ती आणि तिचं कुटुंब भाग - 31
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
सासूबाई (मालती) - " अगं लीला मुळ्याची भाजीचा वास सुनी ला सहन नाही झाला. तिने इथेच अचानक उलटी केली बघ. तिकडचे दार लावून घे. वास इकडे नको येऊ देऊ. हि उलटी आवरून घे बाई.. या सुनी ला काही आवडेल असं खायला कर बाई."
सुनीता- " मी आवरते माझे."
लीला-" राहू द्या. आवरते ताई. "
सुनीता-"नाही. मी आवरते. मला पावभाजी खावी वाटते. करशील का? पोरं पण खुश होतील. नीता, स्वानंदी दोघीं मदत करतील ना. लवकरच कर भूक लागली वहिनी."
सासूबाई (मालती)-"स्वानंदी, नीताइकडे या. ए.. नीता.... ए.... ऐकूच येत नाही का? "
नीता, स्वानंदी येतात.
सासूबाई-(मालती) - "आल्या. या.. लीला ला मदत करा. पावभाजी. उत्तम, पटकन झाली पाहिजे. सुनी ला खायची तुमची पोरं खातील, तुम्ही खाल, मी थोडी खाईल आशा अंदाजाने करा. यांना, दत्ताला पोळ्याच लागतील. चला निघा, आवरा."
सुनीता-"स्वानंदी तुझी कधी ग गुड न्यूज.. अ.. काय? "
स्वानंदी लाजून पळून गेली..
सासूबाई -"नीता आता मुलगाच पाहिजे."
नीता च्या मनात - नको ग बाई ते बाळंतपण. नीता मनात आताच जीवावरच गेले. आहे त्यांना पहाणे होईना आणि तिसरं पाहिजे. काय मुलगा तरी काय करतो? मुलगी तरी बरी.
तिघी जावा एकुलत्या एक नणंदेच्या डोहाळे साठी पटकन आज पावभाजी बनवतात. भरपूर बटर घालून, मसाला घालून छान चविष्ट पावभाजी बनवतात.घरभर पावभाजीचा सुगंध दरवळतो. मूल खुश होतात.
नीता- गणेशला फोन करून सांगते. "पाव घेऊन या. लादी पाव पाकीट."
सुनीताला आता आईस्क्रीम खावं वाटलं.
सुनीता- "आई आईस्क्रीम मँगो फ्लेवर पाहिजे. "
.आई (मालती)-" तुझं अवघड आहे. आम्ही विहिरीचे पाणी आणायचो. खटल्याच घर. नवव्या महिन्यापर्यंत कामं करायचो. काट्याचे सरपण, चाळीस जणांचा चुलीवरचा स्वयंपाक करायला दोन जणीच मी आणि एक नंबर जाऊ. धुणं नदीवर इतक्या लोकांचे कपडे, पुरुषांचे पांढरे शुभ्र नुसता बगळा चमकायचा. काहीच लाड तर नाहीच. चिंचा, आवळे, पेरू, केऱ्या हेच खाण. नॉर्मल डिलिव्हरी वीस रुपये मध्ये दत्ता, तू साठ रुपयाची."
सुनीता-"आई बस्स कर यार.... खूप वेळा तू कोणा कोणाला सांगितलं. मी खूप वेळा ऐकले.."
आई (मालती)- "आमचा काळ, आमची पिढी, आमच्या आठवणी, आम्ही आणि आमचा संघर्ष काय हि पोरं ऐकून सुद्धा घेत नाही. आम्ही कशा कशातून गेलो."
सुनीता-"ए लीला वहिनी हाक मारते.. "
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा