Login

ती आणि तिचं कुटुंब -भाग 20

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब - भाग 20

दिर्घ कथामालिका लेखन स्पर्धा
डिसेंबर जानेवारी 2025-2026

वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती आहे वाचून नक्की कमेंट करा.

सासूबाई-"जेवायला चला."

सासूबाई, सासरे जेवायला आधी बसतात. मग लीला नीताच्या आई, वडिलांना वाढते ते पण बसतात. गणेश भावजी, नीताचा भाऊ महेश सगळेच जेवायला बसतात.


नीताची आई-" मालती ताई जेवले की निघू घरी नीताला, बाळाला नेतो एक-सव्वा महिना. घरची फोर व्हिलर आणली आहेच."


सासूबाई (मालती)-"हो.. गार्गी ला राहू द्या. शाळा बुडेल तिची."


नीताची आई-"हो हो."


नीताला रूम मध्ये ताट देऊन स्वानंदी आली.


इतक्यात सासूबाईचा फोन वाजला स्वानंदी बाहेरून फोन आणते. सासूबाई च्या हातात देते.

सासूबाई-"सुनीता बोल. अरे वा वा.. छान छान.. अभिनंदन. चांगल झालं. आताच कुणालाच सांगू नकोस. जप स्वतःला. ठीक आहे. हो हो. हो ना.. नंतर बोलते. जेवण करते. तू जेवली का? बरं बरं काळजी घे. ठेवते फोन. थोडया वेळाने निवांत बोलते. हो हो."


लीला, नीताच्या आईला कळले. काय बातमी आहे सुनीताची. सासूबाईनी काहीच सांगितले नाही. सगळे मुकाट्यानं जेवतात.


लीला -" काय वाढू आई तुम्हाला?"


सासूबाई-"नाही काही नको बाई.."


जेवण आटपून नीताच्या आई, वडील, भाऊ तिघे बाळ बाळतीणीला घेऊन निघाले. पटकन काढता पाय घेतला. ते गेल्यावर.


सासूबाई-"आहो.. सुनीता ची गोड बातमी आहे.."


सासरे-"वा छान झालं."


सासूबाई-"तिची चोर चोळी केल्या शिवाय आताच कुणालाच सांगत सुटू नका. तिला इकडेच आणेन महिनाभर.. "


सासूबाई सुनीताला फोन लावतात- "हॅलो सुनीता.. अभिनंदन खूप छान बातमी दिली आता कुणालाच सांगत सुटू नकोस. चोर चोळी करते तुला तिसऱ्या महिन्यात इकडेच ये एखाद महिना. मगाशी खूप जण होते म्हणून बोलले नाही. नीता चे माहेरचे गेले तिला, बाळाला घेऊन ते आताच."


सुनीता-"महिनाभर नवरा सोडणार नाही. दोन दिवस त्यांना सोडून राहिले नुसता आरडा ओरडा केला त्यांनी. आताच चेक केले. महिनाच झाला आहे आताच."


सासूबाई-"सगळ्या कामाला बाई लाव चांगली आताच. होत नाही म्हणायचं. पहिल्यांदाच आहे. काळजी घे स्वतःची. "

सुनीता-"बरं ठेवू का फोन. ठेवते."


लीला ऐकते फोन वरचे सासूबाईचे बोलणे. मनात मी प्रेग्नन्ट होते. मला कधीपण म्हणायच्या कामं करत रहा. पूर्ण दिवसभरेपर्यंत नऊ महिने कामं करत राहायचे.. मी झाडायचे मग नॉर्मल होईल. आता स्वतःची मुलगी प्रेग्नन्ट आहे. सगळ्या कामाला बाई लाव. काही म्हणलं तर बरोबरी करत जाऊ नको. सारखीच काय बरोबरी करायची असते तुला. स्वानंदी म्हणते तेच खरं आहे आपला तो बाब्या लोकांची ती कार्टी....


स्वानंदीला तिच्या आईचा फोन येतो.


स्वानंदी-"हॅलो आई बोल ग. "





क्रमशः
©®सौ. भाग्यश्री चाटी-सांबरे
11/1/2025


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"