Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 34

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 34


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.


सुनीताच्या सासऱ्याचा फोन येतो.


दत्ता- "हॅलो कशी आहे तब्येत बाबा.. "

सुनीताचे सासरे-"बरी आहे. आता तब्येत फार चांगली नसते. येणं होणार नाही आमच्या दोघांचे. म्हणलं फोन तरी करावा.पण मुलगीच झाली समजले. ठीक आहे. कसे आहे दोघ?"


दत्ता-"बाळ, बाळंतीण सुखरूप आहे."


सुनीताचे सासरे-"बरं बर.. काळजी घ्या. "


दत्ता-"बारशाला जमलं तर या नक्की."


सुनीताचे सासरे-"बघू. हिला बोलायचे तुमच्या आईला द्या."

दत्ता -"सुनीता च्या सासूबाई ना बोलायचे आई धर फोन."


सुनीताच्या सासूबाई-"हं कसे आहे बाळ, बाळंतीण? "


आई (मालती) - " ठीक आहे. अभिनंदन. सीझर झाले. मुलगी झाली. तुम्ही आजी झाल्या."

सुनीता च्या सासूबाई-"बरं.. मुलगीच झाली. आता पुढच्या वेळेस नक्की मुलगा पाहिजे आम्हांला."


आई (मालती)-" हो.. मनात कुठे तरी आपलेच शब्द परत आपल्या कडे आले असं वाटलं. सुनीताच्या सासूबाई ना काय बोलणार हो हो म्हणाल्या. या बारशाला या मग."

सुनीताच्या सासूबाई-"हो बघू तब्येत बरी नसते. बरं ठेवते."


आई(मालती)-"बाळ बाळंतीणी जवळ कोणी थांबायचं कोणी घरी जायचे आलटून पालटून जाऊन या सगळे इथे चालणार नाही. घरी पाहिजे घरची कामं, सगळ्याचे जेवण तसं ठरव दत्ता. तुझं व्यवस्थित असतं सगळे."


दत्ता-"सीझर म्हणजे आता काहीच खायला नाही देऊ देणार. पाणीही नाही सुनीताला. मी थांबतो आई तुम्ही सगळे जा घरी जेवून या. नीता ने केला असेल स्वयंपाक. जा लीला,, स्वानंदी घरचे पहा. आई जेवून ये तू रिटर्न सुनीता जवळ थांबायला मग मी जाईल. "


सुनीता-"पाणी द्या पाणी प्यायला. "

नर्स-"नाही सध्या काहीच नाही. देता येणार. पाणी नाही."


सुनीताच्या आईचा मालतीचा जीव खाली वर बाई पोरं पाणी मागते ते पण नाही देता येत. एवढं सीझर झाले.


दत्ता-"मी आहे इथे. तू जा आई घरी. जाऊन जेवून घे. इन्शुलीन घ्यायचे तुला. जा.सगळे."

आई (मालती)-"जावई कधी येणारं आहे? "

दत्ता-"तू जा आई घरी. जा जेवण करून औषधं घेऊन ये. मग रात्री थांबायचे. जा आता."

आई-"हो रे बाबा.. "


असेच तीन दिवस जातात. आई (मालती) दवाखान्यात रात्री थांबून


आई (मालती)-"होत नाही रे आता. आज रात्री निवांत झोपायचे मला. रात्री बाळ रडत. तिला पाजायला द्या. शी शु डाईपर बदला, हिला कधी देणार डिस्चार्ज कधी टाके काढणार? "


तीन दिवस झाले जावई आले नाही. सुनीताच्या सासूबाई, सासरे आले नाही.

आई (मालती)-" सुनीताच्या नवऱ्याला काय एवढी इमर्जन्सी ऑपरेशन? बाप पोरीला पाहायला आला नाही. बायकोच सीझर झाले. आला नाही? काय बाई माणसं? उगं सुनीता झोपली म्हणून तिच्या समोर बोलता येत नाही. तूझ्या जवळ बोलते दत्ता काय रे असा काय नवरा हिचा? "


दत्ता काही बोलणार इतक्यात सुनीताचा नवरा येतो.


दत्ता-" विषय बदलत.. या जावई.. या पंत या. "


आईला(मालती) वाटत ऐकले की काय जावयाने काही? मनातून घाबरते ऐकले का काही?




क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all