ती आणि तिचं कुटुंब भाग - 22
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथामलिका असून. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
सुनीता-'वेलकम आई, बाबा, गणेश दादा तुम्ही आले."
आई-" काय आनंद झाला. सुने तूझ्या गोड बातमीने. चिमणी ग माझी आता आई होणार."
बाबा-"आम्ही परत आजी, आजोबा. होणार."
आई (मालती)-"काय ग बाई किती लांबचा प्रवास नुसती पाठ, कंबर गेली माझी. बसून बसून आता येईल मग येईल हनुमानाची शेपूट लांबतच चालली. कुठल्या कुठे वाढले नाशिक.. पाणी दे बाई आधी प्यायला."
बाबा- "जावई कुठे आहे?"
सुनीता-"नोकरी वर."
गणेश-"सुने घर मोठे, छान आहे ग. "
सुनीता-" आवरता, कामं करता करता नाकी दम येतो दादा."
आई-"आता कामं करू नकोस बाई लाव सगळ्यां कामाला. होतच नाही. त्रास होतो म्हणायचं."
सुनीता-"घ्या पाणी घ्या सगळे."
गणेश-"हे बाबा आणि आई मी गाडी चालवयला लागलो सारख्या सूचना जसे काही मला गाडी च चालवता येत नाही, जसं काय मला समोरचे दिसतच नाही. वैतागून सोडतात ड्राइव्हर होणं कठीण आहे. पडायचं सुने मला."
सुनीता-"पड.. समोरच्या बेडरूम मध्ये पड जा. दादा."
आई- (मालती)"चोर चोळीला माहेरी नेण्याची पद्धत आहे म्हणायचं. तुला न्यायचेच.. मस्त माहेरी चल दोन-चार महिने. तूझ्या सासूबाई, सासऱ्याना कळवले का? गोड बातमी आहे म्हणून काय म्हणाली शहाणी."
सुनीता-" शिकलेली आहे. मुलाला पण डॉक्टर केले. चांगले आहे तशे. सासूबाई, सासरे.गोड बातमी म्हणाले आनंद झाला येतो म्हणाले."
आई (मालती) -"आली मोठी शहाणी.... सासूबाईचा कैवार का ग?"
सुनीता-"जाऊ दे.... माझी पुरणपोळी दे बाई. गरम करून आणून दे."
आई (मालती) -"हो अगं मी पण प्रवास करून आले. दमले. थांब.. मला श्वास घेऊ दे. मला पण खायची पुरणपोळी. मला आवडते. "
बाबा- "पथ्य पाळत जा. शुगर आहे."
सासूबाई-"मी इन्शुलीन जास्त घेऊन टाकेल पण पुरणपोळी खाईनच. मस्त खाणे, पिणे मजा पाहिजे आयुष्यात."
लिला-फोन करते. " पोहचले का आई, बाबा सुखरूप.?"
सासूबाई-"हो हो.आताच पोहचलो.”
सुनीता-"लीला वहिनी थॅंक यू सो मच.... आल्या आल्या पुरणपोळी काढली. नेहमी प्रमाणे एक नंबर.. वा.. मस्तच. अन्नपूर्णा आहे. गरम करण्या इतका वेळ नाही लगेचच काढून सूरू."
लीला-"पोहचल्या.. दोन चार दिवस मज्जा करा ठेवते फोन."
लीला-"स्वानंदी आता तू आणि भावजी मज्जा करा जा बाहेर मूवी, गार्डन, हॉटेल मध्ये जा.. लाजली स्वानंदी."
राहुल-"चल स्वानंदी.. आधी रूम मध्ये तर चल.. स्वानंदीला ओढतो. हात पकडतो. स्वानंदीचे ठोकेच वाढतात. दोघे रूम मध्ये जातात."
दत्ता -"मोगरा गजरा घेऊन येतो. लीला पाठमोरी स्वयंपाक घरात झाकणे सूरू आहे. मागून येऊन गजरा केसात माळतो"
लीला-"इश्य.. दत्ता तिला चल रूम मध्ये ओढतो."
इतक्यात उत्कर्ष, स्वरा येतात-" आई..."
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढ म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा