ती आणि तिचं कुटुंब भाग - 33
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
डॉक्टर-"अभिनंदन अभिनंदन.... आनंदाची बातमी सीझर मध्ये अडचणी आल्या पण आता सगळे ओके आहे मुलगी झाली. "
दत्ता- "ए मला मामा बनवले. हसत आनंदाने."
आई (मालती) - "रडायला येत. आनंदाश्रू येतात. आज्जी होण्यात काय आनंद आहे. माझी दुधावरची साय आली. अगं लीला आपल्या कडून नर्स, डॉक्टर त्यांना शंभर शंभर रुपये दे ग बाई. धन्यवाद डॉक्टर, धन्यवाद रे माझ्या रामा."
लीला-"हो आई. स्वानंदी नीताला कळव घरी."
दत्ता-"आता कळवतो जावयाला.फोन लावत बोलत जातो. अभिनंदन जावई, अभिनंदन तुमच. सीझर झाले, मुलगी झाली. पहिली बेटी धन की पेटी."
जावई-"हो का, इथे असती मी सीझर होऊ दिलं नसते."
दत्ता-"बरं असो.आज संध्याकाळी पर्यंत येतात ना, आई, बाबा सोबत याल ना. कळवा."
जावई-"हो बघतो, कळवतो, कोण कोण येते, कधी येतो."
दत्ता-"हो सावकाश या गाडी घरची आणाल.. ड्राईव्ह करत तुम्हीच याल ना."
जावई-"हो."
दत्ता-" बरं ठेवतो."
आई (मालती)-"बाळ-बाळंतीण कधी भेटता येईल डॉक्टर."
डॉक्टर -" बाळ येईल आता थोडया वेळात पेशन्ट येईलच."
आई (मालती) -"डॉक्टर बाळ, बाळंतीण सगळे नॉर्मल ना. "
डॉक्टर-", हो हो आजी बाई. अडीच किलोची बेबी आहे. नॉर्मल आहे. काळजी घ्या आता. "
आई (मालती) - " अरे दत्ता.... बर्फी, जिलबी आणावी लागेल."
आई (मालती)- लहान बहिणीला आनंदाची बातमी कळवावी. फोन लावतात. "हॅलो वंदू अगं झालो परत आजी आपण मुलगी झाली सुनी ला."
वंदना मावशी-"अभिनंदन.. अभिनंदन छान कसे आहेत बाळ, बाळंतीण."
आई (मालती)- "अगं सीझर झाले. आता सगळे चांगले आहे डॉक्टर म्हणाले. मग म्हणले वंदू ला कळवू. बारशाला ये आता तरी नक्की तुझं येणंच होत नाही. ये जरा वेळ काढून काही दिवस."
वदंना मावशी -"बारशाला येऊन जाईल. तूझ्या मागे आता बाळ, बाळंतीण आहे. नंतर येईल परत कधी निवांत. सुनी ला अभिनंदन सांग माझ्या कडून नक्की."
आई (मालती)- "बरं ठेवते. ये मग. ठीक आहे."
डॉक्टर, नर्स, बाळ, बाळंतीणीला ऑपेरेशन थिएटर बाहेर एका स्पेशल वॉर्ड मध्ये बाहेर आणतात. सुनीता ला भूल मध्ये झोपेतच असते.
बाळ आई (मालतीच्या) हातात नर्स देतात.आजीला बाळ हातात घेऊन आनंदाला पारावर रहात नाही.
आई (मालती ) - "अगं बाई नाकी, डोळे बापावर आहे. बघ ना लीला कशी बघते चिमणी."
दत्ता ला सुनीताच्या सासऱ्याचा फोन येतो
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा