Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 39

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 39


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.


सुनिता, सुनीताची मुलगी ईरा,गणेश दादा सुनिताच्या सासरी पोहचतात. घरी कोणीच नाही. घराची चावी ठेवण्याची जागा सुनीताला माहिती असते. ती दार उघडते. खूप सामान इकडे तिकडे पडलेले असते. घरभर पसारा पाहून


गणेश दादा-"सुनी बाई लाव कामाला करून घे. बाळ, स्वयंपाक वगैरे आता एवढी कामं करू नकोस. आताच सीझर झाले आहे काळजी घे.


सुनिता-"आता सातवा, आठवा महिना कामाला बाई लावली होती. मी गेले बाई बंद झाली. आता बोलावते परत."


गणेश-"लगेच बोलावं तिला."


सुनिता - फोन लावते. " हॅलो ताई.. मी आले. या तुम्ही आजपासून कामाला. मी म्हणाले होते परत बोलवणार. या मग. हो. वाट पहाते. हो मी घरीच आहे. या. लवकर बरं. ठेवते."


गणेश हळू हळू सगळं सामान आई, भावजया नी दिलेल्या गोण्या घरात आणतो.सुनिताला विचारून ठेवतो. दमून जातो.


सुनिता-"आई, तीन वहिनीनी खूपच सामान दिले आहे. "

गणेश-"हो ना लाडकी लेक."


सुनिता -"बैस दादा. तुला लागतो तसा चहा करते. मस्त आले घालून, कडक.. चहा प्रेमी खुश."

गणेश-"पाणी दे ग."


सुनिता- "हे घे पाणी पी.. हात पाय धुवून घे. फ्रेश हो. हा चहा घे. आईने आपल्याला दिलेले डब्बे वाटेत खाल्ले पोटभर.. त्यामुळे झोप येत आहे. मस्त झोपावं वाटते. पड जरा दादा. ईरा पण झोपली आहे. समोरच्या बेडरूम मध्ये झोप जा. मी पण या आमच्या बेडरूम मध्ये पडते जरा निवांत"


इतक्यात कामवाली बाई येते. तिच्या कडून सगळे आवरून घेते. सुनिताचा वेळ जातो. त्या बाई कडून करून घेते. धुणं, भांडी, फरशी सगळे बाई आवरते.


कामवाली बाई - "ताई मुलगी झाली. जिलबी पाहिजे. अभिनंदन तुमचं.आज आले का माहेरहून?"


सुनिता -" हे काय आता येतोच आहे. माहेरहून येताना आईने जावयासाठी खास जावयाच्या आवडीची मोहनथाळ दिली आहे. हि घे सध्या."


सुनिता-"अगं बाई.. पोहचलो म्हणून फोन करायचा राहिलाच की. बरं आठवलं अचानक. थांब. कॉल करते.फोन लावते. हॅलो आई पोहचलो ग सुखरूप. आलो घरात. यांनी काही फोन उचलला नाही. हे घरी नाही. यांना माहिती नाही आम्ही आलो ते. सरप्राईझ नवऱ्याला. बरं ठेवू का फोन.कामवाली ताई आली तिच्याकडुन आवरून घेते. "


सुनिता बेडरूम मध्ये जाते. े पसारा बाई कडून आवरावा म्हणून बेडरूम दार उघडते. बेडशीट पाहून काही शंका येते. तिला एक लिपस्टिक सापडते.जी तिच्या ड्रेसिंग टेबल वर असते आणि बेड विस्कटलेलं असते. बेड वर मोठे केस दिसतात. काही पडलेले. तिला मोठा धक्का बसतो.


तेवढ्यात बेडरूम आवरायला कामवाली बाई बेडरूम मध्ये येते.




क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all