ती आणि तिचं कुटुंब भाग - 25
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
लीला -"हॅलो.. बोला आई.. "
सासूबाई-"आज काही आम्ही येत नाही.. जरा नाशिक पाहतो.. देवदर्शन घेतो.. येऊ उद्या, परवा..कळवेल तुला तसं."
लीला-"बरं आई."
स्वानंदी-"काय सासूबाई काय म्हणाल्या?"
लीला-"उद्या, परवा येणार. नाशिक देवदर्शनाला जाणार आहे."
लीला आणि स्वानंदीना तितकंच निवांत असं वाटत. स्वानंदीला वाटत रहा चार दिवस तिकडेच.
राहुल मित्रांना कसं बस पोहे खाऊ घालतो कारण सांगून त्यांच्या सोबत जात नाही. सगळ्यांना
राहुल- "नंतर नक्की.. नंतर... हो हो म्हणत. बाय बाय करतो."
येतो स्वयंपाक घरात.
राहुल -"स्वानंदी पहिल्यांदा तुझ्यामुळे मित्रांना नाही म्हणालो मी."
स्वानंदी-"मी तर काय काय सोडून आले."
लीला-"भांडत बसू नका. जा आवरून कुठे. आई, बाबा उद्या, परवा येणारं आहेत. जा चला उठा. कुठे मूवी, हॉटेल प्लॅन रात्री.. आता काय खायचे खाऊन घ्या. "
राहुल, स्वानंदी दोघांना ही वाटत लीला वहिनी किती आपला विचार करते. नात्याला वेळ द्या. चांगल सांगते. स्वानंदी जाऊन मागून लीला वहिनीला मिठी मारते.
लीला-"जा जा आवरा.. खाऊन घ्या.. निघा."
स्वानंदी-"तुम्ही पण जा फिरायला गार्डन वगैरे पोरांना घेऊन."
स्वानंदी, राहुल दोघे फिरायला जातात. मज्जा करतात, एकमेकांना वेळ देतात. मूवी, हॉटेल, शॉपिंग करतात पाणीपुरी खातात.सेल्फी काढतात स्टेटस वर ठेवतात.
लीला, दत्ता, उत्कर्ष, स्वरा, गार्गी छान फिरून येतात गार्डन मध्ये.. पोरांना आनंद, लीला खूप वर्षाने नवऱ्या सोबत बाहेर फिरायला गेली पंजाबी ड्रेस घालून सेल्फी काढल्या दत्ताने.. जरा निवांत वेळ दिला एकमेकांना नातं नव्याने फुलते. लीला ने शॉपिंग केली काही घरच्या वस्तू, काही पोरांसाठी. सगळे बाहेरच जेवले. सगळे खुशी खुशी परतले. लीलाने स्टेटस वर काही फोटो टाकले..
आधी दत्ता, लीला, पोरं घरी आली थोडया वेळाने स्वानंदी, राहुल परतले.
सासूबाईचा फोन आला - लीला आवरत होती अंथरुण टाकत होती. म्हणून स्पीकर सूरू केला. तिथे स्वानंदी होती.तू आणि स्वानंदी फिरायला गेल्या होत्या का. सुनीताने तुमच स्टेटस पाहिले मला सांगितलं. मज्जा चालली आहे वाटत. आम्ही नसल्याने. आम्ही असताना नाही करत कधीच. पैशाची उधळण चालू आहे. कसा संसार पुढे जाणार. का ग बोल ना.
स्वानंदी-" रविवार होता मुलाना सुट्टी गार्डन मध्ये नेले."
सासूबाई-"तू, राहुल वेगळे गेले होते सुनीता म्हणे. रान मोकळे झाले तुम्हाला का ग? मज्जा मारणं चालू आहे तुमच? गावभर हिंडून आल्या तुम्ही. बरं स्टेटस मुळे कळले नाही तर चोरून मारून चालू आहे तुमच.
लीला-"आई.. मुलांना थोडा बद्दल.. रविवार सुट्टी म्हणून.. "
सासूबाई-" लीला काही बोलू नकोस. लेगीन, कुर्ती घालून जाते तू? ते काही नाही मी, हे परवा येतो."
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा