ती आणि तिचं कुटुंब भाग - 32
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
सुनीता -"लीला वहिनी दत्ता दादाला सांग मँगो फ्लेवर आईस्क्रीम आणायला. फॅमिली पॅक च आण म्हणा सगळेच खातील."
लीला-फोन करून सांगते " मँगो आईस्क्रीम सुनीता ताई ना डोहाळे आहेत नक्की आणा. फॅमिली पॅक आणा सांगितलं ताईंनी."
बघता बघता दिवसामागे दिवस जातात. आणि सुनीताचे डोहाळे पुरवणे, मूड बदलणे.. सगळे सुनीताचे करतात. कधी डोसे, कधी साबुदाणा वडा, कधी ऊसाचा रस, कधी मँगो आईस्क्रीम, पावभाजी, पुरणपोळी चालू रहाते.
लीला-"आई माझ्या वेळेस म्हणायच्या तुम्ही सतत कामं करत रहा शेवटपर्यंत. मग नॉर्मल होईल. सुनीता ताई ना जरा साधी सोपी कामं करू द्या. पुढे चांगल होईल असं मला वाटत."
सासूबाई-"इतक्या जणी आहेत. काळजी घ्यायला, डोहाळे पुरवायला तिला काय गरज आहे. तूझ्या माहेरी फार करणारे कोणीच नव्हते. म्हणून सांगितले."
सुनीता-"मी माहेरी आले कधी नव्हे ते इतक्या नवव्या महिन्यात कामं कर म्हणते. इतकी खुपते काय मी?"
लीला -"चांगल सांगायला गेले की असं जाऊ द्या."
सुनीता-" नऊ महिने पूर्ण झाले की आज मला सोनोग्राफी साठी डॉक्टर कडे बोलावले आहे. सकाळी दहा वाजता जायचे. आवरून घे. आई तू आणि मी जाऊ."
सुनीता-"सोनोग्राफी करतात डिटेल."
डॉक्टर केबिन मध्ये-" हे पहा गर्भश्यात पाणी कमी असल्यामुळे बाळाचे ठोके कमी भरत आहे. त्यासाठी आपल्याला अर्जेन्ट मध्ये सीझर करावं लागेल."
सुनीता घाबरून जाते. तिच्या हातापायाला घाम फुटतो.
आई-"खंबीर व्हायचं बघ सुनी. कुठे ही कापा तू आणि तुझे बाळ सुरक्षित राहायला पाहिजे.बस्स."
सुनीताला आईच्या शब्दांनी एकदम धीटपणा आला. सुनीताला ऑपरेशन थिएटर मध्ये नेतात.
सासूबाई (मालती)- लीला ला फोन करतात "हॅलो लीला अगं डॉक्टर ने सुनीचे सीझर सांगितले. लगेच तिला ऑपरेशन थिएटर मध्ये नेले. मी एकटीच आहे बाहेर या ग लवकर सगळ्या. दत्ता ला सांग, यांना सांग."
थोडया वेळात लीला, स्वानंदी, दत्ता, सासरे येतात दवाखान्यात घाई घाई. नीता, लहान पोरं घरी थांबतात.
अर्धां पाऊण तास वेळ जातो. बाहेर सगळ्यांना काळजी. मालती ताई इतर वेळा वाघीणीसारख्या असतात. आता देवाचा धावा सूरू असतो. कसं होईल, काय होईल चिंता असते. कारण ती आई आहे. आईच काळीज बाळासाठी कसं होत होते. आईलाच कळेल.
दत्ता -" सुनीताच्या मिस्टरांना कळवायला फोन करू का?आईला विचारतो. आधी कळवू का जावई बापूना."
मालती- "हो कळव सीझरला आत नेले."
इतक्यात डॉक्टर ऑपेरेशन थिएटर बाहेर येतात.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा