ती आणि तिचं कुटुंब भाग - 21
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथामलिका असून. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
लीला -"स्वानंदी फोन वर बोलून झाले का? "
स्वानंदी-"हो वहिनी. आईची तब्येत बरी नाही. फोन वर जाणवले. मला म्हणे तुझी आठवण आली. आई - बाबा दोघे बोलले माझ्याशी. मला फारच भरून आले. बोलताच येईना. आई- बाबांना सोडून कधीच राहिले नाही पदोपदी आठवण येते. खूप टोकाच्या विरुद्ध गोष्टी सासरी आणि माहेरी.
लीला -" मला तर आई वडीलच नाही. वडील लग्नाच्या आधीच गेले. आईने माझे लग्न केले. आईने उत्कर्षला पाहिले. स्वरा आईच आली म्हणते.. नेहमी आपल्या पेक्षा खाली कमी असलेले लोक बघून खुश राहायचे. बघ. काही अनाथ असतात जन्मत: त्यापेक्षा मला आई-वडील जास्त मिळाले. असं."
सासूबाई (मालती) येतात
स्वानंदी-"मी माहेरी जाऊन येऊ दोन दिवस आई."
सासूबाई-"नाही.... काय खजिना ठेवला आहे का आई कडे? काय सारखं आई कडे? आताच दोन महिने झाले नसतील जाऊन आली. इथे सुनीताची गोड बातमी आहे तरी आई वडिलांना भेटायला येता येतं नाही. सोडणार नाही. दोन दिवस राहिली तरी आरडा ओरडा केला."
लीला-"आई तुम्ही बाबा भेटून या. सुनीता ताईंना. काय खावं वाटत विचारून घेऊन जा. गणेश भावजी नी सुट्टी काढली रविवार लागून ते येऊ शकतील बहुतेक."
सासूबाई-"हा चांगल सांगितलं बघ. लीला गुणांची ग बाई माझी."
सासूबाई -"सुनीता.. हॅलो.. मी काय म्हणते.. मी, बाबा, गणेश येऊ का दोन चार दिवस तुला भेटायला. विचारून घे बाई. नंतर आरडा ओरडा नको. तुला काय खावं वाटत सांग तसं करून आणते."
सुनीता-"थांब यांच्या कानावर टाकते काय म्हणतात काय नाही मग तुला सांगते. बरं ठेवते."
दहा मिनिटात सुनीताचा फोन आई (मालती) ला येतो
सुनीता -" आई तुम्ही या.... टू बी एच के आहे. घर मोठं या तुम्ही. येताना लीला वहिनीच्या हातच्या पुरणपोळ्या, पुरण मोठा डबा भरून आण बघ. तूप आण. तूझ्या हातची इथे आली की कढी, लापशी कर.यांना लिंबाचे लोणचे आण बाई.
सासूबाई- "हो.. हो.. बरं येतो मग आम्ही. आता ठेवते फोन."
सासूबाई-"लीला बाई तूझ्या हातच्या पुरणपोळ्या पाहिजे. पुरण मोठा डबा भरून पाहिजे. लीला लाग कामाला."
लीलाने भरपूर पुरण घातले. उत्कर्षला पण पुरणपोळी आवडते, घरी पण खाऊ सोबत पुरण द्यायचे. पुराणासाठी डाळ शिजायला घातली. स्वानंदी पुरण जाळीतून चाळणीतून काढून दिले. सासूबाई वर असे कर तसेच कर सांगायला. लिलाच्या हातची पुरणपोळी म्हणजे अगदी ओठाने खा. टंब फुगलेल्या. मस्त घरचे साजूक तूप घालून भाजलेल्या. घरभर घमघमाट उत्कर्ष पळत आला.
उत्कर्ष-"आई आज पुरणपोळी. लगेच वाढ फार भूक लागली."
सासूबाई-"दे ग बाई.. माझ्या नातवाला आधी. "
स्वानंदीला आवडते लीलाला आठवलं लिलाने दिली.
लीला -" स्वानंदी ही तू घे चल. तुही सगळे पुरण काढून दिले."
हे ऐकून नशीब सासूबाई काही बोलल्या नाही.
इतक्यात सासरे तेथे आले.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा