Login

ती आणि तिचं कुटुंब -भाग 47

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 47


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


विषय - कौटुंबिक


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.



जावई - "पाणी दे ग.. शूज काढतो.."


सूनिता काही उठत नाही.

आई-"जा बाई पाणी पाज.. सुने आण पाणी."


सूनिता पाणी आणते. देते जोरात हातात.काही सांडत.

आई-"ओरडते काय ग? "


दत्ता - "सुने जा तुझ्या पोरीला घेऊन आत जा. जरा वेळ बाहेर येऊ नको. दार लावून घे. आत थांब."


सूनिता जाते ईराला आत घेऊन जाते.


दत्ता-"काय रे सागर काय नवीन तुझं अ. "


आई (मालती) -"दत्ता जरा."


दत्ता-"आई.. तुला कळतं का ह्यांनी.. शी.. शिकलेला ना तू? चांगल्या घरातला ना? हे शिकवलं का तूझ्या आई-बापानी का रे?"

सागर-"ए.. "

गणेश-"ह्याला तर ना.. "


बाबा-" तुम्ही दोघे बाजूला व्हा.. मला बोलू द्या.... सरका."


दत्ता-"बाबा.. "

बाबा-"शांत व्हा तुम्ही. बसा खाली सगळे."


बाबा-" सागर राव तुमचं जे झाले ते चूकच आहे. आता या पुढे हे होता कामा नये. हे शोभतं नाही तुम्ही चांगल्या घरातले, शिकलेले.. "


सागर-"तुम्ही तुमच्या मुलीला महिनो महीने माहेरी न्या. "


दत्ता-"अरे ती गरोदर, बाळंतपणासाठीच गेली होती ना. तुझ्याच पोरीला जन्म दिला. सीझर झाले ना तिचे. हा काय मुद्दा आहे तुझा?"


बाबा-"आहो सूनिता चे जग तुम्ही आणि ती ईरा इतकेच आहे. तुम्ही जर असे वागले. तर कसे चालेल? "


आई(मालती)-" तुमचा सुखाचा संसार करा. तुमच्या आई सारखंच समजा चांगल सांगते. सरळ मार्गी संसार करा चांगला. सांभाळून घ्या बायको, मुलगी तुमची तुमचा संसार. "

सागर -"हो.. "

दत्ता-"यापुढे फक्त नोकरी, घर, बायको, तुझी लहान मुलगी इतकंच.. जर काही कानावर आले तर बघ.."


सागर-"माझ्या घरात येऊन मलाच धमकी. चल जा मोठा आला.. तू शिकलेला आहे ना? "


आई-"अरे जावई बापू शांततेत घ्या. तुम्हाला तुमच्या आई, बाबाची शप्पथ चांगले सांभाळा. बायको, तुमच्या पोरीला, तुमच्या संसाराला."


दत्ता-"गोडीत सांगतो. चांगल वाग."

सागर-"हं आता कसं."

गणेश-" गोडीत सांगतो ऐक चांगल रहा."

बाबा-"तुम्ही हे ऐका तुम्ही घर बदला. लांब घ्या. सुखाने संसार करा, बायको, तुमची लहान मुलगी सांभाळा बस्स. "


सागर-"इथून हॉस्पिटल जवळ आहे माझे. मला इमर्जन्सी जावं लागते. हे स्वतः चे घर घेतले मी माझे."


दत्ता'-'" आता तू स्वतः च संसार, बायको, तुझी मुलगी सांभाळून घे बस्स."


आई (मालती)- "शप्पथ आहे तुम्हाला आता तुमच्या आई, बाबाची घर, बायको, तुमची मुलगी सांभाळा.. रडत हात जोडते. तुम्हाला."


सागर-"हो आई शब्द देतो तुम्ही म्हणता म्हणून सांभाळेल."

.
दत्ता-"आई हात नको जोडू तू याच्या पुढे."


आई रडत अचानक कोसळते पडते. सगळे पळत जातात.




क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all