Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 43

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 43


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


विषय - कौटुंबिक


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा.



गणेश -"सुनी प्लीज रडू नकोस. सावर स्वतः ला. याला ढीम्म् फरक पडला नाही. बघ. करून सवरून नामा निराळा.. तू स्वतः ला त्रास करून काही होणार आहे का?"


गणेश-"काय रे त्या घर, संसार एखाद्याचा मोडणाऱ्या त्या टवळीचे काय नाव आहे रे. भेटू दे चांगली खण वाजवतो."


सागर-"तिचं नाव तृप्ती आहे. तृप्त करणारी."

गणेश हे ऐकताच. गणेश सणकन एक सागरला वाजवतो. दोघाच्या झटापटी सूरू होतात. इतक्यात ईराच्या जोरात रडण्याचा आवाज येतो. सगळे शांत होतात. सूनिता पळत जाते तिला प्यायला घेते.


सूनिता रडत असते.


गणेश तिला खोली बाहेरूनच म्हणतो -" आई बाबा, दत्ता दादाला बोलवून घेतो."


सूनिता पाठमोरीच होकारर्थी मान डोलावते.


गणेश-"दत्ता दादा हॅलो. अरे तुझा संशय खरा ठरला रे. हा सुनी चा नवरा एक कोण शेजारच्या डॉक्टर मित्राच्या डॉक्टर बायको सोबत मज्जा मारत होता. त्यांनी तोंडाने मान्य केले अरे काही लाज नाही त्याला. सुनिताला कळले ती रडते. तुम्ही लवकर या. आई, बाबा, दादा तू ये लवकर. लगेच निघा. आईला सांग आणि तिघे लगेच या. हो ठेवतो."


घरात वादळा पूर्वीची शांतता पसरते. सुनिताला लग्न या माणसाशी का केले पश्चाताप होत होता. रडत होती. गणेश दादा समजावून थकला होता. त्याला कळतं होत म्हणणं सोपं आहे. हे पचवण फार अवघड. वेळ जातो. सुनिताचा चा नवरा बिनधास्त बसलेला असतो. हॉस्पिटल मधून फोन येतो. दवाखान्यात जातो सुनिताचा नवरा.


अखेर दत्ता दादा, सूनिताचे आई, वडील तिच्या घरी येतात.
सूनिता आईच्या गळयात पडून ढसा ढसा रडते.


आई ( मालती) =" कुठे आहे तुझा नवरा? सुने."


सूनिता -"दवाखान्यात गेला."


आई (मालती ) -"अगं सुने काय झालं हे डोक्याला ताप. "


गणेश-" सुनी चा नवरा म्हणतो मी असं वागलो त्याला आई तुझी चूक आहे. तू महिनो महिने सुनीला माहेरी घेऊन गेली त्यामुळेच तो असा वागला."


सुनीता-"काय स्थळ पाहिलं मामानी. शी.. आयुष्याचे वाटोळे. लग्नात पंचवीस तोळे सोन घेतले. ते द्या रिटर्न म्हणावं. घटस्फोट घेऊन टाकू. आई तुझ्या नात्यात आहे ना. तुला चौकशी करता नाही आली का? मामाने काय पाहून दिले."


आई (मालती ) -" अगं मुलगी आहे तुला आता. लेकरू नसत तर घटस्फोट घेतला असता. आता नाही. माहेरी ज्याला त्याला आपला संसार आहे. कोणाचा आधार कशाला घ्यायचा? त्या मुलीला बाप लागेल. "


गणेश - " त्याच्या आई, वडिलांना माहिती नाही म्हणे"


सूनिता -" तो निर्लज्ज स्वतः च्या तोंडाने कबूल केल, आधी खोटं बोलला. नंतर मोबाईल वर दोन क्लिप आहे पुरावा. व्यभीचारी, बेजवाबदार, बायकोशी एकनिष्ठ नाही. शहाणा.. आई म्हणते संसार कर तुला मुलगी झाली.कसे सहन करू हे? "




क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all