ती आणि तिचं कुटुंब भाग - 35
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
आई (मालती)-"अगं सुनीता ऊठ बाई.. जावई आले बघ."
डॉक्टर जावई ( सागर ) - "राहू द्या. झोप लागली असेल तर झोपू द्या."
सुनीता उठते -"आले का? का बरं इतक्या उशिरा? तीन दिवस होऊन गेले."
दत्ता-"शु.. सुनी हळू जरा. बाळ झोपलं, दवाखाना आहे. आई चल बाहेर जरा. चल लवकर."
आई (मालती), दत्ता बाहेर जातात. दत्ता बाहेर जाताना रूमचा दरवाजा ओढून घेतो.
दत्ता - बाहेर आल्यावर " तू आता काहीच म्हणू नको जावयाला. सध्या."
आई (मालती)-"बरं बाबा.. का मगाशी माझे तुझे बोलणे ऐकले का काही जावयाने."
दत्ता-"काय माहिती? "
आई-"तू पटकन विषय बदलला.. बरं जमतं तुला.. घेतलं सांभाळून. जावई झोपलं त्यांच्या जवळ रात्री आता. "
दत्ता-"नाही. लांबचा प्रवास करून ड्राईव्ह करत आला आहे. गोडीत विचारून पहावं लागेल."
आई-"हो.. जावायाची जेवण, झोपणं घरी व्यवस्था करावं लागेल वरची सुनीची रूम आवरून घ्यावी लागेल. "
दत्ता- "सुनीला घरी नेल्यावर बाळंतीणीला खालची रूम द्यावी लागेल आता. स्वानंदी आणि राहुल ला वरची सुनीताची रूम द्यावी लागेल. त्यांची रूम बाळंतीणीला दयावी लागेल. आता आठवा, नववा महिना आई तूझ्या रूम मध्ये खालीच राहिली सुनी. पायऱ्या चढउतर नको म्हणून. वरची रूम साफ करावी लागेल. स्वानंदीला फोन करून सांगतो तसं."
आई (मालती)-"तुझं व्यवस्थित नियोजन असतं रे बाबा."
दत्ता-"हॅलो स्वानंदी.. दोन गोष्टी ऐक. एक तर तुला लगेच वरची सुनीची रूम साफ करावी लागेल. त्या रूम मध्ये तू आणि राहुलला शिफ्ट व्हावं लागेल. दुसरं तुमची रूम खालची बाळंतीणीला द्यावी लागेल. आणि ऐक जावई आले हॉस्पिटल मध्ये डायरेक्ट. त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करायला लीलाला सांग. तिला माहिती आहे सगळे."
स्वानंदी-"हो दादा. "
दत्ता फोन ठेवतो.
आई (मालती)-"रात्री सुनी जवळ बाईच पाहिजे. जागावं लागत. बाळाचं, तिचं काही पहावं लागत. दूध पाजा रे, झोका द्या रे, डायपर बदला बाळाचं. झोप होत नाही. मला होत नाही रे आता."
दत्ता-"एखाद नर्स ठेवायची का? "
आई (मालती)-" घरात एवढी माणसं आहे.लीला, स्वानंदी, नीता."
दत्ता-"नीताचे बाळ लहान आहे. स्वानंदीचे नवीन नवीन लग्न आहे. लीलाला आणले. सकाळी घरी कधी जाईल. पोरांचे आवरा, डब्बे, शाळा कोण पाहिलं? मलाही पोराचे करावे लागते. तरी उशीर होतो."
आई (मालती)-"हो रे..सकाळची गडबड, सगळे बिझी आपापल्या संसारात.. मीच रहाते शेवटी."
दत्ता-"एखाद नर्स ठेवू,. ऐक तू.... बाळ, बाळंतीणीच काय काय करायचे रात्री. हे बोलून घेऊ. तुझी पण झोप होईल."
आई (मालती)-"सुनी ला काय वाटलं."
दत्ता-" समजून घेईल ती. "
आई (मालती) - "दवाखाना म्हणलं की पेशंट बरोबर राहणाऱ्याची आबाळ.. दवाखाना म्हणलं की पैसा लागतो तो वेगळाच.. मनुष्यबळ पण पाहिजे. पैसाही पाहिजे.. तरी आपल्या घरात इतकी माणसं एकत्र कुटुंब तरी कमी पडतात."
दत्ता-"बरं एक रात्र.. आधी गोडीत विचारून पाहू.. जावई राहिले तर बरंच आहे."
दत्ता आणि आई (मालती) सुनीताच्या दवाखान्यातल्या स्पेशल रूम मध्ये जातात.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा