ती आणि तिचं कुटुंब भाग - 42
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.
सुनिता संतापलेली असते. लालबुंद झालेली असते. हॉलमध्येच नवऱ्याला बोलवून हाक मारते. जोरात आवाज ऐकून गणेश दादाही येतो.
गणेश दादा - "काय ग सुनीता काय झालं? बाळ झोपले किती मोठ्याने ओरडते?"
सुनिता - " दादा आणि सागर तुम्ही दोघं या तुमच्या मोबाईल मध्ये टाकलेल्या क्लिप पहा. आताच्या आता काय दिसतंय मला सांगा. हा पुरावा आहे. माझ्या नवऱ्याच्या बेजवाबदारीचा, व्याभिचाराचा, माझ्याशी एकनिष्ठ न राहण्याचा, मलाच माझीच कीव यायला लागली आहे. या नवऱ्यावर एवढे प्रेम केले. काय काय केले. हा माझ्यावर उलटला सापाची जात आहे त्याची. "
गणेश हि चिडतो. सागरची कॉलर धरतो. - " काय रे काय हे सगळे सांग तुझ्याच तोंडाने सांग. ऐकू दे. तूझ्या पापाचा पाढा वाच. तूझ्या तोंडाने कबूल कर. आता पुरवा आहेच."
सागरच्या तोंडावर काहीच चूक केली अशी पश्चातापची भावना नसते. कॉलर सोडून घेतो.
सागर -"शेजारच्या मित्र डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे. थोडासा सायको आहे. त्याच्या बायकोला पट्याने मारले. ती पण डॉक्टर आहे. त्याच्यामुळेच माझी आणि त्याच्या बायकोची ओळख झाली. तिने मला फोन करून बोलावले. हा नवरा पट्याने मारतो. आज घरी नाही. बाहेरगावी गेला आहे. मग मी त्यांच्या घरी गेलो. तर तिने मला हातावर, पाठीवर वळ दाखवले. आधी सहानुभूती ने मी पाहिले. तिला मलम लावले. तिने जेव्हा मांडीवरचे वळ दाखवले. नंतर छातीवर मलम तर लावले पण माझा तोल जाऊ लागला.ती गोरी गोमटी, भारी फिगर, कशी राहते टॉप एकदम. काय तिचे ओठ..
यात तुझी आई दोषी आहेच. माझ्यापासून दूर तुला महिनोमहिने घेऊन गेली होतीच. माझी भूक चाळवली. मी माझी भूक भागवली. आम्ही दोघे एकत्र आलो. तिचा नवरा सायको असल्यामुळे तिची ती इच्छा भागवतच नव्हता. माझी बायको महिनोमहिने माहेरी जाते.
तो नसताना मी त्यांच्या बंगल्यात गेलो तो त्या बंगल्यातून रात्री रिटर्न नाही आलो. हिच हि क्लिप. दुसरी तिचा नवरा नसताना आम्ही हातात हात घालून माझ्या फोर व्हिलर मध्ये फिरायला गेलो. ती क्लिप आहे.
सूनिता- "शी.. काय निर्लज्ज आहे हा माणूस. काय स्वतःच्या तोंडाने सांगतो? स्वतःची लग्नाच्या बायकोची डिलिव्हरी, सीझर म्हणून माहेरी गेली. हा इकडेच मज्जा मारतो. लाज वाटत नाही बोलायला. तोंडावर काही गिल्ट नाही. असा काय नवरा आहे? शी.. वर काल खोटं बोलला माझ्याशी, मलाच म्हणे नात्यात विश्वास हवा.. शी तुझी बायको म्हणून घ्यायची लाज वाटते मला. काय नवरा, काय बाप, काय पुरुष.... अरेरे सूनिता रडते. डोक्याला हात लावते.
गणेश दादा आधार देतो. सांत्वन करतो. सुनिताला सावरतो. - " रडू नको. बाळंतीण आहे. त्रास होईल तुला. पदरात मुलगी आहे तुझ्या आता."
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा