ती आणि तिचं कुटुंब भाग - 45
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
विषय - कौटुंबिक
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
सूनिता, आई सगळ्यासाठी स्वयंपाक करत असतात.
सूनिता-" मुद्दाम सागरच्या नावडतीच सगळे बनव आई."
आई (मालती) - "किती ही भांडण असली तरी ज्या माणसा सोबत सगळे आयुष्य काढायचे त्याला जिंकून घ्यायचा प्रयत्न कर. तसा आवडीचा उत्तम स्वयंपाक करणे. कारण मनाचा मार्ग पोटातून जातो."
सूनिता-"आई मी काय साधू आहे का? तो कसाही वागेल मी चांगल वागायचं. "
आई (मालती ) - " सुने ऐक.... नवऱ्याला आवडेल तसे रहाणे. ईश्य.. मी सांगायचं का तुला?"
थोडया वेळाने.
आई ( मालती ) - "अति राग आला रामाचे नाव घेत जा. नामस्मरणात खूप ताकद आहे. मनापासून जप कर."
सूनिता-"हो."
आई (मालती) -" मी इतके वर्ष नवऱ्याला आवडेल तसे केले. त्यांना भाजी - पोळी लागते आवडीची. दोन्हीही वेळेला गरम, ताजी, वेळेतच जेवायला लागत. इतके वर्ष खूप सांभाळत आले. त्याचा स्वभावच आहे. कधीही चांगल म्हणत नाही. खूप चुका काढून नाव ठेऊनच खातात.मी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी नाव ठेवणं सोडले नाही. पण हि करते हि जाणीव असते कुठे तरी. बोलून दाखवत नाही. समजतं ते. तुला समजले का मी काय बोलते? आता हि लाल भोपळ्याची भाजी याला मेथीच्या दाण्याची फोडणी लागते. मेथीचे दाणे कमी नको, जास्त नको. लाल भोपळ्याच्या फोडी लहान चालत नाही. भोपळ्याच्या फोडी फारच गाळ शिजलेल्या चालत नाही. कच्या राहिलेल्या चालत नाही. भोपळ्याच्या भाजीत गूळ लागतो. शुगर मुळे जास्त चालत नाही. कमी पडला तर चव लागत नाही म्हणून कमी चालत नाही. हे सगळे लक्षात ठेऊन भाजी करते. काही ना काही चुका काढतातच. नाव ठेऊन खातात. मी करणारी भली ते नाव ठेवणारे भले.. "
सूनिता-"आई. "
आई (मालती)-"काय आई. चार समजूतीच्या गोष्टी सांगते तुला. तू स्त्री आहे. तुझं कर्तव्यच आहे. स्वयंपाक करण, घरात सगळी कामं करणे. तू सहनशील पाहिजे. तू सून आहे. तू आधारस्तंभ आहे या घराचा. आई आहे. बायको आहे. तुझी जवाबदारी आहे. तू गृहिणी उत्तम हो."
सूनिता-" मला ऐकून खूप राग येतो हे सगळे ऐकून."
आई (मालती) - " तुला चांगलेच सांगते ऐक तू."
सूनिता- "अगं तो जावई काय थराच वागला आहे. तू मलाच उपदेश काय देते. उपदेशाची गरज त्यालाच आहे. बाईला च त्रास सगळा."
आई ( मालती) -" तू थोडी बदल. समोरचा बदलेल. आपण आधी हातभर झुकलो की समोरचा वितभर झुकतो. अभिमान, मगरूरी सोडून दे. बाई कडे नको ती. तुला नांदायचं आहे इथे लोकांच्या घरी. तुझा नवरा आला घरी की त्याच्याशी हि आम्ही सगळे बोलूच तू तेव्हा नको समोर."
इतक्यात लीलाचा फोन येतो सासूबाईना.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा