ती आणि तिचं कुटुंब भाग - 30
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
सुनीताला नवरा का गेली म्हणून फोन वर ओरडत होता. मालती ताईच्या कानावर काही गेलं.
आई (मालती ) - सुनीताला खुणावते दुर्लक्ष कर. तुझी तब्येत महत्वाची. टेन्शन घेऊ नको. सोडून दे. हो ला हो कर. ठेव फोन.
सुनीता-" आई तूझ्या हातचे साबुदाणा वडे कर ना किती वर्ष झाले खाल्ले नाही. मस्त दही आणि साबुदाणा वडे गरम गरम.."
आई (मालती) - "अगं दमले ग मी प्रवासात. उद्या करू. साबुदाणा भिजवावा लागेल ना."
सुनीता-"मग काय करतेस? वहिनी ला सांगू? काय कोण चांगले बनवतात. आई वंदना मावशीच्या चकल्या, ढोकळा तर किती वर्ष झाले खाल्ला नाही."
आई (मालती) - "अगंबाई वंदू माझी लहान एकच बहिणीची आठवण काढली. ए फोन करायचा का तिला? करू या फोन. बरेच वर्ष झाले. बोलणं नाही. ती तिच्या संसारात फारच बिझी झाली. मोबाईल वरून कॉल करता. बेल वाजते."
आई (मालती)- हॅलो वंदू.. अगं तुझी फार आठवण येते. कशी आहेस? सुनी ला दिवस गेले. डोहाळे मध्ये तुझी चकली, ढोकळा फार आठवू लागले.. "
वंदना (मावशी) - " वा.. वा.... अभिनंदन अभिनंदन.. पाठवून देऊ का कुरिअर ने चकल्या, ढोकळे.. सांग.. आता आज्जी होणार परत आपण.. "
आई (मालती) - " बोल सुनी शी."
सुनीता- " मावशी मला तुझी अधे मध्ये आठवण येतच असते ग.. तु मायेने दिलेल्या चकल्या, ढोकळे, खव्याचे गुलाबजाम फारच सुगरण तुझ्याच हातचे खावे वाटतात. तुला भेटावं वाटत. तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायच्या वंदना मावशी.. तुला कधी एकदा भेटते असचं होत."
वंदना ( मावशी) - " अभिनंदन.. वा.. वा... पाठवते तुला ताई कडे आली का? ताईच्या पत्त्यावर पाठवते. छान वाटलं बोलून, गोड बातमी समजली. आनंद आहे.."
सुनीता-"थँक यू मावशी.. भेटू आपण लवकरच.. ये बघ चांगला वेळ काढून.."
वंदना (मावशी) - " हो हो.. भेटू या. नक्की.. मी चकल्या, ढोकळे पाकीट कुरियर करते. बरं फोन ठेवते."
सुनीता- उलटीच होते अचानक. "अगं मुळे्याच्या भाजीचा वास येतो आहे. मळमळ होते, उलटी होते. मला लगेच.वासाने.."
सासूबाई ( मालती ) - " यांना आवडते, दत्ताला आवडते . मुळ्याची भाजी. तर करायला सांगितली मीच. "
सासूबाई लीलाला आवाज देतात.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा