ती आणि तिचं कुटुंब भाग - 24
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथामलिका असून. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
स्वानंदी जाते दार उघडायला.
राहुलचे मित्र आलेले असतात.
मित्र -" वहिनी राहुल आहे का? रविवार उठला आहे का?"
स्वानंदी-"हो बसा भावजी मी पाठवते."
स्वानंदी-"आहो तुमचे मित्र आले."
राहुल-" वा.. कोण कोण आले? "
स्वानंदी-" मनोज, प्रवीण, सचिन भावजी अजून कोण आहे नाव माहिती नाही. आहो माझ्या आई, बाबांना इथे बोलवायचे तर म्हणाले आज आपला दिवस फिरायला जाऊ, सुट्टी घेऊ. आता मित्रांना वेळ देणार. आलोच पाच मिनटात मागे म्हणे रात्री उगवलात. आठवले? असे करू नका. काय. मला वेळ द्या तुमचा आज."
राहुल-"बायको आली की मित्रांना भेटणं अवघड होते."
स्वानंदी-"दत्ता दादांना एक मित्र नाही. ते आई, वडिलांना, घराला, पोरांना वेळ देतात. नोकरी, कामं यात वेळ देतात. त्याच्या लिस्ट मध्ये पण बायकोचा नंबर सगळ्यात शेवटीच लागतो. ते पण बायकोला वेळ देतच नाही. बायकोला वेळ दिलाच पाहिजे. तिच्याशी लग्न कशाला केले? "
राहुल-"मित्र आले की आली भांडणावर. मस्त उपमा, पोहे करून आण."
स्वानंदी-"खरं आहे ते. अत्यंत गोडी गुलाबीत आहो मला वेळ द्या ना आजचा.. असं काय करता तुम्ही? अ.. "
राहुल-"पोहे वगैरे आण. थोड्यावेळात कटवतो आज."
राहुल जातो बैठकीत. स्वानंदी जाते स्वयंपाक घरात.
पोहे करायला घेते स्वानंदी. लीला वहिनी भाजी करत असते.
स्वानंदी-"वहिनी बायकांनी किती त्याग करायचा आई, वडील, माहेर च घर , सगळे नातेवाईक, मैत्रीणी. पुरुषांचे बरं आहे. घर तेच, आई वडील रोज भेटतात. मित्र भेटतात."
लीला-"लग्नानंतर मुलीच्या, बायकांच्या कोणत्या मैत्रीणी टिकतात. माझं हेच गाव माहेरचं. तर आई, वडील नाही. माहेर नाही. मैत्रिणींना दिले वेगवेगळ्या गावाला. त्या इथे माहेरी काही निमित्ताने येतील तेव्हा येतात. परत त्यांच्यावर बंधन परत सासरी जातात. बायकांच्या लग्नाच्या आधीच्या कोणत्या मैत्रीणी टिकून राहतात. ना त्यांचे भेटणे होते, ना फोन, मेसेज करायला त्यांना वेळ राहतो."
स्वानंदी-"यांचे बघा किती जुने मित्र अजून नेहमी भेटतात. घरी येतात. त्यांना पोहे करते."
लीला-"माझ्या मैत्रीणी खूपच जवळच्या ज्या माझे वडील सिरियस असताना माझी कॉलेजची फी न मागता माझी फीस भरत होत्या. माझी आई सिरीयस असताना आईच्या सख्या भावाने नाही पैसे दिले उधार. पण माझ्या मैत्रिणीने दिले. त्या मैत्रिणींना लांब पुणे, बीड ला दिले त्यांची भेट नाही, फोन करायला त्यांना वेळ नाही, मेसेज करायला वेळ नाही. अतीच संसारात अडकून गेल्या. त्यांना आता जवाबदाऱ्या, सासुरवास, बंधन, संसार एवढंच त्यांचं आयुष्य. सासर, पोरं, नवरा, घर, नोकरी इतकंच त्यांचं जग."
स्वानंदी-"खरंय वहिनी."
राहुल-"स्वानंदी आण लवकर. "
स्वानंदी -"हो आले. "
स्वानंदीने छान पोहे केले गरम गरम घेऊन गेली. त्यावर आलू शेव घातली. लिंबू काप घेऊन गेली.
स्वानंदी देऊन आली.
स्वानंदी-"लीला वहिनी तुम्ही इतक्या जवळच्या मैत्रिणींना भेटून किती वर्ष झाले. शेवटी कधी बोलणे झाले?"
लिलाचा फोन वाजतो.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा