Login

ती आणि तिचं कुटुंब - भाग 48

Ti Aani Tich Kutumb
ती आणि तिचं कुटुंब भाग - 48


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


विषय - कौटुंबिक


वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती आहे वाचून नक्की कमेंट करा.


आई (मालती) - आईला दवाखान्यात नेतात. बीपी हाय झालेला असतो. डॉक्टर विचारतात काय टेन्शन आहे. टेन्शन घेऊ नका. औषधं देतात.सगळे सोबत असतात.
घरी येतात सगळे. जेवतात. पहाटे गणेश, दत्ता, आई, बाबा घरी रिटर्न निघतात. चांगला संसार करा. सगळे सांगतात. निघून जातात.


घरी गणेश, दत्ता, आई, बाबा येताच.


सासूबाई-" राहुल कुठे आहे? स्वानंदी.. काय झालं त्याला?"


स्वानंदी रडवेली होऊन - "आई त्यांची नोकरी गेली. गेले तीन दिवस ते सतत खूपच रडत आहे, कुणाशी बोलत नाही. तासनतास बाथरूम मध्ये जाऊन बसतात. काही खात नाही, अचानक खूप भूक लागली खूप खातात. पूर्ण डेली रुटीन बिघडले आहे. झोपतच नाही कधीपण झोपतात. मला काही पाहवत नाही त्याच्याकडे. दाढी करत नाही. केस विस्कटलेले. त्यांना इ. एम. आय. महिन्याचा कसा भरायचा याच टेन्शन आले आहे असे म्हणत होते. कोणत्याच कामात त्यांना रस नाही. हे करा नाही. ते करा नाही. रडणं काहीतरी वेगळेच आहे."


दत्ता-"बापरे.. मानसशास्त्रज्ञ डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल असे वाटते मला. लवकरच नेलेलं बरं. त्याला न सांगता न्यावे लागेल. डॉक्टरशी आधीच बोलून घेतो तसे. माझ्या सोबतच येईल तो. आजच जावं लागेल. आहे एक ओळखीचा डॉक्टर मित्र. कॉल करून बोलून घेतो. स्वानंदी तू ही चल त्यांना हे सगळे लक्षणे सांग फोन वर. चल लवकर."


डॉक्टरला फोनवर सगळे लक्षणे स्वानंदी सांगते.

डॉक्टर म्हणतात -" भेटायला घेऊन ये दत्ता त्याला. नॉर्मल बोलू. मी डॉक्टर आहे त्याला कळणार नाही. घरी ये."

दत्ता घेऊन जातो. खूप वेळ गप्पा नंतर निघून येतात. घरी आल्यावर दत्ता एकट्यात डॉक्टर ला फोन लावतो.

डॉक्टर-"डिप्रेशन मध्ये गेला आहे तो."


दत्ताला खूप धक्का बसतो. डॉक्टर औषधं, गोळया लिहून देतात. कसं घ्यायचं सांगतात. घेऊन याव्या गोळया दत्ता बाहेर निघतो. दत्ता कुणालाच सांगत नाही.


स्वानंदी- "मी नोकरी करू का? दत्ता दादा. माझे एम. पी. एम झाले आहे. एच आर मध्ये नोकरी लागू शकते."


दत्ता-" कर वा छान. म्हणून निघून जातो."


स्वानंदी ऑनलाईन जागा कुठे आहे का शोधते. इंटरव्हयू जाऊन यावं नोकरी लागली की सगळ्यांना सांगावं असा विचार करते.


स्वानंदी लीला, दत्ता दोघांना सांगून इंटरव्हयूला जाते. सासूबाई ना चालणार का? लीलाला प्रश्न पडतो.



क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all