Login

ती आणि तिचं कुटुंब -भाग 40

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 40


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.


.

कामवाली बाई समोर काय रिऍक्ट करायच? काही कळतं नाही सुनिताला.


कामवाली बाई-"सुनिताला सांगू लागते. तुम्ही गेल्या माहेरी मला माहिती नाही.मी घरी येणार तेव्हा एक डॉक्टर बाई शेजारच्या त्यांनी दारं लावलं हे बाहेरच घाई घाई. मी कडी वाजवली. उघडले नाही. मी निघून गेले. परत आले. तुमचे आहो खाली पार्किंग मध्येच भेटले म्हणे बायको माहेरी गेली. मुलगी झाली. आता काहीच कामं नाही ती आली की बोलवेल. मग या. मी ठीक आहे म्हणाले. गेले मग."


सुनिताला नवऱ्याचा प्रचंड राग आलेला असतो. तिला कधी भेटते आणि खडासून विचारते असं होते. गणेश दादा ला सांगावं की नको असा विचार करते. आधी तिचं, नवऱ्याचे बोलणं होऊ दे क्लिअर होऊ दे मग गणेश दादाला सांगू असा विचार करते.


इतक्यात सुनीताचा नवरा हॉस्पिटल मधून घरी येतो.


सुनिता कामवालीला तो पर्यंत हॉल मध्ये सगळे झाडायला, पुसायला पाठवते.


सुनिता - "आहो मला तुमच्याशी बोलायचे आहे."

सागर (सुनिताचा नवरा)- " तुम्ही कधी आलात? ईरा कुठे?"

सुनिता-"उगाच विषय बदलू नका. मला बोलायचं आहे सिरीयस.बसा इथे बेडरूम मधल्या खुर्ची कडे बोट दाखवते."


सागर (सुनिताचा नवरा) -" जरा नवीन वाटते. या पद्धतीने का बोलते?बसतो खुर्चीत."


सुनिता-"हि लिपस्टिक कोणाची आहे आपल्या बेडरूम मध्ये इथे ड्रेसिंग टेबल वर होती? बेड कडे बघा कसं विस्कटले आहे बघा. या बेड वर हे मोठे केस कुणाचे?"


सागर-"अगं ते का. मी तूझ्या कडे निघालो तेव्हा शेजारच्या डॉक्टर मित्राकडे काही कार्यक्रम होता. त्यांना जागा कमी पडत होती. मग एक दिवसा करता आपली चावी दिली होती. काही लेडीज इथे राहिल्या. मग मी तूझ्या कडून रिटर्न आलो.. चावी मला देऊन टाकली त्यांनी.आता तू नाही तर मी या बेडरूम मध्ये आलोच नाही. मी एकटाच टीव्ही पाहता पाहता हॉल मध्येच झोपायचो."


सुनिता-"इतक्या लोकांनी आपले घर, आपली बेडरूम वापरली. बापरे. नक्की हेच कारण आहे ना. इतक्या शांतपणे बोलतोय.खरं आहे की खोटं.. खरं सांग शप्पथ घेऊन सांग. माझ्याशी खोटं बोलू नकोस अजिबात."


सागर-" संशयी बाई नुसती.. नात्यात विश्वास हवा. चल जा इकडून. निघ. चल."


सुनिता मनात काय खरं काय खोटं याचा शोध लावेलच मी.




क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all