Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 28

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 28


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.


सासूबाई(मालती ) -"हॅलो गणेश पोहचलास का सुखरूप? तुला कळवायला काय होत? सासरी गेला की तिकडचाच होतोस बघ तू."


गणेश-"पोहचलो सुखरूप."


नीताची आई-"मला बोलायचं आहे मालती ताईशी."


गणेश-"हे बघ नीताच्या आईला बोलायचं आहे तुझ्याशी."

सासूबाई-" हा दे. "


नीताची आई-" जावई बापूनी गाडी घरची आणली होती. तुम्ही, बाबा आले असते. छान झाले असते. कार्यक्रमाची शोभा वाढली असती."


सासूबाई (मालती)-"आताच सुनीता कडे जाऊन आलो. आता प्रवास होत नाही."


नीताची आई-"आत्या पाहिजे होत्या नाव ठेवायला."


सासूबाई-"हॊ.. आता काय करता. असो फोन ठेवते."


नीता-"जावायाचे सासरी किती लाड.. आवडीचा मेनू, गरम गरम, आयत वायत ताट वाढून.. माणसाने काहीच होऊ नये जावई व्हावं. काय थाट, काय लाड.. वा भारीच. लहान असून वयाने जावयाला आहो, जावो.... या बसा.. नाहीतर सुनेला सासरी.. अरेरे.. सून होऊच नये कोणाची.. डोक्याला ताप. बाईच होणं अवघड सून होणं महा अवघड.... कितीही करा वाळूत... फेस ना पाणी"


गणेश हसण्यावारी सोडून देतो.


नीताचे बाबा-"नीता काही बोलत असते. शांत बस."


नीता-"खरंच बोलले ना? जाऊ द्या."


नीताची आई -" झोपा आता निवांत तुम्हाला इथे दिवाण, गादी बेडशीट टाकले निवांत झोपा. काही लागले निसंकोच सांगा."


बारशाचा कार्यक्रम छान पार पडतो.बाळाला गणेश घेतो हसरा, निष्पाप चेहरा पाहून आनंदून जातो. गणेश वडील म्हणून लेकी साठी खुश होऊन जातात. खेळवणे, सांभाळणे, जपणे पाहून नीता खुश होते. नीताला खुश पाहून आई, वडील भाऊ खुश होतात. आनंदाने बारसे संपन्न होते. बारसे, नाव ठेवणे, उत्तम जेवण, नातेवाईक निमित्ताने एकत्र येणं, भेटी गाठी, आठवणीना उजाळा, आहेर, रिटर्न गिफ्ट, डेकोरेशन, फोटो सगळे पार पडते. काही नातेवाईक मुक्कामी थांबले. काही गेले.


अपरात्री गणेश, गार्गी एका ड्राइव्हर ने आणून सोडले. ड्राईव्हवर परतला. त्याने पैसे घेतले नाही. महेशने दिले होते म्हणाला.


गणेशने नीताला कॉल केला -"पोहचलो ग. ड्राइव्हरने पैसे घेतले नाही. तो गेला रिटर्न."


सासूबाई-"आलास का गणेश झोप बाबा आता निवांत कर आराम. गार्गी झोपली टाक तिला गादीवर."


गणेश-"झोपली नाही आई. "


सासूबाई-"माझी दाढ दुखते. गोळया घेतल्या आताच. बरं वाटेल आता. उद्या काढून टाकायच्या आहे. दोन दाढ.बरं पड आता उद्या सकाळी ऑफिस आहे तुला."




क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all