन्शन."
नीताचे वडील( श्रीकृष्ण ) -"होईल सगळे चांगले नको टेन्शन घेऊ. आपण माहेरी नेऊ तिला काही दिवस. " धीर देतात.
नीताची आई (शालिनी)-"मला खूपच दोन्ही पोराचे टेन्शनच आहे. या महेशचे मुलाचे लग्न जमत नाही. शिक्षक सरकारी नौकरी. मुलगा निर्व्यसनी आहे.. मुलींना काय पुणे, मुंबईत बंगलाच पाहिजे. इंजिनिअर पाहिजे, सि. ए.च पाहिजे. मुलाचे वय वाढत चालले छत्रपती संभाजी नगर मध्ये राहतो मग काय झाले.? सारखं क्षमस्व, योग नाही. काय चालू आहे कळतं नाही. चांगल्या मुली दुसऱ्या जातीत लग्न करून चालल्या. लव मॅरेज. नंतर येतं कानावर तिला मारले. घटस्फोटीत कित्येक मुली आहे. अपेक्षा खूपच वाढल्या. आपला मुलगा एकच आहे. शेती आहे गावी तरी लग्न जमेना? लग्न संस्था पार मोडकळीस आली. लग्न जमण अवघड झाले. मुली आहे त्याच्या वयाच्या त्यांना नाही वाटत लग्न करावं? लग्न म्हणजे ऍडजेस्ट करावं लागतच. त्या मुलीचे वय झाले त्यांच्या आई वडिलांना कसं काय टेन्शन येतं नाही. अपेक्षाच फार झाल्या. पुढे कसे होणार? "
नीताचे वडील ( श्रीकृष्ण ) - "आता त्याच काय दवाखान्यात इथे."
नीताची आई -"दोन्ही पोराचे अवघडच झाले आहे. अतिशय टेन्शन आहे. त्यामुळे बीपी, शुगर मागे लागला माझ्या वर्ष होत आले."
नीताचे वडील-"तू टेन्शन घेऊन काय होणार आहे का? होईल सगळे ठीक. "
नीताची आई-"कधी? महेशचे लग्न झाले. नीताला एक मुलगा झाला. माझा जीव एकदाचा भांडयात पडेल. "
महेश नीताच्या डिस्चार्ज फॉर्मॅलिटी दवाखान्यात करत होता. गणेश नीताचा नवरा ही होता. दोघांचे चालू होते. फॉर्म, पैसे भरणे. सह्या करण. गणेश औषध कंपनीत अकाउंट मॅनेजर सुट्टी घेऊन आला. महेशने शाळेतून सुट्टी घेतली.
इतक्यात गणेशला आईचा फोन आला
क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
9/1/2025
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
9/1/2025
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
