ती आणि तिचं कुटुंब भाग - 49
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घ कथा लेखन स्पर्धा
विषय - कौटुंबिक
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून नक्की कमेंट करा
दत्ता - डॉक्टरने लिहून दिलेल्या डिप्रेशनच्या गोळया आणतो. आता सगळ्यांना सांगावं लागेल. काय झाले राहुलला ते. असा विचार करत असतो.
दत्ता -"सगळ्यांनी हॉल मध्ये जमा व्हा. .. सगळे येतात.फक्त राहुल नसतो."
दत्ता - "सगळ्यांनी ऐका.. राहूल आता डिप्रेशन मध्ये गेला आहे. नोकरी गेली. ऑफिस राजकारणामुळे. इ. एम आय भरू शकत नाही. अशा गोष्टीमुळे तो डिप्रेशन मध्ये गेला. आहे. डॉक्टरने सागितलं.
आई-" बापरे आता रे काय मग? "
दत्ता - "गोळया लिहून दिल्या. या आणल्या त्या न चुकता आणायच्या मग रोज घ्यायच्या."
स्वानंदी - "'चल बाहेर हाताला धरून बाहेर नेते मुंगीची रांग दाखवते. बघ कितीदा पडतात. तरी उठतात. मेहनत करतात. प्रयत्न करतात. ते पहा किती माती गोळा केली. घर बांधतात. एवढीशी मुंगी हार मानत नाही. तुम्ही तर पुरुषा सारखे पुरुष तुम्हाला हात, पाय, डोळे, बुद्धी सगळे दिले देवाने तुम्ही का हार मानतात? उठा काही करून दाखवा.तुम्ही करू शकता. काय या डिप्रेशनच्या ऐशी की तेशी. तुम्हीच आहे इंजिनिअर डिस्टिंगशन पास करणारे. ओळखा स्वतःला. कसलं दुःख बायको, भाऊ, आई, बाबा सगळ्यासमोर घडा घडा बोलून दाखवायचं. मोकळे व्हायचे. आहेत घरात आपली माणसे. कशाला मनात साठून ठेवायचं? रडावं वाटले रडून घ्या आईच्या कुशीत, मोठया भावाच्या खांद्यावर मोकळे व्हायचे. कुढत बसायचे नाही. दुःखाचे भांडवल करायचे नाही. स्वतः बदल आत्मविश्वास ठेवायचा. स्वतः ला तुटू द्यायचे नाही. हार मानायची नाही. चला उठा हर हर महादेव. तुम्ही काहीही करू शकतात. तुमच्या सगळ्या त्रासाना सांगा तुमचा राम मोठा आहे आणि तो राम तुमच्या बाजूनी आहे. तुमची बाजू सत्याची आहे. चला उठा. सळसळत रक्त आहे. उठा तुम्ही काही कमी नाही. तुम्हीच तुमचे जीवन घडवू शकता. तुम्हाला तुमच्या आई, वडिलांचे नाव उंच करायचे. चला दाखवून द्या जगाला हिच ती वेळ ऊठा. स्वानंदी बोलत होती. आणि राहुल ला शब्द ना शब्द बळ देतं होते.
एक वेळ अशी आली राहुल ने हाताची मूठ केली हात वर केला जय श्रीराम जोरात ताकदीनीशी म्हणाला. त्याच्या विचारात, काळजात ऊर्जा संचारली. आता उठायचे मागे वळून पाहायचे नाही. असे ठरवले पक्के मनाशी. त्याने ठरवले सॉफ्टवेअर ची स्वतः ची छोटीशी का होईना कंपनी काढायची.
स्वानंदीला फोन येतो की तिला नोकरी लागली दिलेल्या इंटरव्हियू मध्ये तिची निवड झाली.
स्वानंदी म्हणाली -" मी पण खांदयाला खांदा लावून नोकरी करेल मी पण हातभार लावेल. आपण दोघे मिळून नक्की चांगले करून दाखवूया चला."
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा