Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 36

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 36


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.



रूम मध्ये जाण्याच्या आधी दत्ता बाहेर टकटक करतो. मग आत जातो.


सुनीता -"हे आले नाही तीन दिवस यांच्या कडे समाधानकारक उत्तर नाही. सुनीता रडत सांगते."


आई (मालती) - "बाळंतीण बाई ने असं रडायचे नाही बघ. शु.. अजिबात नाही.. एवढी देवाने छान मुलगी दिली. तिच्या कडे पाहायचे आता जवाबदारी आहे आता तुझ्यावर.."


दत्ता-"जावई दमून आले लांबच्या प्रवास करून ड्राईव्ह करून जा घरी जेवायला. तुम्ही, आई जा घरी.. "


जावई-"ठीक आहे येतो आम्ही."


सुनीता-" हो हो.. जा.... खा, प्या, झोपा काढा. मज्जा करा.. तुम्हाला काय? इथे काय चालू आहे त्याचे? "


जावई-"मी जेवून परत येतो इथे. थांबतो.. रात्रभर. ड्राईव्ह करून, प्रवास करून, लांबून आलो तुला काय?"


आई (मालती) - " कृपया भांडू नका आता."


दत्ता- आईला बाजूला घेऊन हळूच म्हणतो. "आई तुम्ही जा दोघे घरी. जेवण करा, औषधं घे. तूच ये परत. ये आजच्या दिवस उद्या नर्स बघू."


नर्स-"यांना आता नारळ पाणी, ज्युस द्या."


दत्ता-" ओके"


जावई-"मी आधी ज्युस आणून देतो. मग जाऊ आपण आई."


जावई ज्युस आणायला गेला.


दत्ता-"सुने भांडू नको जावया सोबत. गोडीत घे. गोडीत घेणच चांगल. तूझ्या फायद्यासाठी सांगतो."


आई ( मालती)-"गोडीत जिंकून घे."

सुनी-"हम्म."

आई-"सुने आज येते मी रात्री. पण उद्या पासून रात्री नर्स ठेवू. तू समजून घे. होत नाही ग आता मला. जागरण झाले की त्रास होतो ग. चालेल ना."


दत्ता-" मी आहे सध्या इथे आई आलो की जाईन घरी. आई तुला राहुल, गणेश कोणी सोडेल. मला घरी घेऊन जाईल."


बाळ थोडं भुकेले रडते.आई (मालती) सुनी कडे देते.
सुनी बाळाला प्यायला घेते.


जावई नारळ पाणी, ज्युस घेऊन येतो..


सुनीता जवळ ठेवतो.

जावई-"येतो रात्री जेवून.. येतो इथे."

दत्ता-"बघा जावई नक्की.. नाहीतर आराम करा घरी."


जावई-"नाही येतो मी."


दत्ता-"बरं.. मग आई जावई येऊ लागले. तर तू थांब घरी."


आई (मालती)-"हो. सुने उद्या सकाळी येते ग. अच्छा. बाय चिमणी."


दत्ता -"आई.. जावयाला सोडायला. मला घरी न्यायला गणेश, राहुल ला कोणाला तरी पाठव. "


आई होकारार्थी मान डोलावते. आई, जावई घरी जेवायला जातात.


दत्ता बसतो पेशंट रॅलेटिव्ह बेडवर.


इतक्यात डॉक्टर येतात, नर्स येतात. व्हिझिट साठी.





क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all