ती आणि तिचं कुटुंब - भाग 19
दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026
डिसेंबर जानेवारी 2025-2026
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती आहे वाचून नक्की कमेंट करा.
सासूबाई-"नीताला डिस्चार्ज झाला का? मी, हे दोघे अखंड हरीनाम सप्ताहला निघालो. तुम्हाला यायला घरी वेळ आहे तर जातो आम्ही. तू काही जास्त पुढे पुढे करू नकोस. करू दे तिच्या आईला, बापाला आणि माहेरी नेऊ दे. दोन -चार महिने. मोठी पोरगी राहू दे इथे. फोन ठेवते गण्या बाळा."
गणेश-"हो आई."
नीताला डिस्चार्ज झाला. बाळ, बाळंतीण घरी येतात. लीला वहिनी, स्वानंदी करतात त्यांचे वेलकम. सासूबाई सांगून गेल्या काही करायच नाही फारस. दुसरी मुलगीच आहे.
नीताची आई- "मालती ताई, तुमचे बाबा दिसत नाही."
गणेश-"अखंड हरीनाम सप्ताह ला गेली माझी आई फार देव देव करते."
स्वानंदी, लीला आनंद, उत्साहाने नवीन बाळाला घेतात, फोटो काढतात.हौसेन करतात.
लीला-"बाळ.. चिमणी.... गणेश भावजी वर गेली अगदी.. नाकी, डोळे, कपाळाची ठेवणं नाही का स्वानंदी? मुलगी पितृ मुखी सदा सुखी."
स्वानंदी-"मला तर सुनीता ताई सारखीच झलक वाटते.आत्या वर गेली."
नीताची आई (शालिनी) -"जावई येतो आम्ही नीताला महिनभर बाळंतपणाला नेऊ का?"
गणेश-"हो न्या न्या. मोठी मुलगी गार्गीला इथेच राहू द्या."
लीला-"आधी जेवून घ्या सगळ्यांनी.... बाळंतीणीसाठी पथ्याचे बनवला स्वयंपाक. बाळाला पचेल चालेल असं. सगळ्याच्या आवडीचं चला.. "
नीता-"लीला वहिनी तुम्ही खरंच माझ्या वेळेला धावून आल्या. मला रक्त दिले.तुमच्या जीवाची पर्वा केली नाही. मी तुमची आयुष्यभर ऋणी राहील. एवढं आजकाल सख्ख कोणी कुणासाठी करत नाही.. नीता हात जोडते. कृतज्ञता व्यक्त करते. तुम्ही खरंच मोठया आहात."
नीता, नीताची आई, लीला, स्वानंदी,गणेश यांचे डोळे भरून येतात. नीता स्वतःचे डोळे टिपते.
लीला-"ओली बाळंतीण रडू नको. अशी आता.. लेकरू त्याच्या कडे बघायचं आता. कशी खमकी पाहिजे. दोन गोड पोरी आहे पदरात देवाने दिलेल्या. त्यांना जप आता रडू नको. वेडी.. "
नीता-"त्या दवाखान्याच्या बेड वर तुम्हाला आयुष्याची किंमत कळते. तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज दिली. मी आणि या बाळाने. इतक्या संघर्षातून वाचलो. परतलो देवाची, लीला वहिनीचीच कृपा."
नीताची आई- "खरंच लीला ताई माझी मुलगी, नातं आज तुमच्यामुळेच....रडतात."
लीला-"सावरा आई. तुम्ही असं रडल्या तर कसं होणार."
लीला-"बस्स करा आता. भुका लागल्या आता खूप चला. आता. नीता तुझी खोली आवरली जा. डोक्याला बांधूनच रहा काढू नको. स्वेटर घाल थंडी आहे."
स्वानंदी-"चला सगळे ताट, पाणी घेतले स्वयंपाक घरात या.. हात, पाय धुवून या.. चला लवकर. "
इतक्यात सासूबाई, सासरे येतात.
क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
10/1/2025
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
