Login

ती आणि तिचं कुटुंब -भाग 37

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 37


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.



डॉक्टर चेक करतात सगळे. नंतर जातात. असेच तीन रात्र जावई सागर राहतो. परत इमर्जन्सी ऑपरेशन येते जातो. दहा दिवसांनी टाके काढतात. कसं बस रात्री, आई, जावई, नर्स करून दिवस काढतात. मध्ये पाचवीची पूजा होते. दहा दिवसांनी आज डिस्चार्ज होतो.


घरी लीला, स्वानंदी, नीता मिळून नणंदेच्या, बाळाच्या वेलकम ची खास तयारी करतात.


आई (मालती) - फोन करतात " हॅलो लिला आम्ही येत आहोत घरी. डिस्चार्ज मिळाला आहे. सगळे कागदपत्रे, पैसे देणं झाले.सगळेच झाले. सुनीची खूपच चिडचिड होत आहे. रात्री झोप नाही. बाळ जागवत, नवरा कामाने तिकडे इथे जवळ नाही, खाण्यावर बंधन हे चालत नाही बाळाचं पोट दुखेल, ते चालत नाही. फारसे दूध उतरले नाही. सीझर मध्ये खायला देतं नाही लगेच. टाके काढले पण दुखतात. सगळ्यांना सांग खूप सांभाळून घ्यावं लागेल."


लीला-"हो आई सगळ्यांना सांगते. काळजी करू नका. होत असतं. दूध येण्यासाठी कातबोळ द्यावा लागतो. दाताला न लागू देता गिळावा लागतो होईल."


दत्ता- "सुने बाळासाठी व्हिडिओ कॉल येत आहे तूझ्या नवऱ्याचा. नीट गोडीत बोल म्हणजे बारशाला आले पाहिजे. चांगले बोल ऐकत जा माझे. डॉक्टर आहे. ऑपरेशन असतात. बिझी आहे समजून घेत जा. धर लवकर फोन बोल."


सुनीता -" हॅलो.. बाळ हे काय आताच दूध पाजलं झोपले. बाळ दाखवते तुम्हाला. हो मी बरी. टाके दुखतात. तुम्ही बारशाला या आता नक्की काय? हो. मी वाट पाहते. बाळाला बाबा सोबत फोटो काढायचे. वेळ काढा बाबा. या तुम्ही म्हणत बाळ. साधं करणार आहे. माझं सीझर फार कुठे जाण, ऊठ, बस होणार नाही मला. तुम्ही नक्की या. "


दत्ताच्या मनात शंकेची पाल चूक चुकते. का इतकं म्हणावं लागते.जावयाला की स्वतःच्या पोरीच्या बारशासाठी या म्हणून बायकोला विनवणी करून बोलवावे लागते ही गोष्ट तो गणेश जवळ बोलतो.

दत्ता-"गणेश जावयाला इतके कामं आहे. स्वतःच्या पोरीच्या बारशाला दोन दिवस या म्हणून विनवणी करावी लागते? कुछ तो गडबड हे.... "


गणेश-"दत्ता दादा तू म्हणत आहेस तर असेल काही नक्की. पण नसावं तसे काही."


घरी निघावे म्हणून आई, सुनीता, बाळ, सामान घ्यायला राहुल, गणेश, दत्ता आत जातात. सगळे गाडीत बसतात.


घरी खूपच जय्यत तयारी केलेली असते स्वानंदीने खूपच छान रंग संगती करत आखीव रेखीव रांगोळी काढली असते. फुलाचे डेकोरेशन, शहनाई वादन लावले असते. उत्कर्ष हौसेने फटाके उडवतो. लीला तुकडा, पाणी, औक्षण करते.सुनीता, बाळ जोरदार वेलकम होते. सुनीता ला छान वाटते.

आई (मालती)- "माझे घर आज गोकुळ झाले रे रामा. तुझी कृपा राहू दे रे बाबा.."


दत्ता ला राहून राहून शंका येते म्हणून तो जावयाला सहज फोन लावतो.



क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all