ती आणि तिचं कुटुंब भाग - 26
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
सासूबाई, सासरे, गणेश भावजी तीन-चार दिवसानंतर परतात.
लीला, स्वानंदी यांनी मिळून ठरवलं असतं. गोडीत आपले मुद्दे मांडायचे. उगाच ऐकून घ्यायचे नाही..आधी आपण सुरुवात करायची नाही. नाहीतर दुर्लक्ष करायचे.
सासूबाई या मागे फोन वर रागावल्या पण आल्यावर त्या विषयावर एकही शब्द बोलल्या नाही. काहीच नाही.
लीला, स्वानंदीला आश्चर्य वाटते. नंतर लीलाला समजते हे नंतर काही तरी मागून मोठे काही करतील. पूर्वानुभव.
नीताचा फोन येतो गणेशला -"मुलीचे बारसे करायचे. तुम्ही या सगळेच इकडेच माहेरी करू."
गणेश-"आईला म्हणतो आई काय म्हणते पाहू सांगेन तुला."
नीता-"आजच कळवा तशी तयारी करावी लागेल. नाव काय ठेवायचे ठरवा."
गणेश-"ठेव तूच."
नीताला गणेश मोकळे बोलत नाही जाणवले.
नीता-"कळवा लवकर ठेवते फोन."
गणेश-"आई नीताचा फोन आला होता. पोरीचं बारसे करायचे. नाव ठरवा. कधी करायचे. माहेरी करायचे तिच्या. आपण सगळ्यांना बोलवले."
सासरे-"मुहूर्त काढून देतो. "
सासूबाई-"हा तिच्या माहेरीच करा. करू दे त्यांना खर्च. दवाखान्याचा त्यांनीच केला ना. तुला ऑफिस कडून मेडिक्लेम मिळते ना. सगळ्यांनी कशाला जायचे? तू, तुझी मोठी मुलगी जा बस झाले. जा.. या खर्च.. इतके कशाला पाहिजे. नाव ठरवा तुम्हीच. मुलगा असता आपण केले असते. नाव ठेवले असते."
सासरे -"चार दिवसांनी मुहूर्त आहे चांगला. पंचांग पाहिलं सांग नीताला."
गणेश-"आता परत सुट्टी मला मिळेल का? कसे करू? मला जावेच लागेल.? "
सासूबाई-"अरे बापरे तुला पण सुट्टी मिळणार नाही. मग पुढच्या महिन्यात करा म्हणावं."
गणेश-"नीता म्हणेल लांबतच चालले. मी नाही गेलो कसं वाटेल? "
सासूबाई-"प्रश्न तूच विचारतो? उत्तर तूच देतोस. बघ बाबा तुझं तू. सुट्टी शिल्लक असतील तर घे. फार दमले प्रवासात लीलाला आवाज दे पाणी आण. माझे पाय चेपून दे रे बाबा."
गणेश-"मी पण दमलो प्रवासात आई."
सासूबाई-"अरे स्वानंदी, लीला त्यांना बोलव. लीला.... स्वानंदी. "
स्वानंदी-"काय आई."
सासूबाई-" पाणी आण प्यायला. पाय चेपून दे."
स्वानंदी-" थोडं गरम, कोमट पाणी आणू का? पाय घालून बसा फार बरं वाटेल."
सासूबाई-"आण. "
लीला-"प्यायला पाणी आणते. "
स्वानंदी गरम, कोमटसर करून पाणी आणते.
स्वानंदी-"यात पाय टाका."
गणेश-"नीताला फोन करतो. त्याच्या रूम मध्ये जातो. आताच सुट्टया झाल्या. परत मिळणार नाही. "
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा