ती आणि तिचं कुटुंब भाग - 38
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.
दत्ताचा फोन जावई उचलत नाही. बराच वेळ होऊन जातो कॉल बॅक हि करत नाही. दत्ताला शंकाच येते.
सुनीता आता बारसे होणार. सारखे नवऱ्याला फोन करते. आले का? या नक्की. कुठ पर्यंत आले? शेवटी नवरा चिडतो. मग फोन करत नाही. कसा बसा नवरा बारशाला
म्हणून घरी पोहचतो. घरीच मोजके नातेवाईक बोलावून बाराव्या दिवशी घरीच बारसे करतात.
जावई घरी पोहोचतात. आल्या आल्या चहा, पाणी होते. मग जावई ना प्रश्न पडतो. नाव काय ठेवायच?
जावई (सागर) -" नाव काय ठरवलं सुनीता? "
सुनीता-"तुम्हाला काय वाटते? तुम्ही काय ठरवलं नाव? तुम्ही काय विचार केला? आपल्या मुलीचं नाव ठरवण, मुलीला, बायकोला वेळ देणं का करत नाही? काय झाले?"
जावई-" ठेव तुझ्या मनाने."
सुनीता-"ईरा कसे आहे. "
जावई -"वा..छान. "
बारसे झाले की दुसऱ्या दिवशी जावई परत निघून जातो.परत येत नाही. फोनवरच बोलणे.
सव्वा महिना सुनिताचे बाळंतपण चालते.शेक शेगडी, लाडू, पेज, खीर दुध यावं म्हणून, धुरी, बाळाला घुटी, लंगोट, दुपटी धुवायला, बाळ, बाळंतीणीला मालिश करायला बाई.सगळे लाड, कोडं कौतुक
सुनीता-"बाळ रात्रीचे झोपू देतं नाही. मग झोपेची किंमत कळते. केवढी त्रास देतात पोरं रोज साडे तीन, चार पहाटे पर्यंत जागतात, दुध पाजणे, शु, शी डाईपर बदला. मग आपल्या आईने आपल्यासाठी किती केले आपल्याला जाणीव होते. आई होणं किती अवघड आहे. मुलांना काही वाटत नाही आईची जाणीव. मी आई झाले मग मला तुझी किंमत कळली आई. सासरी गेल्यावर आई भेटत नाही तेव्हा, सासरी आई नसते मागितले ते द्यायला आपल्याला करावं लागत मग आपल्या आई ने किती केले याची जाणीव होते."
आई (मालती)-"ऐकून घेत होती.
नीता तिथे येते. नीता-":आहो आई ह्या गार्गीला सारखीच नवीन तक्रार आहे. तू रेवालाच घेते प्यायला, तिलाच अंघोळ घालते. तू तिचं करते. मला जवळ घेत नाही. माझे करत नाही. बाबा कडेवर त्या रेवालाच घेतात. मग ती रेवा लहान आहे. गार्गी मोठी ताई आहे.गार्गी हुशार, शहाणे बाळ आहे. गार्गी आता तिचं तिचं सगळे करू शकते.बाळ कशाला झाले. मग आधी मलाच घ्यायची.
आई -"गार्गी शहाणे बाळ आहे ना तू. मग असं म्हणू नाही. उद्या आपली सुनिता आत्या आणि ईरा बाळ चालले त्यांच्या घरी. तुझे बाबा सोडून येणारं त्यांना त्यांच्या घरी. तू जाते का? तुझी शाळा बुडते. मिस रागवेल ना.
आई (मालती) - "हे लागेल, ते चांगले आहे, हे घेऊन जा"
लोणचे, पापड, डाळी नीताच्या शेतातून माहेरहून आलेले काही. खूप काय काय बांधून दिले. हळद, तिखट घरचे गिरणीत दळलेले. तिन्ही भावजया पॅकिंग करायला. इतक्या गोण्या जमा झाल्या, खूप सामान जमा झाले. कुरडया, पापड, खारोडया घरी केलेल्या भावजयानी.
आई-"सुनी, ईरा गेले की मला करमणार नाही ग."
दत्ता जावयाला फोन करतो. जावई फोन उचलत नाही.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा