Login

ती आणि तिचं कुटुंब -भाग 41

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 41


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा



वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.



सुनिता आता गोष्टीच्या मुळाशी जाणून घेण्यासाठी विचार करते.हुशार असते.

दुसऱ्या शेजाऱ्यांना विचारते- " या डॉक्टर मित्र शेजारच्याकडे काय कार्यक्रम होता? तारीख काय होती?"


सुनिताचा नवरा त्याच तारखेला तिला भेटायला माहेरी आला होता का? क्रॉस चेक करते. तर तारीख मॅच होते.


आता सुनिताला संशय येतो. नवऱ्याला इतके स्वच्छ लागते. इतक्या लोकांना आपले घर, बेडरूम कशी काय वापरायला दिली? दुसरे म्हणजे एवढी मैत्री, विश्वास कसे काय ? इतकी जुनी नाही मैत्री. तशी एखाद वर्षाचीच मैत्री. त्यांच्याकडे घराची चावीच देऊन टाकली नवरा गावाला निघून गेला? कसे काय? विचार करून डोक्याचा भुगा होतो. अति डोकं दुखू लागते.


स्वयंपाकला बाई मिळाली नाही. नवरा, ती आणि गणेश दादा साठी स्वयंपाक करते.


सुनिता मनात विचार करते. धुण्यासाठी, भांडयासाठी, झाडणे, पुसणे यासाठी कामवाली लावली. ती मिळाली हेच नशीब. नंतर लक्षात येते. शेजारच्या यांच्या मित्र डॉक्टर कडे स्वयंपाकाला बाई आहे.तिला लावू बोलण्या बोलण्यात काही माहिती पण मिळेल.


सुनिता - "गणेश दादा, सागर आहो.. हाक मारते चला जेवायला."

दोघे जेवायला बसतात. सुनिता दोघांना हवं ते वाढते.


सुनिता-"करा सुरुवात. ईरा झोपली आहे. मी जेवले. माझं. वेळेत खावं लागते. बाळाचं पोट दुखेल हे चालत नाही. ते चालत नाही. गणेश दादा थांब ना थोडं उद्या पहाटेच निघालास. घरचीच गाडी आहे."


गणेश-"अगं नोकरी आहे. सुट्टी मिळत नाही एवढी. काय करणार."


दोघांची जेवण झाली. सुनिताचे फार डोके दुखते.


सुनिता-"आहो.... समोरच्या पार्लर मध्ये जाऊन हेड मसाज करून घेते. अतिशय डोके दुखते. ईरा झोपली दोघे लक्ष ठेवा.मी येतेच अर्ध्या - एक तासात."


सुनिता-" पार्लरवाल्या ताईला म्हणते हेड मसाज करायचा आहे. "


तिथे पार्लर वाली जवळ सि सि टीव्ही आहे कळताच.

सुनिता विचारते -"समोरच्या दोन, तीन बंगल्याची होते का शूटिंग? मागच्या एक दोन महिन्याची चेक होईल का?"


पार्लरवाली तशी ओळखीची झाल्याने. सुनिता थोडे पैसे देईल म्हणते तिला. शेवटी प्लीज म्हणल्यावर मागच्या महिन्यातली दाखवायला रेडी होते.


सुनिता-"चेक करते मागच्या महिन्याची चेक करते. खूप चेक करते मागचे. दोन - महिन्याची चेक करते. बसून बसून कंबर दुखायला लागते. पाठ दुखते. कंटाळून जाते. पण आठवते आईने आठवा महिना लागताच नेले. नंतर डिलिव्हरी, नंतर सव्वा महिना बाळंतपण मोठा पिरेड आहे चेक करायला हवे. असे डोक्यात चालू असताना अचानक जे काही दोन - तीन दिवस घडलेले दिसते ते पाहून खूपच थक्क होते. प्रचंड राग नवऱ्याचा येतो. ती क्लिप मोबाईल मध्ये घेते. पुरावा. आता नवऱ्याला जाब विचारावा लागेल. नवरा खोटा बोलला, नात्यात विश्वासाच्या गोष्टी करत होता. हा पुरवा दाखवून जाब विचारते आता. खूप राग येतो. तळपायाची आग मस्तकात जाते तिची.सुनिता घरी निघते.




क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all